August 8, 2025

दीड लाख भाविकांनी घेतला नवरात्र महोत्सव व महाआरोग्य शिबिरात आरोग्य सेवेचा लाभ

  • धाराशिव (जिमाका) – पालकमंत्री प्रा.डॉ.तानाजी सावंत यांच्या संकल्पनेतून 27 ते 29 ऑक्टोबर 2023 या कालावधीत तुळजापूर येथे महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले.श्री शारदीय नवरात्र महोत्सव -2023 तुळजापूर या शहरात विविध मार्गावर 12 ऑक्टोबरपासून भाविकांना आरोग्य सेवा देण्याची व्यवस्था करण्यात आली.तुळजापूर येथे नवरात्र महोत्सव आणि महाआरोग्य शिबिरात आज 29 ऑक्टोबरपर्यंत 1 लाख 57 हजार 613 भाविकांनी आरोग्य सेवांचा लाभ घेतला.राज्यासह शेजारच्या कर्नाटक, तेलंगणा,आंध्रप्रदेश राज्यातील भाविकांचा यामध्ये समावेश आहे. यामध्ये 74 हजार 339 महिला आणि 83 हजार 274 पुरुष भाविकांचा समावेश आहे.
    तुळजापूर येथे नवरात्र महोत्सवादरम्यान 12 ऑक्टोबरपासून 7 हजार 961 भाविकांना आयसीयू हॉस्पिटलद्वारे उपचार देण्यात आले. 70 हजार 293 भाविकांना प्रथमोपचार केंद्रामार्फत प्रथमोपचार करण्यात आले.दुचाकी रुग्णवाहिकेद्वारे 5 हजार 439 भाविकांवर प्रथमोपचार करण्यात आले.आरोग्यदूतामार्फत 14 हजार 501 भाविकांना,रुग्णवाहिकांमार्फत 2781 रुग्णांवर उपचार आणि 335 संदर्भित सेवा देण्यात आल्या. आंतररुग्ण सेवा 645 रुग्णांना देण्यात आल्या.
    तुळजापूर येथे सोलापूर मार्गावरील घाटशीळ पायथा येथे 27 ऑक्टोबरपासून ते 29 ऑक्टोबर या कालावधी सुरू असलेल्या महाआरोग्य शिबिरात तुळजापूर येथे येणाऱ्या भाविकांना तसेच ग्रामीण भागातील नागरिकांना मोफत आरोग्य तपासणी मोफत उपचार उपलब्ध करून देण्यात आले.यामध्ये आरोग्य तपासणी,हाडांची,डोळ्यांची,दंत, हृदयरोग,रक्तक्षय,कान,नाक,घसा तपासणी,चष्म्यांचे वितरण,इसीजी व रक्तगट तपासणी इत्यादी सुविधा देण्यात आल्या.
    27 ऑक्टोबर रोजी सकाळी 8 वाजतापासून सुरू करण्यात आलेल्या महाआरोग्य शिबिरामध्ये आज 29 ऑक्टोबर रोजी एकूण 71 हजार 215 भाविकांनी शिबिराचा लाभ घेतला.यामध्ये 40 हजार 75 पुरुष व 31 हजार 140 महिला भाविकांचा समावेश आहे.
    विशेषज्ञ डॉक्टरांमार्फत एकूण 15 हजार 260 भाविकांवर उपचार करण्यात आले.9478 भाविकांना चष्मे वाटप करण्यात आले.4293 भाविकांची रक्त तपासणी,सोनोग्राफी, टू डी,इको,ईसीजी व इतर चाचण्या करण्यात आल्या.डेंटल व्हॅन व मोबाईल मेडिकल युनिटद्वारे एक्स-रे गर्भाशय मुखाच्या कॅन्सरची तपासणी इत्यादी सुविधांचा 1038 भाविकांनी लाभ घेतला.
error: Content is protected !!