August 9, 2025

२९ ऑक्टोबरपर्यंत १८५ उमेदवारांचे २७१ नामनिर्देशनपत्र दाखल

  • शेवटच्या दिवशी १३० उमेदवारांनी दाखल केले १७९ नामांकन अर्ज
  • धाराशिव (माध्यम कक्ष)- विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत २९ ऑक्टोबर रोजी नामनिर्देशनपत्र दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी जिल्ह्यातील चार विधानसभा मतदारसंघातून १३० उमेदवारांनी १७९ नामनिर्देशन पत्र दाखल केले.तर २९ ऑक्टोबरपर्यंत जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदारसंघात १८५ उमेदवारांनी २७१ नामनिर्देशन पत्र दाखल केले.
    २९ ऑक्टोबर रोजी ज्यांनी नामनिर्देशन पत्र दाखल केले त्यामध्ये उमरगा विधानसभा मतदारसंघातून २६ उमेदवारांनी ३२, तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून ३१ उमेदवारांनी ५५,उस्मानाबाद मतदार संघातून ३७ उमेदवारांनी ५२ आणि परंडा विधानसभा मतदारसंघातून ३६ उमेदवारांनी ४० नामनिर्देशन पत्र दाखल केले.
    शेवटच्या दिवशी २९ ऑक्टोबरपर्यंत जिल्ह्यातील चार विधानसभा मतदारसंघातून १८५ उमेदवारांनी २७१ नामनिर्देशन पत्र दाखल केले.यामध्ये
    उमरगा विधानसभा मतदारसंघातून ३२ उमेदवारांनी ४३, तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून ५४ उमेदवारांनी ८७, उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघातून ५० उमेदवारांनी ७१ आणि परंडा विधानसभा मतदारसंघातून ४९ उमेदवारांनी ७० नामनिर्देशन पत्र दाखल केले.
    ३० ऑक्टोबर रोजी दाखल केलेल्या नामनिर्देशन पत्राची छाननी सकाळी ११ वाजतापासून करण्यात येणार आहे.छाननी प्रक्रियेनंतर ४ नोव्हेंबरपर्यंत उमेदवारांना नामनिर्देशन पत्र मागे घेता येईल.२० ऑक्टोबर रोजी जिल्ह्यातील १५२३ मतदान केंद्रावर मतदान होणार आहे.
error: Content is protected !!