August 9, 2025

शाळांना सुटीच्या गोंधळावरून पुन्हा परिपत्रक

  • धाराशिव – विधानसभा निवडणुकीनिमित्त शाळांना सुटी देण्यासंदर्भात शिक्षण आयुक्तांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकामुळे काही प्रमाणात संभ्रम दूर झाला होता. परंतु,कोणत्या शाळा सुरू ठेवायच्या,त्यासाठी काय करावे ? यासंदर्भात शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी पुन्हा एक परिपत्रक प्रसिद्ध केले आहे.त्यानुसार ज्या शाळांमधील सर्व शिक्षकांची निवडणूक कामासाठी नियुक्ती झाली आहे, त्या शाळांनी नजीकच्या शाळेतील ज्या शिक्षकांची नियुक्ती निवडणूक कामकाजासाठी झाली नाही, त्यांच्या मदतीने १८ व १९ नोव्हेंबरला शाळा सुरू ठेवाव्यात, अशी सुधारित सूचना दिली आहे.
    निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ज्या शाळेतील सर्व शिक्षकांची नियुक्ती निवडणूक कामकाजासाठी झाली आहे, त्या शाळा ता. १८ व ता. १९ नोव्हेंबर रोजी बंद ठेवण्यासंदर्भात संबंधित मुख्याध्यापकांनी त्यांच्या स्तरावरून निर्णय घ्यावा,अशा सूचना देण्यात आल्या होत्या. त्यामध्ये शिक्षण आयुक्तांनी अंशतःसुधारणा केली आहे. त्यानुसार ज्या शाळांमधील सर्व शिक्षकांची नियुक्ती निवडणूक कामकाजासाठी झाली आहे. त्या शाळेच्या नजीकच्या इतर शाळांतील ज्या शिक्षकांची नियुक्ती निवडणूक कामकाजासाठी झालेली नाही, त्यांच्या मदतीने ता. १८ व ता. १९ नोव्हेंबर रोजी शाळा सुरू ठेवण्यात याव्यात, अशा सुधारित सूचना देण्यात आल्या आहेत.
    शाळांना सुट्टी जाहीर केलेली नाही, नियमित शाळा चालू राहतील; पत्रकात दिलेल्या निर्देशानुसार अमलबजावनी व्हावी असे आवाहन शिक्षणाधिकारी (प्रा.) अशोक पाटील यांनी केले आहे.
error: Content is protected !!