June 25, 2025

धाराशिव जिल्हा पोलीसनामा

  • धाराशिव शहर वाहतुक शाखा व संबंधीत पोलीस ठाण्यांनी महत्त्वाच्या रस्त्यांवर दि.03 ऑक्टोंबर रोजी मोटार वाहन कायदा- नियम भंग प्रकरणी एकुण 95 कारवाया करुन 86,450 ₹ ‘तडजोड शुल्क’वसुल केले आहे.
  • “ अवैध मद्य विरोधी कारवाई.”
  • तामलवाडी पोलीस ठाणे: आरोपी नामे-यशोदा कालीदास काळे, वय 56 वर्षे, रा.सावरगाव ता. तुळजापूर जि. धाराशिव या दि.03.10.2024 रोजी 21.00 वा. सु. गावातील आपल्या रहात्या घराचे बाजूस अंदाजे 500₹ किंमतीची 5 लि. गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली. यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम- 65(ई),अन्वये तामलवाडी पो ठाणे येथे गुन्हा नोंदविला आहे.
  • “रहदारीस धोकादायरीत्या वाहन उभे करणाऱ्यांवर गुन्हे नोंद.”
    उमरगा पोलीस ठाणे :आरोपी नामे-फारुख खलील फुलारी, वय 27 वर्षे, रा. तुरोरी ता. उमरगा जि. धाराशिव यांनी दि.03.10.2024 रोजी 14.30 वा. सु. आपल्या ताब्यातील ॲपे रिक्षा क्र एमएच 23 एच 8040 हा एनएच 65 रोडवर बसस्थानकचे समोर उमरगा येथे सार्वजनिक रस्त्यावर रहदारीस धोकादायकरीत्या उभे केलेले असताना उमरगा पोलीसांना मिळून आले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तीविरुध्द भारतीय न्याय सहिंता कलम 285अन्वये उमरगा पो.ठा. येथे गुन्हा नोंदवला आहे.
  • नळदुर्ग पोलीस ठाणे :आरोपी नामे-खंडु आप्पाशा घोडके, वय 33 वर्षे, रा. इंदीरानगर नळदुर्ग ता.तुळजापूर जि. धाराशिव यांनी दि.03.10.2024 रोजी 12.15 वा. सु. आपल्या ताब्यातील ॲपे रिक्षा क्र एमएच 25 एम 1738 हा नळदुर्ग बसस्थानकाचे उजव्या बाजूला सार्वजनिक रस्त्यावर रहदारीस धोकादायकरीत्या उभे केलेले असताना नळदुर्ग पोलीसांना मिळून आले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तीविरुध्द भारतीय न्याय सहिंता कलम 285अन्वये नळदुर्ग पो.ठा. येथे गुन्हा नोंदवला आहे.
  • मालमत्तेविरुध्द गुन्हे.”
  • कळंब पोलीस ठाणे :फिर्यादी नामे- सुनिल प्रभाकर राठोड, वय 34 वर्षे, रा. जहागीर मोहा ता. धारुर जि. बीड यांची अंदाजे 20,000₹ किंमतीची स्प्लेंडर प्लस हिरो कंपनीची मोटरसायकल क्र एमएच 44 व्ही 4119 ही दि. 23.09.2024 रोजी 16.00 ते 19.00 वा. सु.अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. आशा मजकुराच्या फिर्यादी नामे-सुनिल राठोड यांनी दि.03.10.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन कळंब पो. ठाणे येथे कलम भा.न्या.सं.303(2) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
  • वाशी पोलीस ठाणे :फिर्यादी नामे-अंकुश गोपीनाथ महानवर, वय 61 रा.कन्हेरी ता. वाशी जि. धाराशिव यांचे कन्हेरी शिवारातील शेतातील अंदाजे 22,500₹ किंमतीचे सोयाबीन पिक 5 क्विंटल हे दि. 02.10.2024 रोजी 11.00 ते दि. 03.10.2024 रोजी 12.00 वा. सु. आरोपी नामे- अंजना महादेव कांबळे, रा. बावी ता. भुम जि. धाराशिव, अनिता महादेव हाके, रा. माळेवाडी ता. केज जि. बीड, कामीना लाला गोयकर, रा. आरसोली ता. भुम दैवशाला अगंद ठवरे, रा. देवगाव ता. परंडा जि. धाराशिव, ठकुबाई ब्रम्हदेव हाके, रा. रामकुंड ता. भुम जि. धाराशिव यांनी काढून चोरुन नेले.आशा मजकुराच्या फिर्यादी नामे-अकुंश महानवर यांनी दि.03.10.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन वाशी पो. ठाणे येथे कलम भा.न्या.सं.303(2), 3(5) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
  • “ मारहाण.”
