August 9, 2025

धाराशिव जिल्हा पोलीसनामा

  • धाराशिव शहर वाहतुक शाखा व संबंधीत पोलीस ठाण्यांनी महत्त्वाच्या रस्त्यांवर दि.11 डिसेंबर रोजी मोटार वाहन कायदा- नियम भंग प्रकरणी एकुण 222 कारवाया करुन 1,93,950 ₹ ‘तडजोड शुल्क’वसुल केले आहे.
  • “ अवैध मद्य विरोधी कारवाई.”
  • आंबी पोलीस ठाणे:आरोपी नामे-नामदेव गणपत गाढवे, वय 24 वर्षे, रा. देउळगाव ता. परंडा जि. धाराशिव हे दि.11.12.2024 रोजी 15.30 वा. सु. धाडस किराणा स्टोअर्स पत्राचे शेडच्या पाठीमागे देउळगाव येथे अंदाजे 910₹ किंमतीच्या देशी विदेशी दारुच्या 13 सिलबंद बाटल्या अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेल्या जप्त करण्यात आल्या. यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम- 65(ई),अन्वये आंबी पो ठाणे येथे गुन्हा नोंदविला आहे.
  • मुरुम पोलीस ठाणे:आरोपी नामे-जगदीश ईश्वरअप्पा देशेट्टे, वय 32 वर्षे, रा. आलुर ता. उमरगा जि. धाराशिव हे दि.11.12.2024 रोजी 21.00 वा. सु. आलुर येथे पाण्याचे टाकीजवळ वडारवस्ती येथे रोडलगत अंदाजे 4,000 ₹ किंमतीची 40 गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेल्या जप्त करण्यात आल्या. यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम- 65(ई),अन्वये मुरुम पो ठाणे येथे गुन्हा नोंदविला आहे.
  • “ जुगार विरोधी कारवाई.”
  • मुरुम पोलीस ठाणे :जुगार विरोधी कारवाई दरम्यान मुरुम पोलीसांनी दि.11.12.2024 रोजी 13.45 वा. सु.मुरुम पो ठाणे हद्दीत आष्टाकासार येथील बसस्थानक जवळ छापा टाकला. यावेळी आरोपी नामे-प्रमोद नागप्पा सोलापुर, वय 55 वर्षे, रा.आष्टाकासार ता. लोहारा जि. धाराशिव हे 13.45 वा. सु. आष्टाकासार येथील बसस्थानक जवळ कल्याण मटका जुगाराचे साहित्यासह एकुण 600 ₹ रक्कम स्वत:चे कब्जात बाळगलेले मुरुम पो. ठाणेच्या पथकास आढळले. यावरुन पोलीसांनी जुगार साहित्यासह रक्कम जप्त करुन नमूद व्यक्तींविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम- 12 (अ) अन्वये मुरुम पो ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे.
  • “ रहदारीस धोकादायकरित्या वाहन उभी करणाऱ्यावर गुन्हा नोंद.”
  • मुरुम पोलीस ठाणे :सार्वजनिक रस्त्यावर रहदारिस धोकादायक रित्या वाहने उभे करणाऱ्या चालकांवर मुरुम पो.ठा.च्या पथकाने काल दि.11.12.2024 रोजी 12.30 वा.सु. आरोपी नामे- राजु शांताप्पा गायकवाड, वय 23 वर्षे, रा. आष्टाकासार ता. लोहारा जि. धाराशिव यांनी 12.30 वा. सु. आष्टाकासार ते आष्टामोड जाणारे रोडवर ॲटो रिक्षा क्र एम.एच. 13 एएफ 2070 ही सार्वजनिक रस्त्यावर रहदारीस धोकादायक रित्या उभे करुन भा.दं.सं.कलम-285 चे उल्लंघन केले.यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तीविरुध्द मुरुम पो.ठा.येथे गुन्हा नोंदवला आहे.
  • “ मद्यपी चालकावर गुन्हा दाखल.”
