June 19, 2025

धाराशिव जिल्हा पोलिसनामा

  • धाराशिव शहर वाहतुक शाखा व संबंधीत पोलीस ठाण्यांनी महत्त्वाच्या रस्त्यांवर दि.30 डिसेंबर रोजी मोटार वाहन कायदा- नियम भंग प्रकरणी एकुण 63 कारवाया करुन 54,400 ₹ ‘तडजोड शुल्क’वसुल केले आहे.
  • “ अवैध मद्य विरोधी कारवाई.”
  • तामलवाडी पोलीस ठाणे:आरोपी नामे-बबन केशव जाधव, वय 52 वर्षे, रा.गवळेवाडी ता. तुळजापूर जि. धाराशिव हे दि.30.12.2024 रोजी 20.30 वा. सु. केमवाउी ते वडाळा जाणारे रोडलगत गवळेवाडी शिवारात अंदाजे 945 ₹ किंमतीच्या देशी विदेशी दारुच्या 27 सिलबंद बाटल्या अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेल्या जप्त करण्यात आल्या. यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम- 65(ई) अन्वये तामलवाडी पो ठाणे येथे गुन्हा नोंदविला आहे.
  • कळंब पोलीस ठाणे:आरोपी नामे-संगीता सुभाष शिंदे, वय 25 वर्षे, रा.वाकडी केज ता. कळंब जि. धाराशिव या दि.30.12.2024 रोजी 01.15 वा. सु. वाकडी केज शिवारात अंदाजे 2,000 ₹ किंमतीचे 20 लिटर गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली. यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम- 65(ई) अन्वये कळंब पो ठाणे येथे गुन्हा नोंदविला आहे.
  • धाराशिव शहर पोलीस ठाणे:आरोपी नामे-नागेश विठ्ठल पिसे, वय 30 वर्षे, शेकापूर ता. जि. धाराशिव हे दि.30.12.2024 रोजी 18.35 वा. सु. जगदंब हॉटेल समोर बेंबळी रोड धाराशिव येथे अंदाजे 8,060 ₹ किंमतीच्या देशी विदेशी दारुच्या 81 सिलबंद बाटल्या अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेल्या जप्त करण्यात आल्या. तर आरोपी नामे-अजय तानाजी फरतडे, वय 30 वर्षे, रा.यज्ञ नारायण नगर धाराशिव ता. जि.धाराशिव हे दि.29.12.2024 रोजी 19.40 वा. सु. हॉटेल मथुराचे बाजूला बेंबळी रोड धाराशिव येथे अंदाजे 700 ₹ किंमतीच्या 20 देशी विदेशी दारुच्या सिलबंद बाटल्या अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेल्या जप्त करण्यात आल्या. यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम- 65(ई) अन्वये धाराशिव शहर पो ठाणे येथे स्वतंत्र 2 गुन्हे नोंदविले आहेत.
  • “ जुगार विरोधी कारवाई.”
  • उमरगा पोलीस ठाणे :जुगार विरोधी कारवाई दरम्यान उमरगा पोलीसांनी दि.30.12.2024 रोजी 16.00 वा. सु. पो ठाणे उमरगा हद्दीत उमरगा येथील घाटे कॉम्पलेक्स समोर छापा टाकला. यावेळी आरोपी नामे-सुधाकर नरसप्पा शिंदे, वय 65 वर्षे, रा. नागोरा ता. जि. बिदर हे 16.00 वा. सु. उमरगा येथील घाटे कॉम्पलेक्स समोर कल्याण मटका जुगाराचे साहित्यासह एकुण 2,200 ₹ रक्कम स्वत:चे कब्जात बाळगलेले उमरगा पो. ठाणेच्या पथकास आढळले. यावरुन पोलीसांनी जुगार साहित्यासह रक्कम जप्त करुन नमूद व्यक्तींविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम- 12 (अ) अन्वये उमरगा पो ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे.
  • “ मालमत्तेविरुध्द गुन्हे.”
  • धाराशिव ग्रामीण पोलीस ठाणे :फिर्यादी नामे-प्रदिप तानाजी शिंदे, वय 44 वर्षे, रा.वाघोली ता. जि.धाराशिव, हे व त्यांचे घरातील सर्व शेतात गेले असता त्यांचे राहते घराचा अमोल वंसत गाडेकर, रा. वाघोली ता. जि. धाराशिव हा दि.30.12.2024 रोजी 14.00 वा. सु. स्वायंपाक रुमवरील पत्रा उचकटून चोरी करण्याच्या उद्देशाने बेडरुम मध्ये लपून बसलेला फिर्यादी यांना मिळून आला. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-प्रदिप शिंदे यांनी दि.30.12.2024रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन धाराशिव ग्रामीण ठाणे येथे भा.न्या.सं.कलम 331(3),305(ए), 62 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
  • “मारहाण.”
  • उमरगा पोलीस ठाणे :आरोपी नामे- अंकुश टाकळे,रा. जकेकुरवाडी,प्रमोद पाटोळे, रोहीत घोडके, गंगाधर स्वामी, रोहन थोरात, मनोज कारभारी,विक्रंता गायकवाड,आकाश पात्रे, सर्व रा. गुंजोटी ता.उमरगा जि. धाराशिव यांनी दि.30.12.2024 रोजी 15.00 वा. सु. श्रीकृष्ण महाविद्यालय गुंजोटी चे गेट समोर रोडवर फिर्यादी नामे-विशाल सुरेश गायकवाड, वय 22 वर्षे, रा. औराद ता.उमरगा जि. धाराशिव यांना नमुद आरोपींनी मागील भांडणाचे कारणावरुन गैरकायद्याची मंडळी जमवून शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, हंटर, रॉड व चाकूने मारहाण करुन जखमी केले. तसेच फिर्यादीचे मित्र शशीकांत व सोनू हे भाडंण सोडवण्यास आले असता त्यांनाही नमुद आरोपींनी हंटर व चाकूने मारहाण करुन जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-विशाल गायकवाड यांनी दि.30.12.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन उमरगा पो ठाणे येथे भा.न्या.सं. कलम 189(2),190,191(2),191(3),118(1), 115(2), 352, 351(2),351(3) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
  • “शासकीय कामात अडथळा करणाऱ्यावर गुन्हा दाखल.”
  • वाशी पोलीस ठाणे : फिर्यादी नामे-सुदाम शेषराव मोहिते, वय 52 वर्षे, व्यवसाय- चालक महाराष्ट्र राज्य परिवहन मार्ग विभाग रा. घोडकी ता. वाशी जि. धाराशिव हे बस क्र एमएच 20 बीएल 1629 ही बस घेवून कळंब आगारातुन कळंब ईटकुरते लिंग्गी पिंपळगाव मार्गे जात होते. दि.30.12.2024 रोजी 14.30 वा. सु. सारोळा मांडवा येथे आरोपी नामे- बाबुराव मोरे,रा.सारोळा मांडवा ता. वाशी जि. धाराशिव यांनी त्याचे ताब्यातील कार क्र एमएच 14 जी एच 1227 ही समोरुन घेवून येत असताना बसला रस्ता देण्याचे कारणावरुन नमुद आरोपींनी फिर्यादीस शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी मारहाण केली. शासकीय कामात अडथळा निर्माण करुन जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-सुदाम मोहिते यांनी दि.30.12.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन वाशी पो ठाणे येथे भा.न्या.सं. कलम 132, 115, 352, 351(2),351(3) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
  • जनसंपर्क विभाग धाराशिव पोलीस
error: Content is protected !!