धाराशिव- त्रैलोक्याचे स्वामी भगवान,परम श्रद्धेय श्री गुरुदेव दत्तात्रेय महाराज यांच्या जन्मोत्सव सोहळ्यास विधीवत मंगलमय वातावरणात प्रारंभ करण्यात आला. धाराशिव येथे श्री दत्तगुरू जन्मोत्सव निमत्तिाने गुरूचरत्रि पारायण-भजन- कीर्तन सप्ताह सोहळ्यास सोमवारी (दि.९) मोठ्या उत्साहात प्रारंभ करण्यात आला. पिताश्री श्रीमंतराव रणदिवे प्रतष्ठिानच्या वतीने प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षी देखील श्री दत्तगुरू निवास, सद्गुरू कॉलनी, भानूनगर धाराशिव येथे सप्ताह सोहळा घेण्यात येत असून सप्ताह सोहळ्याचे हे १० वे वर्ष आहे.तुळजाभवानी देविजींचे महंत प.पू. तुकोजी बुवा यांच्या हस्ते सोमवारी श्री दत्तगुरूंच्या प्रतिमेचे आरती- पूजन करून या सप्ताह सोहळ्याचा शुभारंभ करण्यात आला.प्रारंभच्या दिवशी महात्मा गांधी नगर येथील मुक्ताई मंडळाचे भजन सेवा संपन्न झाली. अल्पोपहार सेवा काजळे व गायकवाड परिवार यांच्या वतीने देण्यात आली.यावेळी नायब तहसीलदार घृषणेश्वर स्वामी,प्रतिष्ठाणचे अध्यक्ष धनंजय रणदिवे,प्रभाकर चोराखळीकर,शिवाजी जाधव, श्रीकांत कदम,संतोष बडवे, संतोष शेटे,आदींसह महिला भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
More Stories
धाराशिव शहरातील कचरा डेपो इतरत्र हलविण्याची शिवसेना (उ.बा.ठा) पक्षाची मागणी
पहिला आयुर्वेदिक हिमोफिलिया संशोधन प्रकल्प ‘रक्तामृत’चा धाराशिवमध्ये दिमाखदार शुभारंभ
फॉरेस्टच्या गवतावर तणनाशक फवारणी करून वृक्षलागवडीची नासधूस:वनपालावर कारवाईची मागणी