धाराशिव (जिमाका) – ज्यांचे वय वर्षे ६५ व त्यापेक्षा जास्त आहे अशा ज्येष्ठ नागरिकांना त्यांचे दैनंदिन जीवन सुसाहयपणे जगण्यासाठी आणि त्यांना वयोमानपरत्वे येणारे दिव्यांगत्व आणि अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक सहाय्य साधने/ उपकरणे खरेदी करण्यासह, मनःस्वास्थ केंद्र,योगोपचार केंद्र इत्यादीद्वारे त्यांचे मानसिक स्वास्थ अबाधित ठेवण्यासाठी मुख्यमंत्री वयोश्री योजना राबविण्यात येत आहे.या योजनेचा लाभ घेण्याची मुदत आता ३१ ऑक्टोबरपर्यंत वाढविण्यात आली आहे.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी ज्या नागरिकांचे वय ३१ डिसेंबर २०२३ रोजी ६५ वर्ष पूर्ण झाले आहे व लाभार्थ्यांचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न २ लक्ष रुपयांच्या आत असून त्या पात्र लाभार्थ्यांना चष्मा,श्रवणयंत्र, ट्रायपॉड,स्टिक व्हील चेअर,फोल्डिंग वॉकर,कमोड खुर्ची,नि – ब्रेस,लंबर बेल्ट व सर्वाइकल कॉलर इ.साधने उपकरणे खरेदी करण्याकरीता एकवेळ एकरकमी ३ हजार रुपयेच्या मर्यादेत निधी वितरीत करण्यात येईल. तरी ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत ६५ वर्ष पुर्ण व लाभार्थ्याचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न २ लक्ष रुपयांच्या आत असलेले जिल्हयातील पात्र लाभार्थ्यांना जिल्हास्तरावर अर्ज सादर करण्यासाठी अडचण निर्माण होत असल्याने लाभार्थ्यांना अर्ज सादर करणे सोईचे व्हावे याकरीता पात्र लाभार्थ्यांनी संबंधित ग्रामपंचायत कार्यालयास अर्ज सादर करावे.असे आवाहन समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त बाबासाहेब अरवत यांनी केले आहे.
More Stories
धाराशिव शहरातील कचरा डेपो इतरत्र हलविण्याची शिवसेना (उ.बा.ठा) पक्षाची मागणी
पहिला आयुर्वेदिक हिमोफिलिया संशोधन प्रकल्प ‘रक्तामृत’चा धाराशिवमध्ये दिमाखदार शुभारंभ
फॉरेस्टच्या गवतावर तणनाशक फवारणी करून वृक्षलागवडीची नासधूस:वनपालावर कारवाईची मागणी