August 9, 2025

भारतीय संविधान अमृत महोत्सवी दिनानिमित्त संविधान उद्देशिकेचे सामूहिक वाचन

  • कळंब (साक्षी पावनज्योत वृत्तसेवा ) – २६ नोव्हेंबर भारतीय संविधान अमृत महोत्सवी वर्षानिमित्त विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा बालोद्यान कळंब येथे परमपूज्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा स्मारक समिती कळंबच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
    याप्रसंगी ज्येष्ठ नागरिक महासंघाचे जिल्हाध्यक्ष महादेव महाराज अडसूळ,डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा स्मारक समितीचे विश्वस्त अध्यक्ष सुनील गायकवाड ,सतपाल बनसोडे, माधवसिंग राजपूत,बंडू ताटे यांच्या हस्ते बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पाहार अर्पण करण्यात आला.
    याप्रसंगी भारतीय संविधानाच्या उद्देशिकाचे सामूहिक वाचन करण्यात आले.याप्रसंगी सुनील गायकवाड यांनी बोलताना २०२४- २५ भारतीय संविधान अमृत महोत्सवी वर्ष असल्याने संविधान घराघरात पोहचावे यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे असे सांगितले.याप्रसंगी महादेव महाराज अडसूळ यांना संविधान प्रत भेट देण्यात आली.
    याप्रसंगी राजाभाऊ गायकवाड, सुमित रणदिवे,विलास करंजकर, शिवाजी शिरसट,माणिक गायकवाड,बालासाहेब हौसलमल,भाउसाहेब कुचेकर, रमेश भोसले,किशोर वाघमारे, अभय गायकवाड,सुधाकर वनकळस ,प्रमोद ताटे ,महावीर गायकवाड यांनी यात सहभाग घेतला.भारतीय संविधानास ७५ वर्ष पूर्ण झाली असून २०२४ – २५ हे संविधान अमृत महोत्सवी वर्ष म्हणून देशात मोठ्या उत्साहात साजरे केले जात आहे. २६ नोव्हेंबर १९४९ रोजी भारतीय संविधान संविधान सभेत अंगीकृत व अधिनियमित करून स्वतः प्रत अर्पण केले आहे.संविधानात सामाजिक, आर्थिक विचार आणि व्यक्ती, विश्वास,श्रद्धा व उपासना याचे स्वातंत्र्य तसेच दर्जा व संधीची समानता करून देण्याचा आणि सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राचे एकात्मता व बंधुता या मूल्याचा विचार केला आहे.
error: Content is protected !!