धाराशिव शहर वाहतुक शाखा व संबंधीत पोलीस ठाण्यांनी महत्त्वाच्या रस्त्यांवर दि.18डिसेंबर रोजी मोटार वाहन कायदा- नियम भंग प्रकरणी एकुण 256 कारवाया करुन 3,25,100 ₹ ‘तडजोड शुल्क’वसुल केले आहे.
“ अवैध मद्य विरोधी कारवाई.”
कळंब पोलीस ठाणे:आरोपी नामे-बालु बन्सी काळे, वय 56 वर्षे, रा. बोर्डा ता. कळंब जि. धाराशिव हे दि.18.12.2024 रोजी 17.30 वा. सु. कळंब ते मोहा जाणारे रोडलगत पत्र्याचे शेडचे बाजूस बोर्डा शिवार येथे अंदाजे 6,300 ₹ किंमतीचे 150 लि. गावठी दारु निर्मीतीचे गुळमिश्रीत रासायनिक द्रव अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेले जप्त करण्यात आले. आरोपी नामे-मंगल दत्ता काळे, वय 45 वर्षे, रा. मस्सा खं ता. कळंब जि. धाराशिव या दि.18.12.2024 रोजी 17.30 वा. सु.मस्सा खं. गावात अंदाजे 2,000 ₹ किंमतीची 20 लि. गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली. आरोपी नामे-अनिल उत्तम काळे, वय 41 वर्षे, रा. महादेवनगर कोठाळवाडी ता. कळंब जि. धाराशिव हे दि.18.12.2024 रोजी 18.00 वा. सु.ईटकुर येथे अंदाजे 1,500 ₹ किंमतीची 15 लि. गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली. आरोपी नामे-संजना रामदास शिंदे, वय 21 वर्षे, रा. मार्केट यार्ड जवळ कळंब ता. कळंब जि. धाराशिव या दि.18.12.2024 रोजी 17.30 वा. सु.पाण्याचे टाकी जवळ मार्केट यार्ड कळंब येथे अंदाजे 1,440 ₹ किंमतीची 18 लि. गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली. यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम- 65(ई) अन्वये कळंब पो ठाणे येथे स्वतंत्र 4 गुन्हे नोंदविले आहेत.
ढोकी पोलीस ठाणे:आरोपी नामे-गणा उजण्या काळे, वय 65 वर्षे, रा. राजेशनगर ढोकी ता. जि. धाराशिव हे दि.18.12.2024 रोजी 18.05 वा. सु. टेकडीजवळ ढोकी येथे अंदाजे 3,000 ₹ किंमतीची 30 लि. गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली. यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम- 65(ई) अन्वये ढोकी पो ठाणे येथे स्वतंत्र 3 गुन्हे नोंदविले आहेत.
“ जुगार विरोधी कारवाई.”
भुम पोलीस ठाणे :जुगार विरोधी कारवाई दरम्यान भुम पोलीसांनी दि.18.12.2024 रोजी 17.30 वा. सु. पो ठाणे भुम हद्दीतील आलमप्रभु रोडवरील झेंडा चौक भुम येथे छापा टाकला. यावेळी आरोपी नामे-सागर श्रीमंत मिसाळ, वय 35 वर्षे, रा.लक्ष्मीनगर भुम ता. भुम जि. धाराशिव हे 17.30 वा. सु. आलमप्रभु रोडवरील झेंडा चौक भुम येथे सुरट मटका जुगाराचे साहित्यासह एकुण 490 ₹ रक्कम स्वत:चे कब्जात बाळगलेले भुम पो. ठाणेच्या पथकास आढळले. यावरुन पोलीसांनी जुगार साहित्यासह रक्कम जप्त करुन नमूद व्यक्तींविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम- 12 (अ) अन्वये भुम पो ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे.
ढोकी पोलीस ठाणे :जुगार विरोधी कारवाई दरम्यान ढोकी पोलीसांनी दि.18.12.2024 रोजी 12.15 वा. सु. पो ठाणे ढोकी हद्दीत पेट्रोलपंप चौक ढोकी येथे छापा टाकला. यावेळी आरोपी नामे- सुभाष दादाहारी गाढवे, वय 40 वर्षे, रा.ढोकी ता. जि. धाराशिव हे 12.15 वा. सु. पेट्रोपंप चौक ढोकी येथे कल्याण मटका जुगाराचे साहित्यासह एकुण 1,010 ₹ रक्कम स्वत:चे कब्जात बाळगलेले ढोकी पो. ठाणेच्या पथकास आढळले. यावरुन पोलीसांनी जुगार साहित्यासह रक्कम जप्त करुन नमूद व्यक्तींविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम- 12 (अ) अन्वये ढोकी पो ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे.
“ रहदारीस धोकादायकरित्या वाहन उभी करणाऱ्यावर गुन्हा नोंद.”