  • उमरगा पोलीस ठाणे:आरोपी नामे-धनराज दत्तात्रय बिराजदार, वय 30 वर्षे, रा.जकेकुर ता. उमरगा जि. धाराशिव हे दि.10.12.2024 रोजी 21.30 वा. सु.आपल्या ताब्यातील मोटरसायकल क्र एमएच 12 व्हीयु 2237 ही जकेकुर शिवारातील मोर्या टी पॉईंट समोरील एनएच 65 रोडवर उमरगा येथे रोडवर मद्यधुंद अवस्थेत चालवून मो.वा.का. कलम- 185 चे उल्लंघन केले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तीविरुध्द उमरगा पो ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे.
  • “ मालमत्तेविरुध्द गुन्हे.”
  • आनंदनगर पोलीस ठाणे :फिर्यादी नामे-व्यंकटेश अविनाश जोशी, वय 24 वर्षे,रा. विजयनगर सांजा रोड धाराशिव ता. जि. धाराशिव यांची अंदाजे 35,000₹ किंमतीची हिरो स्प्लेंडर प्लस कंपनीची काळ्या रंगाची मोटरसायकल क्र एमएच 25 एक्यु 8292 ही दि.06.12.2024 रोजी 22.00 ते दि. 07.12.2024 रोजी 06.00 वा. सु. व्यंकटेश जोशी यांच्या राहत्या घरासमोरुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली.अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-व्यंकटेश जोशी यांनी दि.11.12.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन आनंदनगर पो ठाणे येथे भा.न्या.सं.कलम 303 ( 2) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
  • वाशी पोलीस ठाणे :फिर्यादी नामे-अरुण सुर्यभान तांबडे, वय 65 वर्षे, रा.पिंपळगाव (कोठावळा), ता. वाशी जि. धाराशिव यांची अंदाजे 20,000₹ किंमतीची होंडा कंपनीची ड्रिम युगा राखाडी रंगाची मोटरसायकल ही दि.10.12.2024 रोजी 22.30 ते दि. 11.12.2024 रोजी 06.00 वा. सु. अरुण तांबडे यांचे राहते घरासमोरुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-अरुण तांबडे यांनी दि.11.12.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन वाशी पो ठाणे येथे भा.न्या.सं.कलम 303( 2) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
  • वाशी पोलीस ठाणे :फिर्यादी नामे-रामचंद्र दगडू डोंबाळे, वय 50 वर्षे, रा. ईट ता. भुम जि. धाराशिव यांचे ईट शिवारातील शेतातील गोठ्यासमोरील ट्रायली मधील सोयाबीनचे 41 कट्टे अंदाजे 80,000₹किंमतीचे अज्ञात व्यक्तीने दि. 10.12.2024 रोजी 22.00 ते दि. 11.12.2024 रोजी 03.00 वा. सु.चोरुन नेले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- रामचंद्र डोंबाळे यांनी दि.11.12.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन वाशी पो ठाणे येथे भा.न्या.सं.कलम 303(2) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
  • आनंदनगर पोलीस ठाणे :फिर्यादी नामे-हनुमंत बाळु विभुते, वय 29 वर्षे, रा.घाटंग्री ता. जि. धाराशिव यांची अंदाजे 25,000₹ किंमतीची हिरो स्प्लेंडर प्लस कंपनीची काळ्या रंगाची मोटरसायकल क्र एमएच 25 एजी 8020 ही दि. 06.12.2024 रोजी 12.30 वरा. सु. पंचायत समिती पोर्च समोर धराशिव येथुन व आकाश तानाजी शेरखाने, वय 29 वर्षे, रा. सांजा रोउ शिवनेरी नगर धाराशिव यांची मोटरसायकल हिरो स्प्लेंडर प्लस कंपनीची काळ्या रंगाची मोटरसायकल क्र एमएच 25 बीडी 1955 ही दि. 09.12.2024 रोजी 00.00 ते 04.00 वा. सु. सांजा रोड शिवनेरी नगर धाराशिव येथुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेल्या. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- हनुमंत विभुते यांनी दि.11.12.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन आनंदनगर पो ठाणे येथे भा.न्या.सं.कलम 303 ( 2) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
  • तामलवाडी पोलीस ठाणे :फिर्यादी नामे-यशवंत नरहरराव कुलकर्णी, वय 54 वर्षे, रा.सावरगाव ता. तुळजापूर जि. धाराशिव यांचे नोकरांनी सावरगाव शिवारातील शेत गट नं 631 मधील द्राक्ष पिकावर फवारण्याची औषधे अंदाजे 1,05,295₹ किंमतीचे हे आरोपी नामे- लाल मोहर कुमार राम, वय 29 वर्षे, परशुराम सुभाष राम, वय 23 वर्षे, छोटुराम वय 20 वर्षे, सुभाष राम, वय 20 वर्षे, सर्व रा. नाथपुर वार्ड नं 10, अरेरीया, जि. नरपथगंज, राज्य बिहार यांनी त्यांचे कडे असलेले चावीने गोदामांचे कुलूप उघडून चोरी नेले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-यशवंत कुलकर्णी यांनी दि.11.12.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन तामलवाडी पो ठाणे येथे भा.न्या.सं.कलम 306,3( 5) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
  • “मारहाण.”
