धाराशिव (जिमाका) – तुळजापूर येथे शारदीय नवरात्र महोत्सवात दि.४ ऑक्टोबर रोजी श्री तुळजाभवानी देवीजींची नित्योपचार पूजा करण्यात आली.शारदीय नवरात्राची आज दुसरी माळ. तत्पूर्वी पहाटे ६ ते सकाळी १० या वेळेत देवीजींची अभिषेक पूजा करण्यात आली. त्यानंतर आरती झाली.यापद्धतीने श्री तुळजाभवानी देवीजींचे दररोज विविध धार्मिक विधी विधीवत पार पाडले जातात. श्री.तुळजाभवानी देवीजींच्या विविध अलंकार पूजेस ०७ ऑक्टोबरपासून सुरुवात होत आहे. ७ ऑक्टोबर रोजी ललित पंचमीनिमित्त रथ अलंकार महापूजा,८ ऑक्टोबर रोजी मुरली अलंकार महापूजा,९ ऑक्टोबर रोजी शेषशाही अलंकार महापूजा,१० ऑक्टोबर रोजी भवानी तलवार अलंकार महापूजा आणि ११ ऑक्टोबर रोजी महिषासूर मर्दिनी अलंकार महापूजा होणार आहे. तत्पूर्वी, गुरुवार रात्री १० वाजता श्री देवीजींची छबिना मिरवणूक हंस वाहनातून काढण्यात आली.
More Stories
जिल्ह्यातील एकही कुटुंब महिला बचत गटापासून वंचित राहू नये – जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार
धाराशिव जिल्हा परिषदेत ‘सरप्राईज’ निकाल;कळंब तालुक्याची लॉटरी – दोन सभापती पदांवर झेंडा!
ई-पीक पाहणीची अंतिम मुदत ३१ मार्चपर्यंत;शेतकऱ्यांनी तात्काळ नोंदणी करून घ्यावी