धाराशिव (जिमाका) – महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघ,मुंबई व नाफेड व एनसीसीएफ कार्यालय,मुंबई यांच्या संयुक्त विद्यमानाने हंगाम सन २०२४-२५ मध्ये राज्यात केंद्र शासनाने निश्चित केलेल्या आधारभुत दरानुसार नाफेड व एनसीसीएफ मार्फत मुग,उडिद व सोयाबीन खरेदीकरीता शेतकरी नोंदणी दिनांक १ ऑक्टोबर २०२४ पासुन सुरु करण्यात आली आहे.प्रत्यक्षात मुग व उडिद खरेदी दिनांक १० ऑक्टोबर २०२४ पासून सुरु झाली आहे.सोयाबीन खरेदी १५ ऑक्टोबर २०२४ पासुन सुरु करण्यात येणार आहे. राज्य शासनाने नियुक्त केलेल्या नाफेड या केंद्र सरकारच्या नोडल एजन्सीला धाराशिव जिल्ह्यात १५ ठिकाणी खरेदी केंद्र सुरू करण्यास मंजुरी दिली आहे.या खरेदी केंद्रातून मूग,उडीद व सोयाबीनची खरेदी करण्यात येणार आहे. धाराशिव जिल्हयात खालीलप्रमाणे मुंग,उडीद व सोयाबीन नोंदणी व खरेदीकरीता एकूण १५ केंद्र सुरू करण्यात आले आहे. तालुका,खरेदी केंद्र व संस्थेचे नाव ठिकाण पुढीलप्रमाणे आहे.तालुका,खरेदी केंद्र ठिकाण व खरेदी केंद्र संस्थेचे नाव पुढीलप्रमाणे आहे.धाराशिव तालुका – धाराशिव तालुका शेतकरी सह संघ लि,धाराशिव,खरेदी केंद्र टाकळी (बे), विकास कृषी पणन सहकारी संस्था मर्या धाराशिव,खरेदी केंद्र चिखली,वसुधरा जिल्हा कृषी पणन व प्रक्रीया सह.संस्था कनगरा,तुळजापूर तालुका – तुळजापूर येथिल तुळजापूर तालुका शेतकी सहकारी खरेदी विक्री संघ,ता.तुळजापूर,नळदुर्ग येथे श्री खंडोबा पणन सहकारी संस्था मर्या अणदूर. लोहारा तालुका – दस्तापूर येथे दस्तापुर विविध सर्व सेवा सहकारी संस्था मर्यो दस्तापुर,उमरगा तालुका – गुंजोटी येथे गुंजोटी विविध सर्व सेवा सहकारी संस्था मर्यो गुंजोटी,उमरगा येथे श्री स्वामी समर्थ सर्व सेवा सहकारी संस्था मर्या गुंजोटी, कळंब तालुका – कळंब येथे एकता खरेदी विक्री सहकारी संस्था मर्या धाराशिव, शिराढोण येथे तालुका सह.शेतकरी खरेदी विक्री संघ लि.कळंब,चोराखेळी येथे राजमाता कृषी पुरक सेवा पुरवठा सहकारी संस्था चोराखळी,वाशी तालुका – वाशी येथे वाशी तालुका शेतकरी सह संघ लि, वाशी, भूम तालुका – भूम येथे शिवाजी भुम तालुका शेतकरी सह.खरेदी विक्री संघ लि.भूम.ईट येथे तनुजा महिला शेतीपूरक सेवा पुरवठा सह संस्था सोनेवाडी आणि सोन्नेवाडी येथे कै.उत्तमराव सोन्ने कृषीमाल पुरक सह.संस्था सोनेवाडी या १५ ठिकाणी मूग,उडीद व सोयाबीन खरेदी करण्यात येणार आहे. तरी सर्व शेतकरी बांधवांनी केंद्र शासनाने निश्चित केलेल्या आधारभुत दरानुसार मुंग,उडिद व सोयाबीन खरेदी योजनेचा लाभ घ्यावा.ही योजना शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य भाव मिळावा याकरीता राबविण्यात येत आहे.त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी मुंग,उडिद व सोयाबीन विक्रीकरीता आपल्या गावाजवळील नाफेडच्या खरेदी केंद्रावर जावुन ७/१२ उतारा,आधारकार्ड व बँकेचे पासबुक घेवुन प्रथम आपल्या पिकाची नोंदणी करुन घ्यावी. आपणास एसएमएस आल्यानंतर शेतमाल विक्रीसाठी खरेदी केंद्रावर घेवुन यावा व जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा,असे आवाहन पणन महासंघाचे अध्यक्ष दत्तात्रय पानसरे,उपाध्यक्ष रोहीत निकम, सर्व संचालक मंडळ,व्यवस्थापकीय संचालक श्रीधर डुबे-पाटील व सरव्यवस्थापक देविदास भोकरे यांनी केले आहे.
More Stories
बियाणे न उगवल्याने शेतकरी संकटात,आमदारानी दिला शेतकऱ्यांना आधार
दर्जेदार शिक्षण,उत्कृष्ट जेवण आणि उत्तम राहण्याची व्यवस्था – अरुण घोगरे
मागासवर्गीय सेवानिवृत्त कर्मचारी संघाच्या वतीने पृथ्वीराज चिलवंत यांचा वाढदिवस साजरा