June 23, 2025

शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींना विविध ठिकाणी अभिवादन

  • कळंब – निजाम काळात दळणवळणाच्या कोणत्याही सुविधा उपलब्ध नसतानाही बहुजन समाजातील मुलांच्या शिक्षणासाठी स्वत:ला वाहून घेणारे ज्ञान प्रसारक मंडळ येरमाळ्याचे संस्थापक अध्यक्ष कै.शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर यांच्या कार्याला दि.२६ डिसेंबर २०२४ रोजी कर्तव्यदक्ष सचिव डॉ.अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने विविध ठिकाणी अभिवादन करण्यात आले.
    ज्ञानप्रकाशाचा दीप उजळविणाऱ्या मोहेकर यांनी प्रतिकूल परिस्थितीत समाजातील वंचित घटकांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी अहोरात्र परिश्रम घेतले.त्यांचे शिक्षणविषयक विचार व त्यागमय जीवन आजही प्रेरणादायी आहेत.
    त्यांच्या योगदानामुळे अनेक गरीब व वंचित मुलांना शिक्षणाची दारे उघडली.त्यांच्या स्मृतींना वंदन करत,त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेत शिक्षणाच्या प्रसारासाठी नव्या योजना राबवण्याचा निर्धार या वेळी व्यक्त करण्यात आला.

  • *१) ज्ञान प्रसार माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय मोहा**
    ज्ञान प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष कै.शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींच्या मूळ गावी मोहा ता.कळंब येथील
    ज्ञान प्रसार माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात गुरुजींच्या प्रतिमेस प्राचार्य संजय जगताप यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले.
    याप्रसंगी विद्यालयातील सर्व शिक्षक-शिक्षिका व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.

  • *२) विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिर,कळंब*
    शहरातील विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिर येथे ज्ञान प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष कै.शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींच्या प्रतिमेस मुख्याध्यापक सुभाष लाटे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले.
    याप्रसंगी विद्यामंदिर येथील सर्व शिक्षक-शिक्षिका व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.

  • *३) संभाजी विद्यालय,पिंपळगाव(लिंगी)**
    ज्ञान प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष कै.शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींच्या प्रतिमेस संभाजी विद्यालय,पिंपळगाव (लिंगी) ता.वाशी येथे मुख्याध्यापक युवराज सावंत यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले.
    याप्रसंगी विद्यालयातील सर्व शिक्षक-शिक्षिका व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.

  • *४) ज्ञानोद्दोग माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय,येरमाळा**
    ज्ञान प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष कै.शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींच्या प्रतिमेस
    ज्ञानोद्दोग माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय,येरमाळा येथे प्राचार्य शिवाजी पौळ यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले.
    याप्रसंगी विद्यालयातील सर्व शिक्षक-शिक्षिका व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.

  • *५) जय भवानी विद्यालय,पारा*
    ज्ञान प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष कै.शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींच्या प्रतिमेस मुख्याध्यापक एन.बी.सूर्यवंशी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले.
    याप्रसंगी विद्यालयातील सर्व शिक्षक-शिक्षिका व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.

  • *६) विद्यामंदिर हायस्कूल,आष्टा*
    ज्ञान प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष कै.शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींच्या प्रतिमेस विद्यामंदिर हायस्कूल,आष्टा ता.भूम येथे मुख्याध्यापक आनंद रामटेके यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले.
    याप्रसंगी विद्यालयातील सर्व शिक्षक-शिक्षिका व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.

  • *७) विद्याविकास हायस्कूल, कन्हेरवाडी*
    ज्ञान प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष कै.शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींच्या प्रतिमेस मुख्याध्यापक सुनील पांचाळ यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले.
    याप्रसंगी विद्यालयातील सर्व शिक्षक-शिक्षिका व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.

  • *८) ज्ञान प्रसार प्राथमिक विद्यालय,मोहा*
    ज्ञान प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष कै.शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींच्या मूळ गावी कळंब तालुक्यातील मोहा गावातील ज्ञान प्रसार प्राथमिक विद्यालयात गुरुजींच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले.
    यावेळी प्रशालेतील सहशिक्षक कमलाकर शेवाळे,सोलंकर शहाजी,श्रीमती पांचाळ उषा, श्रीमती पाटील स्मिता,पांडुरंग जाधव आदींची उपस्थिती होती.
error: Content is protected !!