June 23, 2025

धाराशिव जिल्हा पोलिसनामा

  • धाराशिव शहर वाहतुक शाखा व संबंधीत पोलीस ठाण्यांनी महत्त्वाच्या रस्त्यांवर दि.24डिसेंबर रोजी मोटार वाहन कायदा- नियम भंग प्रकरणी एकुण 307 कारवाया करुन 2,40,150 ₹ ‘तडजोड शुल्क’वसुल केले आहे.
    “ अवैध मद्य विरोधी कारवाई.”
    पोलीस अधीक्षक संजय जाधव, अपर पोलीस अधीक्षक गौहर हसन यांच्या मार्गदर्शनाखाली काल मंगळवार दि.24.12.2024 रोजी अवैध मद्य विरोधी धाराशिव जिल्हयात पोलीस ठाणे हद्दीत 7 कारवाया करण्यात आल्या. या छाप्यात घटनास्थळावर आढळलेले 200 लिटर गावठी दारु निर्मीतीचे गुळमिश्रीत रासायनिक द्रव व सुमारे 255 लि.गावठी दारु व देशी विदेशी दारुच्या 14 सिलबंद बाटल्या असे मद्य जप्त करण्यात आले. सदर जप्त मद्य यांची एकत्रीत किंमत अंदाजे 38,130 ₹ आहे.यावरुन महाराष्ट्र मद्य मनाई कायद्यांतर्गत संबंधीत पोलीस ठाण्यात 7 गुन्हे खालीलप्रमाणे नोंदवण्यात आले आहेत
  • 1)ढोकी पो ठाणेच्या पथकाने 4 ठिकाणी छापे टाकले. आरोपी नामे-अच्युत छगन काळे, वय 74 वर्षे, रा. पारधीपीडी तेर ता. जि. धाराशिव हे 13.00 वा. सु. पारधी पिढी तेर येथे रोडलगत अंदाजे 2,400 किंमतीची 40 लिटर गावठी अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली. आरोपी नामे-सुनिल नरसिंग देशमुख, वय 27 वर्षे, रा. जागजी ता. जि. धाराशिव हे 14.35 वा. सु. हॉटेल देसाई समोरील शेतात सुंभा रोड जागजी येथे अंदाजे 2,400 किंमतीची 30 लि. गावठी अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली. आरोपी नामे-रोहित सत्यवान पंतगे, वय 25 वर्षे, रा. कोंड ता. जि. धाराशिव हे 16.20 वा. सु. हॉटेल बागवान समोर चिकन दुकानासमोर कोंड येथे अंदाजे 3,200 किंमतीची 40 लि. गावठी अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली. आरोपी नामे-रेखाबाई गणपत काळे, वय 42 वर्षे, रा.तडवळे ता. जि. धाराशिव या 15.35 वा. सु. तडवळे येथे अंदाजे 6,000 किंमतीची 75 लि. गावठी अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली.
  • 2) आंबी पो.ठाणेच्या पथकाने 1 ठिकाणी छापा टाकला. आरोपी नामे-सुरेंद्र अरुण कानारकर,रा.भातुकली ता. धामनगाव जि अमरावती ह.मु. बंगाळवाडी ता.परंडा जि. धाराशिव हे 16.30 वा. सु. हॉटेल सिनाईच्या आडोशाला अंदाजे 980 किंमतीच्या देशी विदेशी दारुच्या 14सिलबंद बाटल्या अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेल्या जप्त करण्यात आल्या.
  • 3)येरमाळा पो ठाणेच्या पथकाने 2 ठिकाणी छापे टाकले. आरोपी नामे-भाउ नवनाथ शिंदे, वय 32 वर्षे, रा.मोहा ता. कळंब ह.मु. चोराखळी साखर कारखाना ता.कळंब जि. धाराशिव हे 11.30 वा. सु. आपल्या राहत्या घरासमोर अंदाजे 20,000 किंमतीचे 200 लिटर गावठी अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेले जप्त करण्यात आले. आरोपी नामे-उध्दव भाउ काळे, वय 50 वर्षे, रा. चोराखळी ता. कळंब जि. धाराशिव हे 17.40 वा. सु. आपल्या राहत्या घरासमोर अंदाजे 3,150 किंमतीची 30 लि. गावठी अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली.
