धाराशिव (जिमाका) – २६ जानेवारी २०२५ रोजी भारताचा ७६ वा प्रजासत्ताक दिन साजरा होणार आहे.या दिवशी विविध पक्ष,संघटना व इतर नागरीक यांचे वतीने आपआपल्या मागण्यांसाठी मोर्चे,धरणे, उपोषणे,आत्मदहन,रास्ता रोको आदी आंदोलनात्मक कार्यक्रम करण्याची शक्यता नाकारता येत नाही. जिल्हाधिकारी कार्यालय येथे ध्वजारोहणाचा आणि पोलीस मुख्यालय मैदान क्र.२ येथे भारताच्या ७६ व्या प्रजासत्ताक दिनानिमीत्त पालकमंत्री यांचे हस्ते मुख्य ध्वजारोहनाचा कार्यक्रम आयोजीत करण्यात आला आहे.मध्यवर्ती प्रशासकीय इमारत,धाराशिव या ठिकाणीही प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रजासत्ताक दिनानिमीत्त मुख्य ध्वजारोहन कार्यक्रमास उपस्थित राहण्यासाठी पालकमंत्री हे शिंगोली सर्किट हाऊस, धाराशिव येथुन जिल्हाधिकारी कार्यालय येथे येण्याची शक्यता आहे.त्यानुषंगाने शिंगोली सर्किट हाऊस,धाराशिव ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळा,धाराशिव या परिसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ चे कलम १६३ चे प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात येणार आहे. ७६ व्या प्रजासत्ताक दिनानिमीत्त मुख्य शासकीय ध्वजारोहन कार्यक्रमाचे वेळी कोणत्याही प्रकारचा व्यत्यय येणार नाही व कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही,याकरीता २५ जानेवारी रोजी रात्री १२ ते २६ जानेवारी रोजी रात्री १२ वाजता दरम्यान भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२५ चे कलम १६३ लागू राहणार आहे. धाराशिव उपविभागीय दंडाधिकारी संतोष राऊत यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ चे कलम १६३ प्रमाणे प्राप्त अधिकाराचा वापर करून २५ जानेवारीच्या रात्री १२ ते २६ जानेवारीच्या रात्री १२ वाजता दरम्यान शिंगोली सर्किट हाऊस, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, धाराशिव ते पोलीस अधिक्षक कार्यालय धाराशिव या परिसरात उपोषण,आत्मदहन,धरणे,मोर्चा, रॅली,रस्ता रोको,ध्वनीक्षेपकाचा वापर इत्यादी आंदोलनात्मक कार्यक्रम घेण्यास प्रतिबंध केला आहे.
More Stories
युद्धाचे पडसाद : सामान्य शेतकरी माणसाच्या आयुष्यातील बदल
धाराशिव जिल्हा परिषदेत अध्यक्ष अर्चनाताई पाटील यांचा गौरवपूर्ण सत्कार
लाडकी बहीण योजनेस गती; अंगणवाडी सेविकांचेही सक्रिय सहकार्य