कळंब – नगर परिषद कळंब अंतर्गत दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानातील महिला बचत गट यांनी उत्पादित केलेल्या मालांचे विक्री प्रदर्शन तसेच हळदीकुंकू व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन नगर परिषद कळंब यांच्या मार्फत करण्यात आले.सदरील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगर परिषद कळंबचे प्रशासक तथा मुख्याधिकारी श्रीमती मंजुषा गुरमे ह्या होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून श्रीमती शिल्पा माळवे नायब तहसीलदार (तहसील कार्यालय कळंब जि.धाराशीव) , श्रीमती प्रभा पुंडके स.पोलीस निरक्षक (पोलीस स्टेशन कळंब जी धाराशीव) ह्या होत्या.या कार्यक्रमाचे प्रस्ताविक श्रीमती सुषमा भालेराव यांनी केलं या वेळी प्रमुख पाहुणे व त्यांची टीम यांनी महिला बचत गटानी उत्पादित केलेल्या वस्तू विक्री प्रदर्शनाला भेट देण्यात आली.तदनंतर उपस्थित महिलांसा संगीत खुर्ची,उखाणे, लिंबू चमचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.व या स्पर्धेत विजेती ठरलेल्या महिलांना बक्षीस वाटप करण्यात आले व सोबतच महिलांना मकरसंक्राती निमित्त वाण म्हणून घरातील कचरा संकलनासाठी डस्टबिनचे वाटप करण्यात आले. महिलांनी आपल्या घरात निर्माण होणार ओला व सुखा याचे विलगीकरण करून आपल्या दारात येणाऱ्या घंटा गाडीत टाकावा व आपला परिसर स्वच्छ ठेवावा असा संदेश या वेळी देण्यात आला.या कार्यक्रमासाठी कळंब शहरातील महिला बचत गटाचे वस्ती स्तर संघ याचे अध्यक्ष सचिव व नगर परिषद कळंब मधील सर्व कर्मचारी यांच्या कुटुंबातील महिला ह्या मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे आयोजन व संयोजन श्रीमती सुषमा भालेराव,श्रीमती प्रतीक्षा साठे,श्रीमती मिनाक्षी वडेपल्ली,श्रीमती ताई कुंडलिक जाधव,श्रीमती सुरेखा गायकवाड DAY-NULM अभियानातील CRP यांनी केले व उपस्थित महिलांचे आभार श्रीमती मिनाक्षी वडेपल्ली यांनी व्यक्त केले.
More Stories
कळंब खरेदी-विक्री संघाची निवडणूक जाहीर;१८ एप्रिलला मतदान
गुढीपाडवा उपक्रमातून शिक्षणाची नवी सुरुवात;चिमुकल्यांनी भरली शाळा
भिमा हगारे यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेस तालुकाध्यक्षपदी निवड