  • “ जुगार विरोधी कारवाई.”
  • वाशी पोलीस ठाणे :जुगार विरोधी कारवाई दरम्यान वाशी पोलीसांनी दि.24.12.2024 रोजी 15.20 वा. सु. पो ठाणे वाशी हद्दीत मुख्य चौकाचे उजवे बाजूस पत्र्याचे शेडमध्ये छापा टाकला. यावेळी आरोपी नामे-रविंद्र पोपटराव देवकर, वय 49 वर्षे, रा. ब्राम्हण गल्ली वाशी ता. वाशी जि. धाराशिव हे 15.20 वा. सु. मुख्य चौकाचे उजवे बाजूस पत्र्याचे शेडमध्ये कल्याण मटका जुगाराचे साहित्यासह एकुण 650 ₹ रक्कम स्वत:चे कब्जात बाळगलेले वाशी पो. ठाणेच्या पथकास आढळले. यावरुन पोलीसांनी जुगार साहित्यासह रक्कम जप्त करुन नमूद व्यक्तींविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम- 12 (अ) अन्वये वाशी पो ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे.
  • भुम पोलीस ठाणे :जुगार विरोधी कारवाई दरम्यान भुम पोलीसांनी दि.24.12.2024 रोजी 00.30 वा. सु. पो ठाणे भुम हद्दीत आलमप्रभु रोड नगर परिषद येथे छापा टाकला. यावेळी आरोपी नामे-सुनिता महादेव काळे, वय 28 वर्षे, रा. पारधी पिढी भुम ता. भुम जि. धाराशिव हे 00.30 वा. सु.आलमप्रभु रोड नगर परिषद येथे सुरट मटका जुगाराचे साहित्यासह एकुण 970 ₹ रक्कम स्वत:चे कब्जात बाळगलेले भुम पो. ठाणेच्या पथकास आढळले. यावरुन पोलीसांनी जुगार साहित्यासह रक्कम जप्त करुन नमूद व्यक्तींविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम- 12 (अ) अन्वये भुम पो ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे.
  • “ मालमत्तेविरुध्द गुन्हे.”
  • मुरुम पोलीस ठाणे :फिर्यादी नामे-छाया फुलचंद सोमवंशी, वय 40 वर्षे, रा. आष्टाकासार ता. लोहारा जि. धाराशिव यांचे राहते घराचे कुलूप अज्ञात व्यक्तीने दि.23.12.2024 रोजी 22.00 ते दि. 24.12.2024 रोजी 05.00वा. सु. तोडून घरात प्रवेश करुन मोबाईल फोन, 6 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व चांदीचे पंचपाळ, गणपती व रोख रक्कम 5,000₹ असा एकुण 36,500₹ किंमतीचा माल चोरुन नेला. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-छाया सोमवंशी यांनी दि.24.12.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन मुरुम पो ठाणे येथे भा.न्या.सं.कलम 331(4),305(ए) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
  • ढोकी पोलीस ठाणे :फिर्यादी नामे-असरेंद्र अविनाश भालेराव, वय 50 वर्षे, रा. धाराशिव ता. जि. धाराशिव यांचे कोंबडवाडी शिवारातील शेत गट नं 113 मधील स्प्रिंकलर चे 6 नोजल एकुण 8,100₹ किंमतीचे हे दि. 22.12.2024 रोजी 19.30 ते दि. 23.12.2024 रोजी 10.00 वा. सु. अज्ञात व्यक्तीने चोरुन नेले.अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-असरेंद्र भालेराव यांनी दि.24.12.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन ढोकी पो ठाणे येथे भा.न्या.सं.कलम 303(2), अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
