August 9, 2025

बंद शौचालये सुरू केल्याबद्दल मुख्याधिकारी वसुधा फड यांचा सत्कार

  • धाराशिव – वार्ड क्रमांक ११, नगर परिषद शाळा क्रमांक ३ व सांजा रोड जवळील शौचालय बंदावस्थेत होती.त्यामुळे परिसरातील नागरिकांना शौचास जाण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. याबाबत या परिसरातील नागरिकांनी मुख्याधिकारी यांच्याकडे दि.२५ नोव्हेंबर रोजी एका निवेदनाद्वारे सदरील शौचालये सुरू करण्याची मागणी केली होती.तत्पर मुख्याधिकारी वसुधा फड यांनी वरील ठिकाणची शौचालये नागरिकांना वापरासाठी सुरू करून दिली आहेत.
    त्यामुळे या भागातील नागरिकांच्या वतीने महिलांनी मुख्याधिकारी फड यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचा दि.१२ डिसेंबर रोजी सत्कार केला.
    नगर परिषदेच्यावतीने बांधलेली शौचालय ही फक्त शोभेची वस्तू बनली होती.त्याचा वापर करता येत नसल्यामुळे या परिसरातील नागरिकांची अडचण व कुचंबना होत होती.त्यामुळे ती शौचालय तात्काळ सुरू करावीत,अशी मागणी केली होती.अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल,असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्यावतीने जिल्हाध्यक्ष निलेश जाधव यांनी एका निवेदनाद्वारे मुख्याधिकाऱ्यांना दि.२५ नोव्हेंबर रोजी दिला होता. महिला व विद्यार्थीनी यांना शौचास जाण्यास कुठलाही मार्ग नसल्यामुळे त्यांना नाईलाजास्तव उघड्यावर शौचास जावे लागत होते.तर सांजा रोड येथे शौचालय चालू अवस्थेत आहे.परंतू त्या ठिकाणी पाणी व स्वच्छता नसल्यामुळे या ठिकाणी नागरिक जाण्यास मज्जाव करीत होते. त्या ठिकाणी पाणी व एका व्यक्तीची नियुक्ती करण्यात आली आहे. वरील ठिकाणांची शौचालये सुरु करुन नागरिकांची होणारी गैरसोय.यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष निलेश जाधव यांच्यासह प्रदेश कार्यकारणी सदस्य अभिजीत पतंगे, अभिषेक कुऱ्हाडे,आशिष कुऱ्हाडे,रोहित जाधव,गीता पवार,रेश्मा जाधव,अरुणा घोडके,मनीषा देवकर,नंदा जाधव,लता जाधव,शरद पवार रुक्मिणी जाधव यांच्यासह या परिसरातील महिला व पुरुष उपस्थित होते.
error: Content is protected !!