कळंब ( माधवसिंग राजपूत ) – उस्मानाबाद – कळंब २४२ विधानसभा मतदार संघात एकूण १२ उमेदवार निवडणूक रिंगणात असून प्रमुख लढत महाविकास आघाडी कडून शिवसेना उबठा पक्षाचे उमेदवार विद्यमान आमदार कैलास घाडगे पाटील व महायुतीकडून शिवसेना शिंदे पक्षाचे अजित पिंगळे यांच्यात होत असून वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अॕड,प्रणित डिकले व मनसे उमेदवार उद्योजक देवदत्त मोरे यांचीही प्रचार यंत्रणा मतदार संघात असून दिनांक २० नोव्हेंबर रोजी होणाऱ्या मतदानासाठीचा प्रचार अंतिम टप्प्यात आहे महाविकास आघाडी व महायुती यांच्या उमेदवारात जोरदार लढत होत असून दोन्ही बाजू कडून प्रचारात कसलीच कसर राहू नये याचा प्रयत्न केला जात असून प्रत्येक गावातून डोअर टू डोर प्रचार तसेच रॅली याद्वारे मतदारांना मतदान देण्याचे आवाहन करण्यात येत असून निवडणूक निष्ठेच्या मुद्याभोवती फिरत आहे धाराशिव- कळंब २४२ विधानसभा मतदार संघात एकूण १२ उमेदवार निवडणूक रिंगणात असून प्रमुख लढत महाविकास आघाडी कडून शिवसेना उबठा पक्षाचे उमेदवार विद्यमान आमदार कैलास घाडगे पाटील व महायुतीकडून शिवसेना शिंदे पक्षाचे अजित पिंगळे यांच्यात लढत होत असून वंचित बहुजन आघाडीचे अॕड,प्रणित डिकले,उद्योजक देवदत्त मोरे या उमेदवारांनी ही प्रचार यंत्रणा निवडणुकीच्या रिंगणात असून विधानसभेचा प्रचार अंतिम टप्प्यात असून स्टार प्रचारकांच्या सभा मधून आरोप प्रत्यारोप होत आहेत. गत पाच वर्षात महाविकास आघाडीला अडीच वर्ष व महायुतीला अडीच वर्ष समसमान कालावधी मिळाला असून या कालावधीत विकासाची कामे आम्हीच जास्त कशी केली हे पटवून देण्याचं काम स्टार प्रचारक तसेच कार्यकर्ते करीत आहेत.मोटर व्हॕन मधून एलसीडीच्या माध्यमातून विकासाच्या योजनेची चित्रफित दाखवली जात आहे महाविकास आघाडीचे उबठा शिवसेना पक्षाचे उमेदवार विद्यमान आमदार कैलास घाडगे पाटील हे आपल्या सभेमधून महाविकास आगाडी सरकार सत्तेवर असताना जनहिताच्या अनेक योजना राबविल्या विकास कामे केली परंतु महायुती सरकारने या विकास कामास स्थगिती दिली. यासाठी न्यायालयात जावे लागले असे सांगत आहेत तर शिवसेना शिंदे पक्षाचे उमेदवार अजित पिंगळे हे कमी कालावधीत सामान्य माणसास फायदेशीर असे निर्णय घेतले असल्याचे सांगत आहे बंडखोरीचा कमी परंतु नाराजी व पक्षांतराचा महायुती व महाविकास आघाडी यांना कमी अधिक फटका बसत स्टार प्रचारकांच्या सभा मधून आरोप प्रत्यारोप होत असून शिवसेना उबठा पक्षाकडून शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे, यांची धाराशिव येथील प्रचार सभा व खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या मतदारसंघात सभा रॅली होत आहेत तसेच शिवसेना शिंदे पक्षाकडून धाराशिव येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व कळंब येथे मावळचे खासदार श्रीरंग बारणे, खासदार श्रीकांत शिंदे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या प्रचाराने निवडणुकीत रंगत वाढली असून विजयासाठी उमेदवार प्रयत्नांची पराकाष्टा करीत आहे या निवडणुकीत