आ.रोहित पवारांच्या उपस्थितीत संजय भोसले यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश
अंबाजोगाई – सरकार विरुद्ध जनतेत प्रचंड रोष असून जनता परिवर्तनाच्या मानसिकतेत आहे. महापुरुषांचे अपमान,शेतकऱ्यांची दैन्यावस्था, बेरोजगारीच्या प्रश्नांनी राज्यात थैमान घातलं असताना, आपल्याला खा.शरदचंद्रजी पवार यांच्या विधायक कार्याच्या विचारांची गरज आहे. हे विचार पुढे घेऊन जायचं असेल व अंबाजोगाई केज विधानसभा मतदारसंघाचा अभूतपूर्व विकास घडवायचा असेल, तर पृथ्वीराज साठेंना येत्या २० नोव्हेंबर रोजी प्रचंड मतांनी विजयी करा,”असे प्रतिपादन आ.रोहित पवार यांनी केले. आ.रोहित पवार यांचे अंबाजोगाई शहरात महाविकास आघाडीचे तमाम पदाधिकारी, प्रमुख कार्यकर्ते,हजारोंच्या संख्येने उपस्थित जनतेच्या साक्षीने स्वागत केले.
More Stories
विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ दिनाचा वर्धापन दिन विविध ठिकाणी उत्साहात साजरा