कळंब – मराठा समाजाला आरक्षण द्यावे, या मागणीसह मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी कळंब तालुक्यातील विविध रस्त्यांवर दि.२८ ऑक्टोबर २०२३ वार शनिवारी चक्काजाम आंदोलन करण्यात आले. यामुळे वाहतूक प्रभावित झाली होती. कळंब शहर या आंदोलनाचे केंद्रबिंदू ठरत आहे. शहरात कैंडल मार्च, आरक्षणाला विरोध करणाऱ्या नेत्यांची प्रतीकात्मक अंत्ययात्रा, बोंबा मारो आंदोलन, पुतळा जाळणे अशी अनेक आंदोलने मागच्या तीन-चार दिवसांत झाली आहेत. आंदोलनाचा हा वणवा आता ग्रामीण भागात पोहचला असून शनिवारी सकाळी नऊ वाजल्यापासूनच कळंब-ढोकी राज्य मार्गावर पिंपळगाव (डोळा) पाटी येथे पहिले चक्काजाम आंदोलन सुरू झाले.यावेळी रस्ता अडवून, टायर जाळून निषेध करण्यात आला. हे आंदोलन जवळपास सहा तास चालले. यानंतर कळंब शहरातील छत्रपती संभाजी महाराज चौकातही असेच चक्काजाम आंदोलन सुरू झाले. याठिकाणी रस्ता अडवून टायर जाळण्यात आले. तीव्र घोषणाबाजी करत आंदोलन करण्यात आल्याने वाहतूक ठप्प झाली होती. वाकडी केज या गावातही इतर जिल्हा मार्ग अडवण्यात आला होता. येरमाळा रोडवरील हासेगाव गावालगतही असेच आंदोलन करून रास्ता रोको करण्यात आला. दोन तास चाललेल्या या आंदोलनादरम्यान टायर जाळून निषेध व्यक्त करण्यात आला.
More Stories
संचालिका सौ.अंजली मोहेकर यांची विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिरास सदिच्छा भेट
मोहेकर महाविद्यालयात ग्रंथालय शास्त्राच्या राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन
भीमराव दादा सत्यवचनी व्यक्तिमत्व होतं – डॉ. माणिक डिकले