धाराशिव – ऑल इंडिया पँथर सेनेचे ग्रामीण जिल्हा अध्यक्ष अशोक कसबे यांनी कळंब विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. समाजातील विविध प्रश्नांवर त्यांनी सातत्याने आवाज उठवला असून,त्यांच्या सामाजिक कार्यामुळे त्यांना जनतेचा मोठा पाठिंबा मिळत आहे.अशोक कसबे यांनी गरजूंना मदत, शैक्षणिक सुविधा,ग्रामीण विकास आणि अन्य विविध सामाजिक उपक्रमांद्वारे नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी अथक प्रयत्न केले आहेत. त्यांच्या या सामाजिक कार्याच्या बळावर मतदारांचा त्यांच्यावर विश्वास आहे आणि याच विश्वासाच्या जोरावर अशोक कसबे यांना निवडणुकीत यश मिळेल अशी अपेक्षा आहे. याप्रसंगी विशाल कसबे,तानाजी कसबे,कोंडीबा कसबे,अक्षय कसबे ,दगडू कसबे,शुभम कांबळे आदी उपस्थित होते.
More Stories
कळंब खरेदी-विक्री संघाची निवडणूक जाहीर;१८ एप्रिलला मतदान
गुढीपाडवा उपक्रमातून शिक्षणाची नवी सुरुवात;चिमुकल्यांनी भरली शाळा
भिमा हगारे यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेस तालुकाध्यक्षपदी निवड