  • आंबी पोलीस ठाणे :आरोपी नामे-शिवाजी भगवान भांडवलकर, संगिता शिवाजी भांडवलकर, विशाल शिवाजी भांडवलकर सर्व रा. वाटेफळ ता.परंडा जि. धाराशिव यांनी दि.03.12.2024 रोजी 16.30 वा. सु. वाटेफळ शिवारातील फड यांचे शेतात वाटेफळ येथे फिर्यादी नामे-सावित्रा हनुमंत भांडवलकर, वय 60 वर्षे, रा. वाटेफळ ता. परंडा जि. धाराशिव यांना नमुद आरोपीने पिकाला पाणी देण्याचे कारणावरुन शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, दगडाने मारहाण करुन ढकलून दिल्याने सावित्रा भांडवलकर यांचा डावा हात फॅक्चर करुन गंभीर जखमी केले. हनुमंत भांडवलकर यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी मारहाण करुन जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-सावित्रा भांडवलकर यांनी दि.11.12.2024रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन आंबी पो ठाणे येथे भा.न्या.सं. कलम 125(ब), 118(1), 115, 352, 351, (2), 351(3), 3(5)अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
  • येरमाळा पोलीस ठाणे :आरोपी नामे-पल्लवी विशाल जाधवर, पोपट हांगे, सिता हांगे, फुलचंद बाबासाहेब हांगे, चंदु सुभानराव हांगे, नितीन आक्रुड हांगे, पोपट हांगे, गणेश हांगे, भागाबाई हांगे, सुदामती हांगे, बाळासाहेब हांगे, योगेश उर्फ गजानन हांगे, रोहीत हांगे, किशोर हांगे सर्व रा. हांगेवाडी ता. केज जि. बीड, बबन ढाकणे रा. ढाकणेवाडी ता. केज जि. धाराशिव व इतर 15 इसम यांनी दि. 09.12.2024 रोजी 19.00 वा. सु. वडजी येथे फिर्यादी नामे-बाहुबाई निवृत्ती जाधवर, वय 52 वर्षे, रा. वडजी ता. वाशी जि. धाराशिव यांना नमुद आरोपींनी कोर्टाची नोटीस पाठविण्याचे कारणावरुन गैरकायद्याची मंडळी जमवून शिवीगाळ कर न लाथाबुक्यांनी, दगडाने मारहाण करुन जखमी केले. तसेच फिर्यादीचा मुलगा विशाल जाधवार यास नमुद आरोपींनी शिवीगाळ करुन मारहाण केली. जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-बाळुबाई जाधवर यांनी दि.11.12.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन येरमाळा पो ठाणे येथे भा.न्या.सं.कलम 118(1), 115(2), 352, 351(2), 351(3), 189(2), 191(1), 190 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
  • “फसवणुक.”
