कळंब – शहरातील यशवंत नगर येथील रहिवासी सा.साक्षी पावनज्योतचे वार्षिक वर्गणीदार आयु.सुरेंद्र शीलवंत यांचे ज्येष्ठ चिरंजीव डॉ.संदीप सुरेंद्र शीलवंत यांनी पहिल्याच प्रयत्नांत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने दि.२६ डिसेंबर २०२२ रोजी घेतलेल्या परीक्षेत पशुधन विकास अधिकारी वर्ग-१ यश प्राप्त केले आहे.
या निमित्ताने बहुजनांच्या न्याय हक्कांसाठी प्रकाशित होणारे सा.साक्षी पावनज्योत परिवाराच्या वतीने यशवंत नगरातील लुम्बिनी बुद्ध विहार येथे त्यांचा कार्यकारी संपादक प्रा.अविनाश घोडके यांच्या हस्ते अंक देवून सन्मान करण्यात आला.
याप्रसंगी शहरात सामाजिक व धम्माचे कार्य करणारे ज्येष्ठ आयु.बी.एन.शीलवंत बप्पा,प्रसिद्ध विद्रोही कविवर्य रमेश बोर्डेकर,आयु.सुरेंद्र शीलवंत, प्राचार्य निळकंठ वाघमारे,मुख्याध्यापक मधुकर सावंत,सेवानिवृत्त मुख्याध्यापक विनोद रणदिवे,आयु.सुषमा शीलवंत आदींची उपस्थिती होती.
More Stories
प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या प्रीती महादवारसह यशस्वी छात्राध्यापकांचा गौरव सोहळा उत्साहात
संचालिका सौ.अंजली मोहेकर यांची विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिरास सदिच्छा भेट
मोहेकर महाविद्यालयात ग्रंथालय शास्त्राच्या राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन