वेद शैक्षणिक संकुलात संविधान दिनाचा अमृत महोत्सव उत्साहात साजरा
कळंब – “भारतीय संविधान केवळ देशाच्या शासकीय रचनेसाठी नव्हे,तर प्रत्येक नागरिकाच्या हक्कांचे संरक्षण आणि जबाबदाऱ्या समजून देण्यासाठी आहे. “संविधान हा केवळ कायद्यांचा ग्रंथ नसून,देशाच्या लोकशाही मूल्यांचा पाया आहे,असे प्रतिपादन मराठी विषय प्रमुख प्रा.श्रीकांत पवार यांनी केले. धनेश्वरी शिक्षण समूहाचे अध्यक्ष डॉ.प्रतापसिंह पाटील यांच्या प्रेरणेने भैरवनाथ अध्यापक विद्यालयाचे प्राचार्य सतिश मातने यांच्या मार्गदर्शनाखाली वेद शैक्षणिक संकुल अंतर्गत भैरवनाथ अध्यापक विद्यालय व भैरवनाथ औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत दि.२६ नोव्हेंबर २०२४ रोजी भारतीय संविधान दिनाचा अमृत महोत्सवी वर्षानिमित्त भारतीय संविधानाच्या महत्वाबाबत मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रा.श्रीकांत पवार हे बोलत होते. प्रा.पवार यांनी आपल्या प्रभावी भाषणात भारतीय संविधानाची ऐतिहासिक पार्श्वभूमी,त्याची रचना प्रक्रिया,तसेच त्यातील मूलभूत तत्त्वांची सखोल माहिती देत त्यांनी संविधानाने दिलेले मूलभूत अधिकार,कर्तव्ये आणि समानतेचा संदेश यावर विशेष भर दिला.आजच्या तरुणांनी संविधानाचा अभ्यास करून लोकशाहीला बळकट करावे.असे आवाहन त्यांनी प्रशिक्षणार्थींना व छात्राध्यापकांना केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला राज्यघटनेचे प्रमुख शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक भैरवनाथ औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य सूरज भांडे यांनी तर सूत्रसंचालन प्रा.अविनाश घोडके तर आभार निदेशक अविनाश म्हेत्रे यांनी मानले. कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांनी संविधान वाचन करून देशातील लोकशाही मूल्ये आणि राष्ट्रीय एकात्मता यासाठी योगदान देण्याचा संकल्प केला. यावेळी प्रा.मोहिनी शिंदे,निदेशक राजकुमार शिंदे,निदेशक केतन पौळ,विनोद कसबे आदींची उपस्थिती होती.
More Stories
संचालिका सौ.अंजली मोहेकर यांची विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिरास सदिच्छा भेट
मोहेकर महाविद्यालयात ग्रंथालय शास्त्राच्या राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन
भीमराव दादा सत्यवचनी व्यक्तिमत्व होतं – डॉ. माणिक डिकले