  • नळदुर्ग पोलीस ठाणे :आरोपी नामे-रतन जांगीड(हिंदुस्थान बायोडिजल इंडस्ट्रिज प्रा लि. चे संचालक, नारायण जांगीड, अजय तनवर तिघे रा. रतलाम मध्यप्रदेश राठोड रेस्‌टॉरंटच्या पाठीमागे 80 रोड, रत्नापुरी कॉर्नर रतलाम मध्यप्रदेश, नितीन सुखदेव आराख, अजय खरात,अंजली आंबेकर, प्रथमेश देशमुख, रोहीत सिंग, सर्व रा. स्कायमॅक्स दत्त मंदीर चौक, विमान नगर पुणे व दुसरा पत्ता प्लॉट नं 04 जातवाडी रोड सेंट्रल जेल हर्सुल च्या पाठीमागे संभाजीनगर यांनी दि.14.10.2024 रोजी 10.00 वा. सु. जळकोट येथे फिर्यादी नामे-प्रफुल काशिनाथ कारले, वय 38 वर्षे, रा. जळकोट, ता. तुळजापूर जि. धाराशिव यांना नमुद आरोपींनी बायोडिझेल वितरणाची एजन्सी देतो असे खोटे आमीष दाखवून प्रफुल कारले यांचे कडून वेळोवेळी 32,22,593 ₹ घेवून रकमेचा अपहार करुन आर्थिक फसवणुक केली. शिवीगाळ करुन जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- प्रफुल कारले यांनी दि.11.12.2024रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन नळदुर्ग पो ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम 406, 409, 417, 420,465,467, 468, 471, 504, 506, 34 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
  • “ लैंगीक अत्याचार.”
  • आंबी पोलीस ठाणे :एका गावातील एक 40 वर्षीय महिला (नाव- गाव गोपनीय) दि.07.12.2024 रोजी 10.00 वा. सु. घरी एकटी असताना एका गावातील एका तरुणाने पिकअप मध्ये येवून तिचे घरात घुसून दरवाजा बंद करुन तिस आरडा ओरड केली तर तुला जिवे ठार मारीन अशी धमकी देवून तीच्यावर लैंगीक अत्याचार केला. यावरुन पिडीत यांनी दि.11.12.2024रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.न्या.सं. कलम-64, 333, 351 (2),351 (3) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
  • “रस्ता अपघात.”
  • उमरगा पोलीस ठाणे: मयत आरोपी नामे-पंकज प्रदिप मोरे, वय 32 वर्षे, जकापुर कॉलनी, पंतगे रोड, उमरगा ता. उमरगा जि. धाराशिव हे दि.27.10.2024 रोजी 18.00 ते दि. 28.10.2024 रोजी 06.00 वा. सु. कोरेगाववाडी जाणारे रोडने मोटरसायकल क्र एमएच 25 बीसी 0187 ही वरुन जात होते. दरम्यान पंकज मोरे यांनी त्याचे ताब्यातील मोटरसायकल ही हायगयी व निष्काळजीपणे चालवून रोडचे कउेला असलेल्या ख्ड्यात पडून गंभीर जखमी होवून खड्यातील पाण्यात बुडून स्वत:चे मरणास कारणीभुत झाले आहे. आक्समात मृत्यु मध्ये चौकशी वरुन वैद्यकीय अधिकारी उमरगा यांनी दिलेल्या अभिप्राय वरुन फिर्यादी नामे- अनिल श्रीराम बोदमवाड, पोलीस हावलदार/1437, नेमणुक- पोलीस ठाणे उमरगा यांनी दि.11.12.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन उमरगा पो ठाणे येथे भा.न्या.सं. कलम 281, 125(ए), 125(बी), 106(1) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
  • जनसंपर्क विभाग धाराशिव पोलीस
  • “विशेष मोहिमेदरम्यान जिल्हातील हरवलेले 56 महिला/ पुरुष यांचा पोलीसा कडून शोध .”
  • मा.पोलीस अधीक्षक श्री. संजय जाधव, अपर पोलीस अधीक्षक श्री.गौहर हसन यांच्या मार्गदर्शनाखाली दि.05.12.2024 ते 09.12.2024 पावेतो जिल्हातील पोलीस ठाणे अंतर्गत दाखल असलेले हरवलेले इसम (मिसींग) यांचा शोध घेण्यासाठी विशेष मोहिम राबवण्यात आली. या मोहिमेदरम्यान जिल्ह्यातील धाराशिव शहर, धाराशिव ग्रामीण,आनंदनगर, तुळजापूर, तामलवाडी, नळदुर्ग, मुरुम उमरगा, लोहारा, ढोकी, शिराढोण, कळंब, येरमाळा, भुम, परंडा, आंबी, वाशी, बेंबळी पोलीस ठाणे येथील संयुक्त पथकाने मिळालेल्या माहितीच्या आधारे 56 महिला व पुरुष यांना शोधून ते मिळून आल्याने त्यांना त्यांचे नातेवाईक यांचे स्वाधीन केले आहे.
  • जनसंपर्क विभाग धाराशिव पोलीस
error: Content is protected !!