August 9, 2025

कळंब बस आगारची कळंब – सातारा-वाई बस गाडी प्रवासी सेवेत

  • कळंब – प्रवाशांच्या मागणीनुसार दि २६/१०/२०२४ रोजी रा.प. म कळंब बस आगार प्रशासनामार्फत प्रवासी सेवेकरीता कळंब-सातारा-वाई हे नवीन नियमित बस सकाळी १०:३० वाजता सुरू करण्यात आली.
    ह.भ.प महादेव महाराज अडसूळ यांच्या हस्ते श्रीफळ फोडून ही बस सेवा सुरू करण्यात आली.याप्रसंगी आगार व्यवस्थापक एस.डी.खताळ,सा. साक्षी पावनज्योत उपसंपादक माधवसिंग राजपूत,प्रा.मोहन जाधव,बी.आर.भारती,बी.एच.मुळे,के.ए.कुंभार,आर. एस.जाधवर,नितीन गायकवाड, जी.एस.जाधवर,एच.बी.मुंडे, नियत चालक एस.एम.खोबरे, वाहक पी.आर.गिरी,खराटे एस. ए.,लाटे व्ही.बी व आगारातील कर्मचारी व प्रवासी उपस्थित होते. कळंब -बार्शी -वैराग -मोहोळ – पंढरपूर- सातारा- वाई हा या नवीन नियमित व बसचा मार्ग आहे. कळंब येथून वैराग ,मोहोळ साठी सरळ बस नव्हती यामुळे या भागातील प्रवाशांना ही सुविधा उपलब्ध झाली आहे, वाई येथून कळंब कडे सकाळी ७.१५ वाजता सुटणार आहे.
error: Content is protected !!