February 9, 2026

धाराशिव जिल्हा पोलीसनामा

  • धाराशिव शहर वाहतुक शाखा व संबंधीत पोलीस ठाण्यांनी महत्त्वाच्या रस्त्यांवर दि.20ऑक्टोंबर रोजी मोटार वाहन कायदा- नियम भंग प्रकरणी एकुण 176 कारवाया करुन 1,22,300 ₹ ‘तडजोड शुल्क’वसुल केले आहे.
  • “रहदारीस धोकादायरीत्या वाहन उभे करणाऱ्यांवर गुन्हे नोंद.”
  • आनंदनगर पोलीस ठाणे :आरोपी नामे-समशेर खान सत्तारखान पठाण, वय 53 वर्षे रा. आनंदनगर धाराशिव ता. जि. धाराशिव,मोहसीन लायक तांबोळी, वय 32 वर्षे, रा. ताजमहल टॉकीजचे पाठीमागे धाराशिव ता. जि. धाराशिव यांनी दि.20.10.2024 रोजी 13.00 ते 13.40 वा. सु. आपआपल्या ताब्यातील अनुक्रमे ॲटो रिक्षा क्र एमएच 25 एके 1875 व बिगर परमिट रिक्षा हे महात्मा गांधीनगर सेन्ट्रल बॅक समोर धाराशिव व जिल्हा उद्योग केंद्र कार्यालय समोर सार्वजनिक रस्त्यावर रहदारीस धोकादायकरीत्या उभे केलेले असताना आनंदनगर पोलीसांना मिळून आले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तीविरुध्द भारतीय न्याय सहिंता कलम 285अन्वये आनंदनगर पो.ठा. येथे स्वतंत्र 2 गुन्हे नोंदवले आहेत.
  • तामलवाडी पोलीस ठाणे :आरोपी नामे-महेश दत्तात्रय बोंदर, वय 39 वर्षे,रा. चिखली ता. जि. धाराशिव यांनी दि.20.10.2024 रोजी 22.10 वा. सु.आपल्या ताब्यातील ईको कंपनीची गाडी क्र एमएच 12 टी.वाय.0447 एन एच 52 सोलापूर ते तुळजापूर जाणारे रोडवर टोल नाक्याजवळ सार्वजनिक रस्त्यावर रहदारीस धोकादायकरीत्या उभे केलेले असताना तामलवाडी पोलीसांना मिळून आले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तीविरुध्द भारतीय न्याय सहिंता कलम 285अन्वये तामलवाडी पो.ठा. येथे गुन्हा नोंदवला आहे.
  • “फसवणुक.”
  • तुळजापूर पोलीस ठाणे :फिर्यादी नामे-त्वरीता संजय सिंह, वय 32 वर्षे, रा.गोदरेज टिस आर व्ही प्लॉट 403 विक्रोळी ईस्ट मुंबई या देव दर्शनासाठी तुळजापूर येथे आल्या असता आरोपी नामे- विवेक लोंढे, रा. तुळजापूर ता. तुळजापूर जि. धाराशिव यांनी श्री. तुळजापूर संस्थानचा ट्रस्टी असल्याचे खोटे सांगून त्वरीता सिंह यांची दिशाभुल करुन व पुजा विधी साठी लाणारे साहित्या बाबत खोटी माहिती देवून 10,000₹ लागतील असे खोटी माहिती देवून तोतयागिरी करुन22,801 रुपयाचे बिल देवून त्वरीता सिंह यांची फसवणुक केली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-त्वरीता सिंह यांनी दि.20.10.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन तुळजापूर पो ठाणे येथे भा.न्या.सं.कलम 204, 318(2), 319(2) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
  • “ मारहाण.”
