June 20, 2025

धाराशिव जिल्हा पोलीसनामा

  • धाराशिव शहर वाहतुक शाखा व संबंधीत पोलीस ठाण्यांनी महत्त्वाच्या रस्त्यांवर दि.07 ऑक्टोंबर रोजी मोटार वाहन कायदा- नियम भंग प्रकरणी एकुण 95 कारवाया करुन 67,850 ₹ ‘तडजोड शुल्क’वसुल केले आहे.
  • “ जुगार विरोधी कारवाई.”
  • धाराशिव शहर पोलीस ठाणे :जुगार विरोधी कारवाई दरम्यान धाराशिव शहर पोलीसांनी दि.07.10.2024 रोजी 14.00 वा. सु.धाराशिव शहर पो ठाणे हद्दीत छत्रपती शिवाजी महाराज चौकाजवळ वेंकीज फ्लॉवर स्टॉल डेकोरेशन समोर मोकळ्या जागेत धाराशिव येथे छापा टाकला. यावेळी आरोपी नामे-सुधीर सुभाष कुलकर्णी, वय 45 वर्षे, रा.राधाकृष्ण मंदीराजवळ आनंदनगर धाराशिव ता. जि. धाराशिव हे 14.00 वा. सु.छत्रपती शिवाजी महाराज चौकाजवळ वेंकीज फ्लॉवर स्टॉल डेकोरेशन समोर मोकाळ्या जागेत धाराशिव येथे कल्याण मटका जुगाराचे साहित्यासह एकुण 1,100 ₹ रक्कम स्वत:चे कब्जात बाळगलेले धाराशिव शहर पो. ठाणेच्या पथकास आढळले. यावरुन पोलीसांनी जुगार साहित्यासह रक्कम जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम- 12 (अ) अन्वये धाराशिव शहर पो ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे.
  • “ मालमत्तेविरुध्द गुन्हे.”
  • तुळजापूर पोलीस ठाणे :फिर्यादी नामे-बेबी सचिन चव्हाण, वय 21 वर्षे, रा.मुसाळी लमाण तांडा ता. देवहिप्परगी जि. विजापूर या दि.07.10.2024 रोजी 13.00 वा. सु. श्री. तुळजाभवानी मंदीरात देवदर्शनासाठी आल्या असता मंदीरासमोरील शहाजी महाद्वार येथे संशयीत आरोपी नामे-काजल शकंर भोसले, वय 30 वर्षे, रा. एस क्लब जवळ छत्रपती संभाजीनगर हिने बेबी चव्हाण यांना धक्काबुक्की करुन त्यांचे बाळाचे पायातील 45 भाराचे चांदीचे दागिने अंदाजे 3,500₹ किंमतीचे जबरीने चोरुन नेले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-बेबी चव्हाण यांनी दि.07.10.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन तुळजापूर पो. ठाणे येथे गुरनं 461/2024 कलम भा.न्या.सं.309(4)अन्वये गुन्हा नोंदवला आहे. तसेच फिर्यादीने दिलेल्या माहितीवरुन स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पेट्रोलिंग दरम्यान आरोपी नामे-काजल शकंर भोसले, वय 30 वर्षे, रा. एस क्लब जवळ छत्रपती संभाजीनगर हीस ताब्यात घेवून सदर गुन्ह्या संदर्भात चौकशी केली असता नमुद आरोपीने सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिली. पुढील तपास सुरु आहे.
  • “ मारहाण.”
  • लोहारा पोलीस ठाणे :आरोपी नामे-फुलचंद लिबंराज कांबळे, शुभम फुलचंद कांबळे, अंकुश लिबंराज कांबळे,लहु लिबंराज कांबळे,नंदा फुलचंद कांबळे,ताई लिंबराज कांबळे सर्व रा. लोहारा खु. ता. लोहारा जि. धाराशिव यांनी दि.06.10.2024 रोजी 17.00 वा. सु.लोहारा खु. फिर्यादी नामे-शेषेराव बाबाराव रसाळ, वय 71 वर्षे, रा. लोहारा खु. ता.लोहारा जि. धाराशिव यांना व त्यांचा मुलगा यांना नमुद आरोपींनी गैरकायद्याची मंडळी जमवून विनाकाराण शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, काठीने मारहाण करुन गंभीर जखमी केले. व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-शेषेराव रसाळ यांनी दि.07.10.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन लोहारा पो ठाणे येथे भा.न्या.सं.कलम 118(2), 351 (2)(3), 352, 189(2),190, 191(2) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
  • ढोकी पोलीस ठाणे :आरोपी नामे- राजकिरण प्रकाश ढवारे, रा. ढोकी ता.जि. धाराशिव यांनी दि.06.10.2024 रोजी 06.45 वा. सु.ग्रामपंचायत समोर ढोकी येथे फिर्यादी नामे-महादेव नारायण सुपलकर, वय 36 वर्षे, रा. तळगल्ली ढोकी ता. जि. धाराशिव यांना नमुद आरोपीने काही एक कारण नसताना शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, दगडाने मारहाण करुन गंभीर जखमी केले. व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-महादेव सुपलकर यांनी दि.07.10.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन ढोकी पो ठाणे येथे भा.न्या.सं.कलम 118(2), 115(2), 352, 351(2) 351(3) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
  • तामलवाडी पोलीस ठाणे :आरोपी नामे-सुरेश बबन गांधले, निता सुरेश गांधले, दोघ रा. जवळगाव ता. बार्शी जि. सोलापूर यांनी दि.05.10.2024 रोजी 11.00 वा. सु. खुंटेवाडी शिवारातील शेत गट नं 225 येथे फिर्यादी नामे-शामल बिभीषण गांधले, वय 45 वर्षे, रा.जवळगाव नं 2 ता. बार्शी जि. सोलापूर यांना व त्यांच पती बिभीषण गांधले यांना नमुद आरोपींनी रस्त्याने जाण्याचे कारणावरुन शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, कोयत्याने मारहाण करुन जखमी केले. व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-शामल गांधले यांनी दि.07.10.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन तामलवाडी पो ठाणे येथे भा.न्या.सं.कलम 118(1), 115(2),352, 351(2) (3), 3(5) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
  • ढोकी पोलीस ठाणे :आरोपी नामे-महादेव नारायण सुपलकर, रा.तळगल्ली ढोकी ता.जि. धाराशिव यांनी दि.06.10.2024 रोजी 06.45 वा. सु.ग्रामपंचायत समोर ढोकी येथे फिर्यादी नामे- राजकिरण प्रकाश ढवारे वय 42 वर्षे, रा. भिमनगर ढोकी ता. जि. धाराशिव यांना नमुद आरोपीने काही एक कारण नसताना शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, बतईने मारहाण करुन जखमी केले. व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-राजकिरण ढवारे यांनी दि.07.10.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन ढोकी पो ठाणे येथे भा.न्या.सं.कलम 118(1), 351(2) 351(3) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
  • जातीवाचक शिवीगाळ करुन मारहाण करणाऱ्यांवर गुन्हा दाखल.”
