February 10, 2026

धाराशिव शहर बंदला व्यापार्‍यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

  • धाराशिव – शहरातील प्रमुख आणि अंतर्गत रस्ते,भुयारी गटारीच्या कामांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याने एका युवकाचा रस्त्यावरील खड्ड्याने बळी घेतला.या घटनेनंतर शहरातील नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली होती. जिल्हा व्यापारी महासंघाच्या पुढाकारातून विविध 36 संघटनांच्या पदाधिकार्यांनी एकत्र येवून सोमवारी दिलेल्या बंदच्या हाकेला व्यापार्यांनी चांगला प्रतिसाद दिला. दुपारपर्यंत शहरातील व्यापार्यांनी आपले दुकाने बंद ठेवून घटनेचा आणि नाकर्त्या प्रशासनाचा निषेध व्यक्त केला.
    मागील तीन वर्षांपासून शहरातील सर्व प्रमुख आणि अंतर्गत रस्त्यांची स्थिती गंभीर आहे. वेळोवेळी नागरिक, विविध संघटनांनी याबाबत आवाज उठवला. परंतु सुस्थ प्रशासनाने याची कसलीही दखल घेतली नाही.याचाच परिणाम म्हणून शहरातील तरूण व्यापारी ओंकार जाधवर यांचा खड्ड्यामुळे दुर्दैवी मृत्यू झाला. त्यामुळे संबंधित यंत्रणेवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी आग्रहाची मागणी व्यापार्यांमधून झाली आहे. सोमवारी विविध 36 संघटनांनी पुकारलेल्या शहर बंदच्या हाकेला प्रतिसाद देत व्यापारी महासंघासह विविध संघटनांच्या पदाधिकारी, सदस्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा काढण्यात आला.
  • मूकमोर्चात 48 संघटनांचा सहभाग –
    जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आलेल्या मूकमोर्चात 48 विविध संघटनांच्या पदाधिकारी, सदस्यांनी सहभाग नोंदविला होता. यात जिल्हा व्यापारी महासंघ, कन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स, जिल्हा सराफ व सुवर्णकार असोसिएशन, जिल्हा केमिस्ट व ड्रगिस्ट असोसिएशन, जिल्हा विधीज्ञ मंडळ, जिल्हा पत्रकार संघ, जिल्हा मराठी पत्रकार संघ, व्हाईस ऑफ मीडिया धाराशिव, जिल्हा मोटार मालक असोसिएशन, इंडियन मेडिकल असोसिएशन, जिल्हा सीड्स व फर्टीलाइजर असो, जिल्हा टॅक्स प्रैक्टिशनर असोसिएशन, प्रोफेशनल टीचर्स असोसिएशन, जिल्हा हॉटेल व बार असोसिएशन, धाराशिव पेट्रोल पंप डीलर्स असोसिएशन, धाराशिव विद्यार्थी वाहतूक संघटना, उस्मानाबाद विद्यार्थी वाहतूक संघटना, धाराशिव मशिनरी व ड्रिप असोसिएशन, कापड व्यापारी असो, जिल्हा मुद्रक संघ, धाराशिव पेंट्स असो, शिवराज्याभिषेक सोहळा समिती, अण्णासाहेब पाटील विकास फाउंडेशन धाराशिव, राष्ट्रीय मराठा महासंघ, महाराष्ट्र नाभिक महामंडळ शाखा धाराशिव,फुले – शाहू – आंबेडकर उद्यान कृती समिती,धाराशिव जिल्हा सर्व शिक्षक संघटना समन्वय समिति धाराशिव, शिवा अखिल भारतीय वीरशैव लिंगायत युवा समिती, सराफ सुवर्णकार कारागीर संघटना, किराणा व्यापारी संघटना, इलेक्ट्रिकल व इलेक्ट्रॉनिक्स संघटना, फर्निचर व्यापारी असोे, अड़त व्यापारी संघटना, शिवराज्याभिषेक सोहळा समिती अंतर्गत रिक्षा संघटना, उस्मानाबाद शहर रीक्षा संघटना, बारा बलुतेदार महासंघ, अखिल भारतीय नाट्य परिषद शाखा धाराशिव, ओसला (ओयासीस लेडीज फाउंडेशन) ग्रुप धाराशिव, अक्षरवेल महिला साहित्य मंडळ धाराशिव, क्रेडाई शाखा धाराशिव, इंजिनियर्स अ‍ॅन्ड आर्किटेक्ट्स असो धाराशिव, आयुर्वेद व्यासपीठ धाराशिव, लघु – उद्योग भारती धाराशिव, महानंदा प्रतिष्ठान धाराशि, शिव – शंभुप्रतिष्ठान धाराशिव, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद धाराशिव, राष्ट्रीय चर्मकार महासंघ शाखा धाराशिव, धाराशिव मंडप अ‍ॅन्ड डेकोरेशन असोसिएशन, राजस्थानी युवा संघ धाराशिव.
error: Content is protected !!