कळंब – रोटरी क्लब ऑफ कळंब सिटी व रोटरी क्लब ऑफ सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने ज्ञान प्रसारक मंडळाचे कर्तव्यदक्ष सचिव डॉ.अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने मुख्याध्यापक व्यंकट कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली विद्याभवन हायस्कूल कळंब येथे मोफत डिजिटल क्लासरूम उपलब्ध करून देण्यात आले. या उपक्रमात विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध:43” स्मार्ट टीव्ही,महाराष्ट्र राज्य मंडळाचा 5वी ते 10वीचा अभ्यासक्रम (मराठी व इंग्रजी) – ऑडिओ-व्हिज्युअल स्वरूपात,विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा तयारी,MSCIT,करिअर मार्गदर्शन,इंग्रजी कौशल्य विकास व विविध शैक्षणिक सामग्रीसह डिजिटल सॉफ्टवेअर सॉफ्टवेअरमध्ये समाविष्ट शैक्षणिक सामग्री:शिष्यवृत्ती: 5वीसाठी प्रश्नसंच,डिजिटल ग्रंथालय:पूरक अध्ययन सामग्री,स्वच्छ भारत:आरोग्य, स्वच्छता आणि पर्यावरण यावर आधारित माहितीपट,एकलव्य: स्पर्धा परीक्षांसाठी 5,000+ प्रश्नसंच (मराठी),ICT: MSCIT अभ्यासक्रम (मराठी),करिअर दिशा: 250+ करिअर मार्गदर्शन व्हिडिओ (मराठी, हिंदी, इंग्रजी).इंग्रजी शिका: सॉफ्ट स्किल्स आणि व्यवस्थापन प्रशिक्षण (10 विषय – इंग्रजी व्हिडिओसह),मूल्य शिक्षण: 46 विषय (मराठी) – ऑडिओ व व्हिडिओ स्वरूपात.सेंद्रिय दान: जनजागृती सामग्री.CPR व्हिडिओ डेमो: जीवन वाचवण्यासाठी आवश्यक कौशल्यांचे प्रात्यक्षिक. यासाठी सोलापूरहून रॉटरि टीम २०२६-२७ शाळेत डिजिटल क्लासरूमचे इन्स्टॉलेशन पूर्ण करण्यासाठी आले होते. ही सुविधा विद्यार्थ्यांसाठी ज्ञानाच्या डिजिटल क्रांतीसारखी ठरेल. या उपक्रमासाठी विशेष सहकार्य:सीएसआर भागीदार: पी पी पटेल कंपनी डीजीएन जयेश पटेल (२६-२७)प्रांतपाल रोटरी क्लब ऑफ कळंब सिटी चे अध्यक्ष रोटे.अरविंद शिंदे,सचिव अशोक काटे,सुशील तीर्थकर, डॉ.गिरीश कुलकर्णी,डॉ.सचिन पवार,निखिल भडंगे तसेच रोटरी सोलापूर परिवाराचे रो.राजन वोरा व रो.अक्षय जव्हेरी उपस्थित होते.
More Stories
संचालिका सौ.अंजली मोहेकर यांची विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिरास सदिच्छा भेट
मोहेकर महाविद्यालयात ग्रंथालय शास्त्राच्या राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन
भीमराव दादा सत्यवचनी व्यक्तिमत्व होतं – डॉ. माणिक डिकले