  • लोहारा पोलीस ठाणे :आरोपी नामे-हनुमंत शेषेराव रसाळ, श्रावण शिवाजी रसाळ,दादा वसंत रसाळ सर्व रा. लोहारा खु. ता. लोहारा जि. धाराशिव यांनी दि.06.10.2024 रोजी 17.00 वा. सु.लोहारा खु. फिर्यादी नामे-फुलचंद लिंबराज कांबळे, वय 40 वर्षे, रा. लोहारा खु. ता.लोहारा जि. धाराशिव यांना व त्यांची पत्नी मुलगी यांना मुलीकडे बघून का हासला असे विचाण्याचे कारणावरुन नमुद आरोपींनी जातीवाचक शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, काठीने मारहाण करुन जखमी केले.अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-फुलचंद कांबळे यांनी दि.07.10.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन लोहारा पो ठाणे येथे भा.न्या.सं.कलम 115(2), 352, 79, 3(5), सह अ.जा.ज.अ.प्र.अधिनियम कलम 3(1)(आर)(एस), 3(1) (डब्ल्यु),(ii) 3(2) (व्हिए) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
  • “रस्ता अपघात.”
  • तुळजापूर पोलीस ठाणे: मयत नामे-अनिल शेषेराव जाधव, वय 38 वर्षे, रा. आतनुर ता. जळकोट जि. लातुर हे दि.04.10.2024 रोजी 17.00 वा. सु. सोलापूर ते तुळजापूर हायवे रोडवरुन मोटरसायकल क्र एमएच 24 बी वाय 7853 ही वरुन जात होते. दरम्यान सिंदफळ बायपास जवळ सिंदफळ शिवार येथे बस क्र एमएच 13 डी. क्यु.7428 चा चालक त्याचे ताब्यातील बस ही हायगयी व निष्काळजीपणे चालवून अनिल जाधव यांचे मोटरसायकलला पाठीमागून धडक दिली. या अपघातात अनिल जाधव हे गंभीर जखमी होवून मयत झाले.अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- गजानन शेषेराव जाधव, वय 42 वर्षे, रा. आतनुर ता. जळकोट जि. लातुर यांनी दि.07.10.2024 दिलेल्या प्रथम खबरेवरुन तुळजापूर पो ठाणे येथे भा.न्या.सं. कलम 281, 106 सह कलम 184 मोवाका अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
  • नळदुर्ग पोलीस ठाणे: फिर्यादी नामे-राहुल गोरख दुधभाते, वय 30 वर्षे, मयत नामे-प्रियंका राहुल दुधभाते, वय 24 वर्षे, दोघे रा. धनगरवाडी ता.तुळजापूर जि.धाराशिव हे दोघे दि.07.10.2024 रोजी 07.45 वा. सु.एनएच 65 सोलापूर ते हैद्राबाद जाणारे हायवे रोडवरुन मोटरसायकल क्र एमएच 13 ए.के.8746 ही वरुन महालक्ष्मी देवदर्शनासाठी जात होते. दरम्यान जानकी हॉस्पीटलचे गेट समोर आणदुर येथे पांढरे रंगाचे होक्सवॅगन होंडा कंपनीची कार क्र टीएस 07 टी.आर.6391 चा चालक त्याचे ताब्यातील कार ही हायगयी व निष्काळजीपणे चालवून राहुल दुधभाते यांचे मोटरसायकलला पाठीमागून धडक दिली. या अपघातात प्रियंका दुधभाते या गंभीर जखमी होवून मयत झाल्या. तर राहुल दुधभाते हे किरकोळ जखमी झाले.अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- राहुल दुधभाते यांनी दि.07.10.2024 दिलेल्या प्रथम खबरेवरुन नळदुर्ग पो ठाणे येथे भा.न्या.सं. कलम 281,125(अ), 125(ब), 106 सह कलम 184 मोवाका अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
  • जनसंपर्क विभाग धाराशिव पोलीस
error: Content is protected !!