आनंदनगर पोलीस ठाणे :सार्वजनिक रस्त्यावर रहदारिस धोकादायक रित्या वाहने उभे करणाऱ्या चालकांवर आनंदनगर पो.ठा.च्या पथकाने दि.18.12.2024 रोजी 11.00 वा. सु. कारवायी केली. यात अजहर जाफर शेख, वय 22 वर्षे, रा. सांजा गाव ता. जि. यांनी 11.00 वा. सु. बसस्थानक धाराशिव समोर ॲटो रिक्षा क्र एम.एच. 25 ए.के. 1351 हा सार्वजनिक रस्त्यावर रहदारीस धोकादायक रित्या उभे करुन भा.दं.सं.कलम- 285 चे उल्लंघन केले.यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तीविरुध्द आनंदनगर पो.ठा.येथे गुन्हा नोंदवला आहे.
हे व त्यांचा भाच्चा संजु हणुमंत एकलुरे असे ट्रक क्र के.ए.56-4380 मध्ये हैद्राबाद येथुन 24 टन 770 किलो वजनाच कॉपरचे रॉड लोड करुन शिलवासा येथे खाली करण्यासाठी घेवून जात होते. दरम्यान नळदुर्ग ते तुळजापूर रोडवरील गंधोरा पाटीच्या पुढे एक काळसर रंगाचे विना नंबरची स्विफट कार मधून अनोळखी पाच इसमातील एकाने हात करुन ट्रक बाजूला घ्यायला सांगितले असता फिर्यादीने ट्रक बाजूला असता नमुद इसमांनी आम्ही फायनांन्स वाले आहोत असे सांगून तुमचे ट्रकचे हप्ते भरणे बाकी आहे म्हणून फिर्यादी व त्यांचा भाच्चा यांना लाथाबुक्यांनी मारहाण करुन बळजबरीने त्याचे कार मध्ये बसवून चाकूचा धाक दाखवून ट्रक क्र के.ए.56-4380, तीन मोबाईल फोन, ट्रक मधील कॉपरचे रॉड 24 टन 770 किलो असा एकुण 60,11,000₹ किंमतीचा माल जबरीने लुटून पसार झाले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-रेवण्प्पा शेडुळे यांनी दि.18.12.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन नळदुर्ग पो ठाणे येथे भा.न्या.सं.कलम 310(2), 126(2) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
आनंदनगर पोलीस ठाणे :फिर्यादी नामे-सोनी विजयकुमार गुंड, वय 30 वर्षे, रा.शिवनेरी नगर सांजा रोड धाराशिव ता. जि. धाराशिव यांचे राहते घराचे कडी अज्ञात व्यक्तीने दि.18.12.2024 रोजी 08.30ते 12.00 वा. सु.उघडून घरामध्ये प्रवेश करुन घरातील कपाटात ठेवलेले सोन्या चांदीचे दागिने एकुण 1,81,000₹ किंमतीचे चोरुन नेले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-सोनी गुंड यांनी दि.18.12.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन आनंदनगर पो ठाणे येथे भा.न्या.सं.कलम 331(3),305(अ) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
कळंब पोलीस ठाणे :दि.12.07.2024 रोजी 21.00 वा. सु. ते दि. 06.09.2024 रोजी 14.50 वा. सु. हावरगाव व शेरेगल्ली कळंब येथुनइंडस टॉवरचे टॉपचे Airtel चे दोन azna Cared, जंपर केबल सीप्री केबल असा एकुण 20,000₹ किंमतीचा माल अज्ञात व्यक्तीने चोरुन नेला. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-महादेव पंडीत ढवण, वय 40 वर्षे, रा. खंडाळा ता. तुळजापूर जि. धाराशिव यांनी दि.18.12.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन कळंब पो ठाणे येथे भा.न्या.सं.कलम 303(2), अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
वाशी पोलीस ठाणे :फिर्यादी नामे- श्रीकांत विठ्ठलदास हेड्डा, वय 57 वर्षे, रा. शिवाजी नगर लातुर ता.जि. लातुर यांचे मुलीच्या बॅगमधील व इतर नातेवाईक यांच्या ट्रॅव्हल्स वरील बॅगमधील सोन्याचे दागिने व रोख रक्कम 2,44,000₹ किंमतीचा माल हा दि. 14.12.2024 रोजी 23.30 वा. सु. येडशी टोलनाका ते देवनारायण हॉटेल जवळील इंडीयन ऑईल पेट्रोल पंप दरम्यान अज्ञात व्यक्तीने चोरुन नेला. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-श्रीकांत हेड्डा यांनी दि.18.12.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन वाशी पो ठाणे येथे भा.न्या.सं.कलम 303(2), अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
“मारहाण.”
