“छत्रपती संभाजी नगर – आर.एस.एस प्रणीत भाजपा सरकारनी देशात व राज्यात केलेल्या असंविधानिक कामाचा भांडाफोड करून त्यांनी केलेली खोटी कामे व महाविकास आघाडीची खरी कामे घराघरात जाऊन सर्वसामान्य जनतेस सांगा असे आवाहन भारत जोडो अभियानच्या विभागीय कार्यकर्त्यांच्या बैठकीत राष्ट्रीय समन्वयक प्रा.योगेंद्र यादव यांनी केले. दिनांक १४ ऑक्टोबर २०२४ रोजी गांधी भवन छत्रपती संभाजी नगर येथे भारत जोडो अभियानच्या मराठवाडा विभागीय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत मराठवाड्यातील आठही जिल्ह्यातून प्रमुख १०० कार्यकर्त्यांची उपस्थिती नोंदवली गेली. या बैठकीत भारत जोडो अभियानचे राष्ट्रीय संयोजक प्रा.योगेंद्र यादव,प्रा.अजित झा, प्रदेश समन्वयक साथी उल्का महाजन,ललित बाबर,प्रशिक्षक राजू भीसे,अँड.रुबीना सय्यद,डॉ. इक्बाल शेख यांनी येणाऱ्या विधानसभेसाठी सामोरे जावून भाजपाचा पराभव कसा करायचा ती रणनिती सांगितली. या बैठकीची प्रस्तावना अँड. सुभाष सांवगीकर यांनी केली तर सूत्रसंचालन साथी सुभाष लोमटे यांनी केले व आभार प्रा.सुभाष मेहर यांनी मानले.
More Stories
ऊसतोडणी कामगार महिलांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आरोग्य मित्र उपक्रम- रुपाली चाकणकर
सस्ती अदालत उपक्रमातून 560 शेतरस्ते व पाणंद रस्ते मोकळे
हमाल कष्टकऱ्यांच्या बाईक रॅली ने केले शहरात जनजागरण