August 9, 2025

तालुक्यातील अनेक गावांनी घेतली बालविवाह मुक्त भारत शपथविधी

  • कळंब – दि.१६ ऑक्टोबर २०२३ रोजी कळंब तालुक्यातील २५ गावा‌मध्ये कैलास सत्यार्थी चिल्ड्रन्स फाउंडेशन व शिवप्रताप सामाजिक बहुउद्देशीय सेवाभावी संस्था बुकनवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने शाळा अंगणवाडी ग्रामपंचायत बचतगट इत्यादी ठिकाणी बालविवाह मुक्त भारत शपथविधी घेण्यात आली. यासाठी आथक परिश्रम संगीता राऊत ‌व ज्ञनेश्वरी मगर गावातील गाव लिडर रफिक शेख, मुक्ता खोत, वैशाली पवार,सारिका कमळे,सुवर्णा सगर व शाळेतील शिक्षक अंगणवाडी सेविका याचा सामावेश होता.या कार्यक्रमात २५ गावातुन ५४७ नागरीकानी शपथविधी घेतली.
error: Content is protected !!