धाराशिव (जिमाका) – विमुक्त जाती,भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्ग या प्रवर्गातील १२ वीनंतरचे उच्चशिक्षण घेत असलेल्या मुला-मुलींच्या शासकीय वसतिगृहे सुरु करण्याची योजना सुरु झाली आहे. जिल्हयात १०० मुलांसाठी व १०० मुलींसाठी वसतिगृह चालू करण्यात येणार आहे.या वसतिगृहाचे लोकापर्ण केद्रीय परिवहन,महामार्ग विभागाचे मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते होणार आहे.या कार्यक्रमाचे अध्यक्ष उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रमुख अतिथी म्हणून गृहनिर्माण इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे,सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री तानाजीराव सावंत यांच्या उपस्थितीत जिल्हयातील इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या मुलां-मुलींच्या २ शासकिय वसतिगृह इमारतीचे दुरदृश्याप्रणालीद्वारे ९ ऑक्टोबर रोजी दुपारी १ : ३० वाजता डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्यायभवन,धाराशिव येथे लोकार्पण सोहळा होणार आहे. या कार्यक्रमास विद्यार्थ्यांनी व त्यांच्या पालकांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे.असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सहायक संचालक बाबासाहेब अरवत यांनी केले आहे.
More Stories
युद्धाचे पडसाद : सामान्य शेतकरी माणसाच्या आयुष्यातील बदल
धाराशिव जिल्हा परिषदेत अध्यक्ष अर्चनाताई पाटील यांचा गौरवपूर्ण सत्कार
लाडकी बहीण योजनेस गती; अंगणवाडी सेविकांचेही सक्रिय सहकार्य