धाराशिव – भारत जोडो अभियानाचे राष्ट्रीय समन्वयक योगेंद्र यादव यांच्या प्रमुख उपस्थितीत दिअकोला येथे महाराष्ट्र डेमोक्रॅ.२१ ऑक्टोबर २०२४ रोजी टिक फोरमच्या वतीने सभा आयोजित करण्यात आली होती.इतर वक्त्यांची भाषणं झाल्यावर प्रेक्षकांपैकी काही जणांनी ‘आम्हाला प्रश्न विचारायचे आहेत’ असे म्हणून आरडाओरडा सुरू केला. “आम्ही उत्तरे देऊ,सर्व भाषणे होऊ देत.”अशी भूमिका भारत जोडो अभियानाच्या नेत्यांनी घेतली. मात्र ते न ऐकता काही जण विचारमंचावर चढले,त्यांनी माईक ताब्यात घेतला आणि हुल्लडबाजी सुरू केली.ज्या वेगाने हे घडले,त्यावरून ही कृती पूर्वनियोजित असावी असे वाटते. त्यांनी योगेंद्र यादव यांना बोलूही दिले नाही व सभा उधळून लावली. या घटनेचा तीव्र शब्दात निषेध सर्व स्तरातून झाला पाहिजे असे आवाहन स्वराज इंडियाचे सदस्य प्रा.अर्जुन जाधव,सुभाष लोमटे,सागर जाधव,सुभाष घोडके,सुरेश शेळके,इंजि. तुकाराम मचे इत्यादींनी केले आहे.
More Stories
युद्धाचे पडसाद : सामान्य शेतकरी माणसाच्या आयुष्यातील बदल
धाराशिव जिल्हा परिषदेत अध्यक्ष अर्चनाताई पाटील यांचा गौरवपूर्ण सत्कार
लाडकी बहीण योजनेस गती; अंगणवाडी सेविकांचेही सक्रिय सहकार्य