कळंब – लोकशाहीमध्ये प्रत्येक मताचे मोल आहे,याबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने कॅनव्हास इंटरनॅशनल स्मार्ट स्कूल आणि उस्मानाबाद विधानसभा मतदार संघ मतदान जागृती कक्ष (SVEEP) विभाग, तहसील कार्यालय,कळंब यांच्या संयुक्त विद्यमाने “मतदार राजा जागा हो,लोकशाहीचा धागा हो” या विषयावर पथनाट्य सादर करण्यात आले. कळंब शहरातील बस स्टँड, छत्रपती शिवाजी महाराज चौक, होळकर चौक,तहसील कार्यालय,मोहेकर महाविद्यालय व बागवान चौक या ठिकाणांवर हे पथनाट्य सादर करण्यात आले: विद्यार्थ्यांनी पथनाट्यातून प्रभावी संवाद आणि अभिनयाद्वारे मतदारांना जागरूकतेचा संदेश दिला.त्यांनी मतदानाच्या अधिकाराचा योग्य वापर करण्याचे आवाहन केले.या पथनाट्यासाठी शाळेचे कलाशिक्षक प्रशांत भोले आणि बाबासाहेब जाधव यांनी मार्गदर्शन केले, तर संगीत शिक्षक प्रशांत धावारे व विशाल धावारे यांनी उत्तम संगीतसाथ दिली. ज्यामुळे सादरीकरण अधिक प्रभावी झाले. प्रसंगी कॅनव्हास इंटरनॅशनल स्मार्ट स्कूलचे संस्थापक रवि नरहिरे, कळंब स्वीप पथकाचे सदस्य सुशील फुलारी,शिक्षण विस्तार अधिकारी प्रशांत गुटे हे उपस्थित होते.यावेळी सुशील फुलारी यांनी प्रास्ताविकामध्ये मतदार जागृती कशासाठी याबाबत प्रबोधनात्मक मार्गदर्शन केले व पथनाटयाच्या चमूचे, बालकलाकारांचे कौतुक केले. शाळेचे संस्थापक रवि नरहिरे यांनी मतदार जागृतीसाठी विद्यार्थ्यांनी घेतलेल्या पुढाकाराचे विशेष कौतुक केले आणि उपस्थित नागरिकांनी आपला मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन केले.
More Stories
फॉरेस्टच्या गवतावर तणनाशक फवारणी करून वृक्षलागवडीची नासधूस:वनपालावर कारवाईची मागणी
रक्षाबंधन
प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या प्रीती महादवारसह यशस्वी छात्राध्यापकांचा गौरव सोहळा उत्साहात