  • लोहारा पोलीस ठाणे :आरोपी नामे-रमेश पुनाजी राठोड, अजित धोंडीराम पवार, महेश धोंडीराम पवार, सर्व रा. हिप्परगा रवा ता. लोहारा जि. धाराशिव यांनी दि.19.10.2024 रोजी 20.00 ते 20.30 वा. सु. छत्रपती शिवाजी महाराज चौक हिप्परगा रवा येथे फिर्यादी नामे-महेश दामु राठोड, वय 35 रा. हिप्प्रगा रवा ता. लोहारा जि. धाराशिव यांचे भाउ सुनिल दामु राठोड यांना नमुद आरोपींनी मारहाण करत असताना महेश राठोड हे भांडण सोडवण्यासाठी गेले असता त्यांनाही शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, दगडने मारहाण करुन गंभीर जखमी केले. व जिवे ठार मारण्याची धमकी दिली.अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-महेश राठोड यांनी दि.20.10.2024 रोजी दिलेल्या वैद्यकीय जबाबावरुन लोहारा पो ठाणे येथे भा.न्या.सं.कलम 118(2),115(1),352,351(2), 3(5) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
  • ढोकी पोलीस ठाणे :आरोपी नामे-मिटू विठ्ठल घोरपडे, ऋषी मिटू घोरपडे,ललिता मिटू घोरपडे सर्व रा. आरणी ता. जि. धराशिव यांनी दि. 18.10.2024 रोजी 17.30 ते 18.00 वा. सु. शेत गट नं 550 आरणी शिवारातील शेतात फिर्यादी नामे- संगुना दिनेश गुळवे, वय 27 वर्षे रा. आरणी ता. जि. धाराशिव यांना नमुद आरोपींनी पाईप लाईनचे तोंड काडण्याच्या कारणावरुन शिवीगाळ करुन, लाथाबुक्यांनी, खोऱ्याने मारहाण करुन जखमी केले. व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-संगुना गुळवे दि.20.10.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन ढोकी पो ठाणे येथे भा.न्या.सं.कलम 118(1), 115(2),352, 351(2), 351(3), 3(5), अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
  • “रस्ता अपघात.”
  • उमरगा पोलीस ठाणे: मयत नामे-शरीफ निसार शेख, वय 38 वर्षे रा.बलसुर ता. उमरगा जि. धाराशिव दि.16.10.2024 रोजी 19.30 वा. सु. मोटरसायकल क्र एमएच 24 ए.एच. 9063 वरुन जात होते. दरम्यान बाबहसुरा पाटी जवळ उमरगा ते लातुर जाणारे रोडवर आयशर टॅम्पो क्र एमएच 36 ए.ए. 0885 चा चालकाने त्याचे ताब्यातील आयशर टॅम्पो हा हायगयी व निष्काळजीपणे चालवून शरीफ शेख यांचे मोटरसायकलला पाठीमागून धडक दिली. या अपघातात शरीफ शेख हे गंभीर जखमी होवून मयत झाले. तसेच आयशर टॅम्पो चालक हा जखमीस उपचार कामी घेवून न जाता वाहनासह पसार झाला. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-सोहेल हसन इनामदार, वय 27 वर्षे, रा. बलसुर ता. उमरगा जि. धाराशिव यांनी दि.20.10.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन उमरगा पो ठाणे येथे भा.न्या.सं. कलम 106(1) सह 184, 134(अ) (ब) मो वा का अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
  • जनसंपर्क विभाग धाराशिव पोलीस
  • “अवैध मद्य विरोधी विशेष मोहिमेदरम्यान जिल्हा भरात 11 छापे.”
  • मा. पोलीस अधीक्षक श्री. संजय जाधव व मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. गौहर हसन यांच्या आदेशावरुन काल रविवार दि. 20.10.2024 रोजी अवैध मद्य विरोधी विशेष मोहिम राबवण्यात आली. या मोहिमेदरम्यान 11 कारवाया करण्यात आल्या. या छाप्यात घटनास्थळावर आढळलेला गावठी दारु निर्मीतीचा सुमारे 4,500 लि. द्रव नाशवंत असल्याने तो जागीच ओतून नष्ट करण्यात आला तर सुमारे 599 लि. गावठी दारु व देशी- विदेशी दारुच्या एकुण 155 बाटल्या असे मद्य जप्त केले. ओतून दिलेला मद्यार्क निर्मीतीचा द्रव व जप्त मद्य यांची एकत्रीत किंमत अंदाजे 3,47,990 ₹ आहे. यावरुन 11 व्यक्तींविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायद्यांतर्गत संबंधीत पोलीस ठाण्यात 11 गुन्हे खालीलप्रमाणे नोंदवण्यात आले आहेत.
  • 1) तामलवाडी पोलीस ठाण्याच्या पथकाने खडकी परिसरात 13.50 वा. दरम्यान छापा टाकला. यात वडजी तांडा ता. दक्षिण सोलापूर जि. सोलापूर येथील- लिंबाजी थावरु राठोड, वय 65 वर्षे, हे खडकी शिवारातील शेत गट नं 72 मध्ये गावठी दारु निर्मीतीचा गुळ- पाणी मिश्रीत अंबवलेला एकुण सुमारे 2,400 लि. द्रव व 15 लि. गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने बाळगलेले असताना पथकास आढळले.
