June 25, 2026

गोविंदपूर येथे स्व.गोपीनाथ मुंडे यांची जयंती साजरी

  • गोविंदपूर (अविनाश सावंत) – कळंब तालुक्यातील गोविंदपुर येथे स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी संपूर्ण गावामधून गोपीनाथ मुंडे यांच्या प्रतिमेची ढोलताशाच्या गजरात भव्य मिरवणूक काढून जयंती साजरा करण्यात आली.
    तसेच त्यांच्या जयंतीनिमित्त भव्य रक्तदान शिबिर ठेवण्यात आली होती.यावेळी गोविंदपूर येथील वीस रक्तदात्यांनी रक्तदान केले.रेणुका ब्लड बँक धाराशिव यांनी रक्तदान शिबीर यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. तसेच यावेळी सरपंच,उपसरपंच व गावातील प्रतिष्ठीत नगरिक आणि समस्त ग्रामस्थांनी उपस्थित होते.
error: Content is protected !!