  • धाराशिव शहर पोलीस ठाणे :आरोपी नामे-जयसुर्या कपील थोरात, रा. शाहुनगर धाराशिव ता. जि. धाराशिव यांनी दि.03.10.2024 रोजी 11.00 वा. सु. प्रकाश किरणा दुकानासमोर धाराशिव येथे फिर्यादी नामे-बालाजी महादेव कठारे, वय 38 वर्षे, रा. सारोळा ता. जि. धाराशिव यांना नमुद आरोपीने दारु पिण्यासाठी पैसे मागीतले असता न दिल्याचे कारणावरुन शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, ब्लेडने मारहाण करुन जखमी केले. व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-बालाजी कठारे यांनी दि.03.10.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन धाराशिव शहर पो ठाणे येथे भा.न्या.सं.कलम 118(1), 115(1), 352, 351(2) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
  • “रस्ता अपघात.”
  • धाराशिव शहर पोलीस ठाणे: मयत आरोपी नामे-अक्षय तुकाराम कदम, वय 25 वर्षे, रा.विजय चौक धाराशिव ता. जि. धाराशिव, फिर्यादी नामे- नितेश चंद्रकांत वैकुंटे, वय 30 वर्षे, रा. विजय चौक, जुनी गल्ली धाराशिव ता. जि. धाराशिव हे दोघे दि.17.09.2024 रोजी 20.40 वा. सु. मोटरसायकल वरुन जात होते. दरम्यान रझवी मुबशीर बिलाल यांचे रझवी डोर ॲण्ड फर्निचर दुकानासमोर धाराशिव ते बेंबळी जाणारे रोडवर धाराशिव येथे मयत आरोपी अक्षय कदम यांनी त्यांचे ताब्यातील मोटरसायकल ही हायगयी व निष्काळजीपणे चालवून मोटरसायकलवरुन पडून गंभीर जखमी होवून मयत झाले. तसेच नितेश वैकुंटे हे किरकोळ व गंभीर जखमी झाले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- नितेश वैकुंटे यांनी दि.03.10.2024 दिलेल्या प्रथम खबरेवरुन धाराशिव शहर पो ठाणे येथे भा.न्या.सं. कलम 281, 125(अ), 125(ब), 106(1) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
  • नवरात्रोत्सवादरम्यान स्थानिक गुन्हे शाखेची कामगीरी.”
  • स्थानिक गुन्हे शाखा : तुळजापूर येथील श्री. तुळजाभवानी मातेचा नवरात्र उत्सव नुकताच सुरु झाला. यावेळी मा. पोलीस अधीक्षक श्री. संजय जाधव यांच्या आदेशावरुन स्थानिक गुन्हे शाखेचे पथक नवरात्र उत्सवा दरम्यान चोरी, जबरी चोरी इत्यादी गुन्ह्यांस आळा घालण्यासाठी व अवैध धंद्यांवर कारवाई करण्यासाठी तुळजापूर मंदीर परिसर व शहरात गस्तीस होते. दरम्यान पथकाने दि.03. 10.2024 रोजी तुळजापूर पो.ठा. येथे गुन्हा क्र.455/2024 भा.न्या.सं. कलम- 309(4) या जबरी चोरीचा गुन्हा दाखल आहे.त्यावर पथकास मिळालेल्या माहिती वरुन मलबा हॉस्पीटल जवळ एक इसम दिसुन आला व त्याचेसोबत एक महिला यांना पथकाने ताब्यात घेवून त्यांना त्यांचे नाव गाव विचारले असता त्यांनी त्यांचे नावे- संदीप लहु पवार, वय 21 वर्षे व मंगल लहु पवार, वय 42 वर्षे दोघे रा. खर्डा ता. जामखेड जि. अहमदनगर असे सागिंतले. त्यावर पथकाने त्यांचे कडे सदर गुन्ह्या संदर्भात विचारपुस केली असता सदर इसमांनी गुन्हा केल्याची कबुली दिली. यावरुन पथकाने त्यांचे ताब्यातुन गुन्ह्यातील रोख रक्कम हस्तगत करुन नमुद इसमांना पुढील कारवाई कामी तुळजापूर पोलीसांचे ताब्यात दिले. तसेच भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम- 128 अंतर्गत 11 व्यक्तींविरुध्द कारवाई करण्यात आल्या आहे.
  • सदरची कामगीरी मा. पोलीस अधीक्षक श्री. संजय जाधव व मा. अपर पोलीस अधीक्षक श्री.गौहर हसन यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि- श्री. वासुदेव मोरे, सपोनि- श्री. सचिन खटके,अमोल मोरे, पोलीस हावलदार- 327/विनोद जानराव, 547/आश्विनकुमार जाधव, 1003/समाधान वाघमारे, 1275/ पठाण, पोलीस नाईक/1479 नितीन जाधवर, मपोह/ 1318 शैला टेळे, मपोकॉ/ 1658 होळकर, चालकपोकॉ/584 बोईनवाड, 693/ दहीहंडे यांच्या पथकाने केली आहे. (सोबत छायाचित्र जोडले आहे.)
  • जनसंपर्क विभाग धाराशिव पोलीस
error: Content is protected !!