धाराशिव (जिमाका) – राज्यात गाईचा दुधाला शासनाने प्रती लीटर ५ रूपये अनुदान योजना लागू केली आहे.त्यानुसार जिल्ह्यातील एकूण ४३ दुग्ध प्रकल्पाने यामध्ये सहभाग घेतलेला आहे.जिल्ह्यातील प्रकल्पाच्या अंतर्गत येणाऱ्या संकलन केंद्र व संकलन केंद्राला पुरवठा करणारे दूध उत्पादक शेतकरी सभासद यांच्या खात्यावर ५ रुपये प्रती लीटर अनुदान देण्याचे काम या योजनेतून सुरु आहे. सहभागी प्रकल्पांना शासनाने आय डी / पासवर्ड दिलेला आहे.त्यानुसार संगणक प्रणालीवर सर्व दुध उत्पादकांची माहिती १९६२ अँपवरुन जनावरे,त्यांचा टॅग नंबर,शेतकऱ्यांचा युनिक नंबर इत्यादी तसेच दूध उत्पादन त्यांची गुणप्रत याची योग्य ती माहिती दुग्धव्यवसाय विभागाने विकसित केलेल्या संकेतस्थळावर भरावयाची आहे. (Checker) चेकरद्वारे आलेल्या त्रुटी दुरुस्तीसाठी कळवायच्या आहेत. यासाठी स्थानिक संबधित कार्य क्षेत्रातील पशुवैदयकीय संस्था, तालुकास्तरीय अधिकारी आणि जिल्हा दुग्धव्यवसाय अधिकारी यांच्याशी संपर्क करावा.अधिक माहितीसाठी जिल्हा दुग्धव्यवसाय विभाग,पशुसंवर्धन विभाग यांचे संबंधीत अधिकारी व कर्मचारी यांचेशी संपर्क करावा. गाईच्या दुधास प्रती लीटर ५ रुपये अनुदान योजनेचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे यांनी नुकतीच व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. या बैठकीत सहभागी ४३ प्रकल्पधारक,दुध उत्पादक शेतकरी,पशुसंवर्धन विभाग अधिकारी / कर्मचारी,सहकार विभाग अधिकारी / कर्मचारी /दुग्धव्यवसाय विभाग अधिकारी कर्मचारी सहभागी झाले होते.जिल्हाधिकारी डॉ.ओंबासे यांनी या योजनेसंदर्भात येणाऱ्या अडचणीबाबत विचारणा केली तसेच जास्तीत जास्त शेतकऱ्यांना या योजनेत सहभागी करून घेऊन जास्तीत जास्त लाभ मिळवून देण्याबाबत सूचना करून दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन केले.तसेच शासनस्तरावर याबाबत येणाऱ्या अडचणीबाबत योग्य ती मदत व सहकार्य केले जाईल.असे सांगितले.
More Stories
धाराशिव शहरातील कचरा डेपो इतरत्र हलविण्याची शिवसेना (उ.बा.ठा) पक्षाची मागणी
पहिला आयुर्वेदिक हिमोफिलिया संशोधन प्रकल्प ‘रक्तामृत’चा धाराशिवमध्ये दिमाखदार शुभारंभ
फॉरेस्टच्या गवतावर तणनाशक फवारणी करून वृक्षलागवडीची नासधूस:वनपालावर कारवाईची मागणी