कळंब – आडसुळवाडी येथील गोविंद आडसुळ यांची सरचिटनिस पदी तर आढाळा येथील अण्णासाहेब शिंदे यांची भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा कळंब तालुका उपाध्यक्ष पदी नुकतीच निवड करण्यात आली आहे. आमदार राणाजगजितसिंह पाटील,भाजपाचे प्रदेश सरचिटणीस सुजितसिंह ठाकुर,जिल्हाध्यक्ष संताजी चालुक्य,युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष राजसिंहराजे निंबाळकर,युवा मोर्चा उप जिल्हाध्यक्ष भुषण करंजकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवड करण्यात आली असून युवकांचे,विद्यार्थ्यांचे,लोकांचे प्रश्न सोडविणे तसेच पक्ष सघटन मजबुत करण्यासाठी जोमाने काम करावे, यासाठी निवड करण्यात आली आहे. आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले.या निवडीबद्दल मनोज साळुंखे,सोमनाथ टिंगरे,सिद्धेश भोसले,बालाजी मडके,विशाल पवार,महेश काळे, अशोक क्षीरसागर, नरसिंग लोमटे,पवन म्हेत्रे यांनी अभिनंदन केले आहे.
More Stories
फॉरेस्टच्या गवतावर तणनाशक फवारणी करून वृक्षलागवडीची नासधूस:वनपालावर कारवाईची मागणी
रक्षाबंधन
प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या प्रीती महादवारसह यशस्वी छात्राध्यापकांचा गौरव सोहळा उत्साहात