August 9, 2025

क्रांती पिता लहुजी वस्ताद साळवे यांची मानव अधिकार संघटनेच्या वतीने जयंती साजरी

कळंब ( बालाजी बारगुले) – कळंब येथे क्रांती पिता लहुजी वस्ताद साळवे यांच्या जयंती निमित्त मानव अधिकार आंदोलन संघटनेच्या वतीने दि.१४ नोव्हेंबर २०२४ रोजी लहुजी वस्ताद साळवे यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
यावेळी प्रतिमेचे पूजन संघटनेचे संस्थापक अध्यक्ष हनुमंत पाटुळे यांच्या हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लक्ष्मण बनसोडे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून राम रतन कांबळे यांची उपस्थिती होती. या वेळी उपस्थिताना क्रांतीपित्त लहुजी वस्ताद साळवे यांच्या जीवन चरित्रावर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष हनुमंत पाटुळे यांनी मार्गदर्शन केले.तसेच जयंतीचे औचित्य साधून नवीन पदाधिकारी यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या.
या कार्यक्रमासाठी कळंब तालुका अध्यक्ष (कामगार आघाडी) लक्ष्मण बनसोडे अध्यक्ष,उपाध्यक्ष अश्रुबा राखुंडे, सचिव तुकाराम ताटे,सदस्य संतोष सोनवणे,रामभाऊ ओव्हाळ,नवनाथ कांबळे,किरण सावंत,सुशील गायकवाड,जयेश जाधव,बाळासाहेब विटेकर, जयराम ओव्हाळ,बाळू वाकळे, प्रवीण भालेराव,विमल बनसोडे,महेमुदा रज्जाक शेख, भारत लक्ष्मण परळकर यांच्या सह संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या उपस्थित होते.

error: Content is protected !!