धाराशिव (जिमाका) – आशियाई विकास बँक अर्थसहाय्यित प्रकल्पांतर्गत टप्पा -3 कामाचा ऑनलाईन पध्दतीने भुमीपूजन समारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार,सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत ११ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता धाराशिव तालुक्यातील चिखली चौरस्ता येथे आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमासाठी पालकमंत्री प्रा.डॉ. तानाजीराव सावंत,खासदार ओमराजे निंबाळकर,विधानपरिषद सदस्य विक्रम काळे,सतीश चव्हाण, विधानसभा सदस्य राणाजगजीतसिंह पाटील,ज्ञानराज चौगुले,कैलास पाटील घाडगे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. जिल्हयातील धाराशिव तालुक्यातील कळंब-ढोकी-तेर-बेंबळी-तुळजापूर-अक्कलकोट रस्ता रामा -२०८ किमी ३४.०० ते ७६/४०० ( मार्ग- तेर ते तुळजापूर ) मधील रस्त्याची सुधारणा करणे (एकुण लांबी ४२.४० किमी) (टप्पा-३) या कामाचा समावेश आशियाई विकास बँक अर्थसहाय्यित प्रकल्पांतर्गत आहे.या कार्यक्रमाला नागरिकांनी उपस्थित राहावे.असे आवाहन मुख्य अभियंता कोकण तथा प्रकल्प संचालक बांधकाम विभाग मुंबई शरद राजभोज, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता बाबासाहेब थोरात,कार्यकारी अभियंता शेषराव चव्हाण,उपविभागीय क्रमांक.1 चे उपविभागीय अभियंता प्रकाश मोरे यांनी केले आहे.
More Stories
निवडणुकीत ७ लक्ष ४७ हजार ३७० मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क
इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या पुरस्काराकरिता अर्ज करण्याचे आवाहन
मतदानाचा हक्क बजावण्यासाठी कामगारांना ७ फेब्रुवारी रोजी भरपगारी रजा देणे बंधनकारक