  • 2) स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जागजी तांडा या ठिकाणी छापा टाकला. यात ढोकी पो.ठा. हद्दीत जागजी लमाण तांडा, ता. जि. धाराशिव येथील- केशव शंकर राठोड, वय 25 वर्षे, रेखाबाई रमालाल चव्हाण, वय 45 वर्षे, रंगनाथ बंकट आडे, वय 60 वर्षे, शांताबाई बाबुराव जाधव, वय 56 वर्षे,रमेश भिमा चव्हाण, वय 41 वर्षे, हे जागजी तांडा येथे आपआपल्या घरासमोर गावठी दारु निर्मीतीचा गुळ- पाणी मिश्रीत अंबवलेला सुमारे 1,600 लिटर द्रव व 240 लि. गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने बाळगलेले असताना पथकास आढळले.
  • 3) नळदुर्ग पो.ठा. च्या पथकाने आरळी शिवार व अणदुर गावात 2 छापे टाकले. यावेळी वत्सालनगर अणदुर ता. तुळजापूर जि. धाराशिव येथील- किशोर शिवाजी कांबळे, हे 19.00 वा. सु. आपल्या राहत्या घरासमोर गावठी दारु 50 लिटर अवैध विक्रीच्या उद्देशाने बाळगलेले असताना आढळले. तसेच आरळी बु. ता. तुळजापूर जि. धाराशिव येथील-मारुती व्यंकट कचरे, वय 30 वर्षे, हे आरळी शिवार येथे गावठी दारु 34 लिटर अवैध विक्रिच्या उद्देशाने बाळगलेले असताना आढळले.
  • 4) कळंब पो.ठा. च्या पथकाने अंदोरा व मस्सा खंडेश्वरी गावात 2 छापे टाकले. यावेळी मस्सा खंडेश्वरी ता. कळंब जि. धाराशिव येथील- शिला नवनाथ कांबळे, वय 25 वर्षे, या 14.30 वा. सु. आपल्या राहत्या घरासमोर गावठी दारु निर्मीतीचा गुळ- पाणी मिश्रीत अंबवलेला सुमारे 1,600 लि. द्रव 200 लिटर अवैध विक्रीच्या उद्देशाने बाळगलेले असताना आढळले. तसेच अंदोरा ता. कळंब जि. धाराशिव येथील-सुभाबाई बिभीषण काळे, वय 44 वर्षे, या आपल्या राहत्या घरासमोर देशी विदेशी दारुच्या 155 सिलबंद बाटल्या अवैध विक्रिच्या उद्देशाने बाळगलेले असताना आढळले.
  • 5)येरमाळा पो.ठा. च्या पथकाने चोराखळी गावात छापा टाकला. यावेळी चोराखळी ता. कळंब जि. धाराशिव येथील- गंगुबाई उध्दव काळे, या आपल्या राहत्या घरासमोर गावठी दारु निर्मीतीचा गुळ- पाणी मिश्रीत अंबवलेला सुमारे 200 लिटर द्रव व 10 लि. गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने बाळगलेले असताना आढळले.
  • 6)तुळजापूर पो.ठा. च्या पथकाने तुळजापूर तालुक्यातील मंगरुळ गावात छापा टाकला. यावेळी -संजय अनिल कोरेकर, वय 40 वर्षे हे मंगरुळ शिवारात 159 लिटर गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने बाळगलेले असताना आढळले.
  • 7)वाशी पो.ठा. च्या पथकाने वाशी तालुक्यातील दसमेगाव पारधी पिडी येथे छापा टाकला. यावेळी -पोपट आप्पा शिंदे, वय 31 वर्षे हे दसमेगावाकडे जाणारे रोडलगत आपल्या राहत्या पत्र्याचे शेडसमोर गावठी दारु निर्मीतीचा गुळ- पाणी मिश्रीत अंबवलेला सुमारे 100 लिटर द्रव व 40 लि. गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने बाळगलेले असताना आढळले.
  • 8)मुरुम पो.ठा. च्या पथकाने सुंदरवाडी गावात छापा टाकला. यावेळी- महासागर बाबु कांबळे, वय 47 वर्षे हे आपल्या राहत्या घरासमोर 52 लिटर गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने बाळगलेले असताना आढळले.
  • 9)आनंदनगर पो.ठा. च्या पथकाने आनंदनगर पो.ठा. हद्दीत छापा टाकला. यावेळी जरीया हॉटल जवळ दत्तनगर धाराशिव ता. जि. धाराशिव येथील-मारुती बापु शिंदे, हे जरीया हॉटेल दत्तनगर येथे 14 लिटर गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने बाळगलेले असताना आढळले.(सोबत अवैध मद्य विरोधी छाप्याची छायाचित्रे.)
  • जनसंपर्क विभाग धाराशिव पोलीस
error: Content is protected !!