कळंब (सतीश टोणगे) – वय झालं की माणसाला काही सुचत नाही,शारीरिकी व्याधी मागे लागतात,पण खामसवाडी तालुका कळंब येथील ॲड.उद्धव शेळके यांनी मात्र या वयात हि सखोल अभ्यास करून तरुण व जेष्ठा पुढे हा ग्रंथ लिहून एक आदर्श निर्माण केला आहे. वाचन व त्यावर अभ्यास केला तरच लिहायला काहीतरी सुचते, लिखाण करायला वयाची आट नसते,खामसवाडी तालुका कळंब येथील पंच्याऐंशी वर्षाचे प्रसिद्ध विधीत ने एड. उद्धवराव शेळके यांनी पद्यरूपी गीत रामायणाचा सखोल अभ्यास करून ते शुद्ध मराठी भाषेत सर्वांना समजेल अशा पद्धतीने हा ग्रंथ गद्यरूपी लिहून वाचका पुढे ठेवला आहे. धार्मिक साहित्य क्षेत्रात सुबोध रामायण या ग्रंथाचे वाचक नक्कीच स्वागत करतील. रामायण आपल्या जीवनात प्रेरणा देणारा ग्रंथ आहे. या ग्रंथाला ह. भ .प. ॲड. पांडुरंग नरहरी लोमटे यांनी अभिप्राय देऊन ऍड. शेळके यांच्या अभ्यासाचे कौतुक केले आहे. शेळके यांच्या घराण्यात प्रखर राम भक्ती असल्याने पारायण, अखंड हरिनाम सप्ताह, चौदा दिवसाची वनवास यात्रा, आदी धार्मिक कार्यक्रमात ॲड. उद्धव शेळके यांचे बालपण गेल्याने त्यांच्या मनावर धार्मिक कार्यक्रमा चा व रामायनाचा पगडा आहे. वयाच्या पंच्याऐंशी व्या वर्षी त्यांनी सखोल अभ्यास करून गीतरामायण हे शुद्ध मराठी भाषेत गद्द रुपात लिहून आदर्श निर्माण केला आहे. या पुस्तकात नंदकुमार रांजणीकर यांनी शेळके यांचा परिचय करून दिला आहे. हा ग्रंथ लिहिताना एड. उद्धव शेळके यांनी ग .दि. माडगूळकर यांच्या गीत रामायण या पवित्र ग्रंथाचा आधार घेतला आहे. या सुबोधरामायण ग्रंथात पंचेचाळीस अध्याय असून एकशे दहा पानाचा हा अभ्यास पूर्ण ग्रंथ आहे अगदी विद्यार्थी महिला यांना समजेल अशा सोप्या भाषेत या ग्रंथाची मांडणी केली आहे. लेखक एड. उद्धवराव शेळके प्रसिद्ध विधीज्ञ असून त्यांना आप्पा या नावाने ओळखले जाते. कै. तुकाराम राजाराम शेळके, किसनराव तुकाराम शेळके यांना हा ग्रंथ समर्पित केला आहे.
More Stories
संचालिका सौ.अंजली मोहेकर यांची विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिरास सदिच्छा भेट
मोहेकर महाविद्यालयात ग्रंथालय शास्त्राच्या राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन
भीमराव दादा सत्यवचनी व्यक्तिमत्व होतं – डॉ. माणिक डिकले