तामलवाडी पोलीस ठाणे :आरोपी नामे- राजेंद्र शामराव पाटील, वय 49 वर्षे,, सुहास उर्फ बाळू भगवान टोले, वय 30 वर्षे, सविता भगवान टोले, वय 40 वर्षे, राजेंद्र पाटील, वय 32 वर्षे, दोन अनोळखी इसम सर्व रा.तुळजापूर ता.तुळजापूर जि. धाराशिव यांनी दि.16.12.2024 रोजी 12.30 वा. सु. फिर्यादी नामे- विश्वनाथ ज्योती पाटील, वय 30 वर्षे, रा. मसला खुर्द ता. तुळजापूर जि. धाराशिव यांना नमुद आरोपींनी शेतीच्या वादाचे कारणावरुन गैरकायद्याची मंडळी जमवून शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, लोखंडी कुह्राडीचा तुंबा, कुदळीचा तुंबा व काठीने मारहाण करुन गंभीर जखमी केले.तसेच फिर्यादीचे नातेवाईकांना ही नमुद आरोपींनी शिवीगाळ करुन मारहाण केली. व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-विश्वनाथ पाटील यांनी दि.18.12.2024रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन तामलवाडी पो ठाणे येथे भा.न्या.सं. कलम 118(2), 115(2), 352, 351(2) (3), 189(2), 191(2), 190 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
“रस्ता अपघात.”
तुळजापूर पोलीस ठाणे: मयत नामे-वैशाली गोकुळ गायकवाड, वय 30 वर्षे, रा.सेटलमेंट फ्री कॉलनी नं 06 विजापूर रोड सोलापूर जि. सोलापूर या व सोबत त्यांचे जावई हे दोघे दि.12.12.2024 रोजी 21.30 वा.सु.मोटरसायकल क्र एमएच 13 ए.जी. 1337 वरुन तावशीगड येथुन सोलापुरकडे जात होते. दरम्यान मोटरसायकल क्र एमएच 43 बी.यु. 1963 चा चालकाने त्याचे ताब्यातील मोटरसायकल ही हायगयी व निष्काळजीपणे चालवून वैशाली गायकवाड यांचे जावई चालवत असलेल्या मोटरसायकलला पाठीमागून धडक दिली. या अपघातात वैशाली गायकवाड हे गंभीर जखमी होवून मयत झाले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-सुनिता विठ्ठल गायकवाड, वय 58 वर्षे, रा. सेटलमेंट फ्री कॉलनी नं 06 विजापूर रोड सोलापूर जि. सोलापूर यांनी दि.18.12.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन तुळजापूर पो ठाणे येथे भा.न्या.सं. कलम 281, 125(ए), 125(बी), 106 सह 184 मो वा का अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
अगामी काळात साजरा होणारऱ्या मकरसंकृती सणा निमीत्त पंतग उडवण्याची पंरपरा असुन सदर पंतगास नायलॉन मांजा वापरला जाणण्याची शक्यता असल्याने सदर नायालॉन मांजा मुळे प्राणी/ पक्षी व मानवावर होणारे दुष्परिणामा होणार नाही. यासाठी मा. पोलीस अधीक्षक श्री. संजय जाधव यांनी धाराशिव जिल्ह्यात नायलॉन मांजा विक्री करण्याची शक्यता असणारे दुकानादार, जनरल स्टोअर्स यांचे कडे शोध घेवून कार्यवाही करुन, नोटीस देवून जनजागृती करण्यासाठी विशेष मोहिम दि.14.12.2024 ते दि. 17.12.2024 या कालावधीत राबविण्यात आली. विशेष मोहिमे दरम्यान जिल्ह्यातील 18 पोलीस ठाणी या सर्वांनी शाळा, महाविद्यालये,गर्दीचे ठिकाणे इत्यादी ठिकाणी 86 हुन अधिक जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन केले. जनजागृती दरम्यान पोलीसांनी 128 दुकानदार यांना नायलॉन मांजा विक्री करु नये म्हणून नोटीस देण्यात आल्या आहेत. तसेच धाराशिव जिल्ह्यातील जनतेस आवाहन करण्यात येते की, पंतगाला नायलॉन मांजाचा वापर करु नये त्यामुळे मानावाचे जिवीतास धोका निर्माण होवून प्राणी/पक्षी व मानवावर दुष्परिणाम होत आहे. नायलॉन मांजाचा वापर केल्यास त्यांचेवर कारवाई करण्यात येईल. असे आवाहन मा. पोलीस अधीक्षक श्री. संजय जाधव यांनी जनतेस केले आहे.
More Stories
निवडणुकीत ७ लक्ष ४७ हजार ३७० मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क
इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या पुरस्काराकरिता अर्ज करण्याचे आवाहन
मतदानाचा हक्क बजावण्यासाठी कामगारांना ७ फेब्रुवारी रोजी भरपगारी रजा देणे बंधनकारक