निष्ठेचा प्रश्न गाजत असून शिवसेना उबठा पक्षाचे उमेदवार कैलास पाटील यांनी शिवसेना पक्ष फुटीच्या वेळी उद्धव ठाकरे यांच्यावर निष्ठा दाखवीत पक्ष सोडला नाही यामुळे निष्ठावंत उमेदवार म्हणून त्यांचा प्रचार केला जात आहे तर शिवसेना शिंदे पक्षाचे उमेदवार अजित पिंगळे हे भाजपचे तालुकाध्यक्ष असताना ऐनवेळी त्यांना शिंदे शिवसेना पक्षाचे उमेदवारी देण्यात आली आहे. यामुळे त्यांच्या पक्षांतरामुळे निष्ठेचा मुद्दा मतदार संघात चर्चेत जरी असला तरी अजित पिंगळे हे बाल शिवसैनिक असून गत विधानसभेच्या निवडणूक वेळी त्यांना पक्षाने उमेदवारी न दिल्याने त्यांनी बंडखोरी करून अपक्ष निवडणूक लढवली होती व पुढे त्यांनी भाजप पक्षात प्रवेश केला परंतु तीस वर्ष बाल शिवसैनिक असल्यापासून धनुष्यबाण याचा प्रचार मी करीत होतो व त्यावर माझा अधिकार आहे असा दावा करीत आहेत या निवडणुकीत उमेदवारीसाठी पक्षांतर झाली उमेदवारी अर्ज दाखल झाले इच्छुक म्हणून शिवसेना शिंदे पक्षाचे शिवाजी आप्पा कापसे , सुधीर अण्णा पाटील ,नितीन लांडगे सुरज महाराज साळुंखे यांनी उमेदवारी अर्ज भरले व परत घेतले आहेत तर शिवसेना उभा पक्षाकडून मकरंदराजे निंबाळकर यांनी भरलेला उमेदवारी अर्ज परत घेतला तसेच राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्षाचे प्रतापसिंह पाटील काँग्रेस आय पक्षाकडून पांडुरंग कुंभार यांनी उमेदवारी अर्ज परत घेतला यामुळे मतदार संघात बंडखोरी झाली नाही परंतु माजी नगराध्यक्ष संजय मुंदडा यांनी आपल्या सहकारी कार्यकर्त्यांसमवेत शिंदे शिवसेना पक्षाचा त्यात करीत शिवसेना उबठा पक्षात प्रवेश केला आहे गत पाच वर्षात महाविकास आघाडीला अडीच वर्ष व महायुतीला अडीच वर्ष समसमान कालावधी मिळाला असून या कालावधीत विकासाची कामे आम्हीच जास्त कशी केली हे पटवून देण्याचं काम स्टार प्रचारक तसेच कार्यकर्ते करीत आहेत तसेच मोटर व्हॕन मधून एलसीडीच्या माध्यमातून विकासाच्या योजनेची चित्रफित दाखवली जात आहेर महाविकास आघाडीचे उबठा शिवसेना पक्षाचे उमेदवार विद्यमान आमदार कैलास घाडगे पाटील हे आपल्या सभेमधून महागाडीचे सरकार सत्तेवर असताना जनहिताच्या अनेक योजना राबविल्या विकास कामे केली परंतु महायुती सरकारने या विकास कामास स्थगिती दिली यासाठी न्यायाला जावे लागले असे सांगत आहेत तर शिवसेना शिंदे पक्षाचे उमेदवार अजित पिंगळे हे कमी कालावधीत सामान्य माणसास फायदेशीर असे निर्णय घेतले असल्याचे सांगत आहे लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडी मशालीला ६१ हजाराचे मताधिक्य ही महाविकास आघाडी उमेदवाराची जमिनीची तर महायुती सरकारकडून महायुती सरकारकडून लाडकी बहीण योजना प्रभावीरीत्या राबविली गेल्यामुळे महायुती उमेदवाराची जमिनीची बाजू आहे.यामुळे प्रचारात रंगत वाढत आहे.
More Stories
डिकसळ येथे माता रमाई जयंती उत्साहात साजरी
बस तासनतास थांबवून प्रवाशांना त्रास;संतप्त प्रवाशांची तक्रार
विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिर येथे शिक्षण महर्षी कै.ज्ञानदेव मोहेकर गुरुजींना अभिवादन