शिवसेना महायुतीचे उमेदवार अजित पिंगळे यांची तांदुळवाडी,खेर्डा-बोर्डा,शेळका धानोरा,मंगरूळ व पिंपळगाव (डोळा) येथील मतदार संवादयात्रेतून साधला संवाद
मंगरूळ – हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारधारा व हिंदुत्व सोडून अनैसर्गिक आघाड्या करून स्वार्थासाठी लाचार झालेल्या माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वर टीका केली. विधानसभा निवडणूक कळंब-धाराशिव मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार अजित पिंगळे यांच्या प्राचारार्थ मंगरूळ येथे दि.१३ नोव्हेंबर २०२४ रोजी सायंकाळी झालेल्या सभेतून कळंब कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तथा शिवसेनेचे नेते शिवाजी कापसे यांनी नेते गद्दार असल्याचे सांगत विविध उदाहरणे देऊन महाविकास आघाडीवर कठोर शब्दांत निशाणा साधला. यावेळी कापसे पुढे म्हणाले की, केवळ स्वार्थासाठी राजकीय सत्ता मिळवण्याचे काम काही लोकांनी केले आहे. त्यांनी बाळासाहेबांचे नाव फक्त आपल्या स्वार्थासाठी वापरले आहे.
“स्वतःच्या स्वार्थासाठी पक्ष बदलणाऱ्या आमदार,खासदार गद्दारांना मतदारांनी योग्य ती शिक्षा द्यावी आणि त्यांना वेळीच ठेचले पाहिजे.” तसेच महायुतीचे उमेदवार अजित पिंगळे यांनी महाविकास आघाडीच्या कार्यपद्धतीवरही कठोर शब्दात टीका केली. “महाविकास आघाडी खोट्या अफवा पसरवून मतदारांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहे,” त्यामुळे मतदारांनी सजग राहुन सत्याचा विचार करून योग्य निर्णय घेवून येणाऱ्या २० तारखेला धनुष्य बाणावर मते देवून भरघोस मतांनी विजयी करावे असे आवाहन केले. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रवक्ता विभागाचे प्रदेशाध्यक्ष प्रा.सुशिल शेळके,भाजपाचे भागचंद बागरेचा यांनी मनोगतातून उमेदवार अजित पिंगळे यांना मते टाकल्यामुळे होणारे फायदे सांगितले.
या टीकेमुळे मतदारांमध्ये महायुतीच्या उमेदवारांप्रती पाठिंबा वाढत असून, त्यांचे विचार मतदारांना प्रभावीत करत आहेत. याप्रसंगी मोठ्या संख्येने मतदार बंधू,भगिनी व तरुणांची उपस्थिती होती तर शिवसेना महायुती व घटक पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
More Stories
फॉरेस्टच्या गवतावर तणनाशक फवारणी करून वृक्षलागवडीची नासधूस:वनपालावर कारवाईची मागणी
रक्षाबंधन
प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या प्रीती महादवारसह यशस्वी छात्राध्यापकांचा गौरव सोहळा उत्साहात