March 26, 2026

शेतकऱ्यांवर पवनचक्की मालकाकडून पोलीस व बाऊन्सर मार्फत होणारी गुंडागर्दी थांबवा- आमदार कैलास पाटील

  • धाराशिव- तुळजापूर तालुक्यातील जवळगा मेसाई गावामध्ये काही दिवसापूर्वी बाऊन्सरच्या माध्यमातून दहशत पसरविण्याचा प्रकार घडला होता.आमदार कैलास पाटील यांनी विधानसभेत औचिताच्या मुद्द्यामध्ये हा विषय सभागृहात मांडला.यावेळी त्यांनी पवनचक्की मालकाची दहशत मोडून काढत संबधित लोकांवर योग्य कारवाई करण्याची मागणी आमदार पाटील यांनी केली.
    यावेळी पाटील म्हणाले की, धाराशिव जिल्ह्यामध्ये मागील काही वर्षांपासून पवनचक्की उभारण्याचे काम मोठ्या प्रमाणात सुरु झाले आहे. त्यासाठी आवश्यक जमिनी घेताना कंपनीच्या लोकांकडून दहशत निर्माण करून शेतकऱ्यांना दमदाटी करण्याचे प्रकार वाढले आहेत.मागच्याच आठवड्यात तुळजापूर तालुक्यातील जवळगा मेसाई गावात काळ्या रंगाच्या दहा ते बारा गाड्या आल्या.त्यातून मोठया संख्येनं बाऊन्सर उतरले व त्यांनी शेतकऱ्यांना दमदाटी केल्याचं समोर आलं आहे. याप्रकरणी पोलीस बघ्याची भूमिका घेत राहिले.अश्यावेळी पोलीस तक्रारीची वाट पाहतात अनेक प्रकरणात पोलीस स्वतः हुन कारवाई करतात.त्याप्रमाणे अश्या प्रकरणी देखील अशीच कारवाई अपेक्षित आहे.काही ठिकाणी तर पोलीसच या कंपनीच्या लोकांना सहकार्य करताना दिसतात मग अश्यावेळी शेतकऱ्यांनी न्याय तर कोणाकडे मागायचा असाही मुद्दा उपस्थित केला. यासाठी ही दहशत मोडून काढणे आवश्यक आहे म्हणून पोलीस व गुंडागर्दी करणाऱ्या बाऊन्सर वर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी आमदार कैलास पाटील यांनी केली आहे.
error: Content is protected !!