कळंब – येथे मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या नेत्यांना दि.२५ ऑक्टोबर २०२३ रोजी सायंकाळी श्रद्धांजली अर्पण करून प्रतीकात्मक अंत्ययात्रा व कँडल मार्च काढण्यात आला. या वेळी तीव्र शब्दांत घोषणाबाजी करण्यात आली. मराठा आरक्षणाच्या मुद्दयावर मनोज जरंगे पाटील यांचा मागच्या ४७ दिवसांपासून लढा सुरू आहे. सरकारला दिलेला ४० दिवसांचा अल्टिमेट संपला आहे. यानंतर अंतरवाली सराटी येथे मनोज जरंगे पाटील यांचे बुधवारपासून पुन्हा अन्नत्याग आंदोलन सुरू झाले आहे. या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी कळंब येथे पुन्हा आंदोलन सुरू झाले आहे. याचा पहिला टप्पा म्हणून ठिकाणी मराठा समाजाच्या आरक्षणास विरोध करणाऱ्या काही नेत्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात शिवाजी महाराज छायाचित्र असलेला फलक हाती घेऊन झाल्यानंतर सकल प्रतीकात्मक अंत्ययात्रा काढण्यात आली. या वेळी एक तरुण मुंडण करून, हातात तिरडी धरून सहभागी झाला होता. छत्रपती संभाजी महाराज चौकात या अत्यंयात्रेस सुरुवात झाली होती.तेथून जिजाऊ चौक,अण्णाभाऊ साठे चौक,छत्रपती शिवाजी महाराज चौक,अहिल्याबाई होळकर चौक येथून सराफा मार्केटमधून विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या चौकात दाखल होऊन पुन्हा छत्रपती शिवाजी महाराज चौकात येत सांगता करण्यात आली.
More Stories
बजरंग ताटे जिल्हास्तरीय आदर्श समाजसेवा पुरस्काराने सन्मानित
कळंबचे उपजिल्हाधिकारी संजय पाटील यांच्यासह पवार,माळी पुरस्काराने सन्मानित..!
कळंब येथे ज्येष्ठ नागरिक महासंघाच्या वतीने पालावर रक्षाबंधन