September 13, 2026

म्हणून विकास कामांना स्थगिती दिली – आ.कैलास पाटील

  • कळंब (साक्षी पावनज्योत वृत्तसेवा ) – गद्दारीत सहभागी झालो नाही म्हणुन विकास कामांना स्थगिती दिली त्याचा विरोधकांना जाब विचारा असे आवाहन करीत आमदार कैलास पाटील यांनी हल्लाबोल केला. देवधानोरा या गावात ग्रामदैवत खंडोबा याचे दर्शन घेऊन खासदार ओमराजे व आमदार कैलास पाटील यांनी प्रचाराचा नारळ फोडून शुभारंभ केला. यावेळी भाजपमधुन काही तरुणांनी शिवसेना उबाठा गटात खासदार ओमराजे निंबाळकर व आमदार कैलास पाटील यांच्या हस्ते प्रवेश केला तसेच एका तरुणाने ११ हजार रुपये निवडणुकीसाठी मदत यावेळी दिली.माजी आमदार दयानंद गायकवाड,राजाभाऊ शेरखाने, पांडुरंग कुंभार,ज्योती सपाटे, मेहबूब पटेल,बळवंत तांभारे, विश्वजीत नरसिंग देशमुख यासह पदाधिकारी उपस्थित होते.

  • पुढे बोलताना पाटील म्हणाले की,उद्धव ठाकरे यांनी उमेदवारी दिल्याबद्दल महाविकास आघाडीच्या नेत्यांच आभार व्यक्त करतो. मी देवधानोरा गावात शिकलो आहे त्यामुळे मी इथलाच आहे.सत्ता असताना सुरुवातीच्या काळात वैद्यकीय महाविद्यालय सुरु केले, कळंब
    येथे कोर्ट मंजुर करुन सुरु केले. अनेक कामे मंजुर केली मात्र सरकार बदलले आणि स्थगिती देण्यात आली.त्यांच्या गद्दारीत सहभागी झालो नाही म्हणून माझ्या कामांना स्थगिती दिली. त्यानंतर मी उच्च न्यायालयात गेलो व स्थगिती उठवली त्यामुळे आज ही कामे सुरु झाली. विकास कामांना स्थगिती का दिली यांचा जाब त्यांना विचारा असे आवाहन आमदार कैलास पाटील यांनी केले.सगळ्या मतदार संघात एसटी गाडी दिली मात्र केवळ मी विरोधात असल्याने कळंब मतदार संघात कळंब आगाराला गाडी दिली नाही.अनेक लोकांना लुटले, महागाई वाढवली व लाडकी बहीण योजना सुरु केली. त्यानंतर खुर्चीची भीती वाटत असल्याने त्यांना लाडकी बहीण योजना आठवली. आपल्या बहिणी सुरक्षित आहेत का ? असा सवाल त्यांनी केला.येत्या काळात अभिमान वाटेल,मान झुकणार नाही असे काम करेल असे आश्वासन आमदार पाटील यांनी दिले.
error: Content is protected !!