  • लोहारा पोलीस ठाणे :फिर्यादी नामे-मारुती राम सास्तुरे, वय 32 वर्षे, रा. धाकटीवाडी ता. उमरगा जि. धाराशिव यांचा अंदाजे 1,50,000₹ किंमतीचा न्यु हॅलंड 3630 टीएक्स टॅक्टरचे हेउ क्र एमएच 25 एएल 5028 हा दि.23.12.2024 रोजी 22.00 वा. सु. भाउसाहेब साखर कारखाना लोहारा येथुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेला.अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-मारुती सास्तुरे यांनी दि.24.12.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन लोहारा पो ठाणे येथे भा.न्या.सं.कलम 303(2), अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
  • नळदुर्ग पोलीस ठाणे :फिर्यादी नामे-ज्योती रोहीत पाटील, वय 30 वर्षे, रा.सेक्टर 1 रुम नं 182 घनसोली नवी मुंबई या व त्यांच्या आई अशा मुंबई ते त्रिकोळी ता. उमरगा असे ट्रॅव्हल्स क्र एआर 01 क्यु 5616 मधून जात असताना दि.22.12.2024 रोजी 07.00 ते 07.30 वा. सु. ट्रॅव्हल्स दिल्ली दरबार हॉटेल नळदुर्ग येथे थांबली असता ज्योती यांचे बॅगमधील पर्स मध्ये ठेवलेले 99 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने असा एकुण 2,97,000₹ किंमतीचा माल अज्ञात व्यक्तीने चोरुन नेला. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-ज्योती पाटील यांनी दि.24.12.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन नळदुर्ग पो ठाणे येथे भा.न्या.सं.कलम 303(2), अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
  • “मारहाण.”
  • लोहारा पोलीस ठाणे : आरोपी नामे-बस्वराज सिद्राम पाटील, विरभद्र बस्वराज पाटील दोघे रा. कास्ती खु.ता.लोहारा जि. धाराशिव यांनी दि.24.12.2024 रोजी 06.30 वा.सु.बसवेश्वर चौकात कास्ती खु.येथे फिर्यादी नामे-सतिश निळकंठ पाटील, वय 42 वर्षे,रा.कास्ती खुर्द ता. लोहारा जि.धाराशिव यांना नमुद आरोपीने मुलास मारण्याचे कारणावरुन शिवीगाळ लाथाबुक्यांनी,काठीने मारहाण करुन जखमी केले. तसेख्‍ फिर्यादीच्या आई आंगिकाबाई यांनाही शिवगाळ करुन जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-सतिश पाटील यांनी दि.24.12.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन लोहारा पो ठाणे येथे भा.न्या.सं. कलम 118(1), 352, 351(2),351 (3),3(5) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
  • “रस्ता अपघात.”
  • उमरगा पोलीस ठाणे: मयत नामे-प्रमोद भानुदास कराळे, वय 41 वर्षे, व सोबत त्यांची पत्नी प्रणिता प्रमोद कराळे, वय 37 वर्षे, रा. तुरोरी ता. उमरगा जि. धाराशिव हे दोघे दि. 18.12.2024 रोजी 20.00 वा. सु. चौरस्ता ते लातुर रोडवर लक्ष्मी पाटी जवळून मोटरसायकलवरुन जात होते. दरम्यान ट्रॅक्टर क्र एमएच 26 बीएक्स 8635 चा चालक आरोपी नामे-बाळासाहेब प्रभु राठोड रा. शेळकेवाडी ता. मुखेड जि. नांदेड यांनी त्याचे ताब्यातील ट्रॅक्‌टर हे हायगयी व निष्काळजीपणे चालवून अचानकपणे कोणतेही इंडीकेटर किंवा इशारा न देता रोडवर घेवून प्रमोद कराळे यांची मोटरसायकलला धडक दिली. या अपघातात प्रमोद कराळे, प्रणिता कराळे हे दोघे गंभीर जखमी होवून मयत झाले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-गणेश शिवाजी सुर्यवंशी, वय 30 वर्षे, रा. चिट्टा ता. बस्वकल्याण जि. बिदर राज्य कर्नाटक यांनी दि.24.12.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन उमरगा पो ठाणे येथे भा.न्या.सं. कलम 281, 106(1) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
  • जनसंपर्क विभाग धाराशिव पोलीस
error: Content is protected !!