कळंब – काही दिव्यांग हे जन्मजात असतात त्यामुळे त्यांना परिस्थितीशी लढण्याची इच्छाशक्ती जन्मापासूनच तयार होते परंतु काही दिव्यांग हे अपघाताने होतात त्यावेळी मात्र यांना शारीरिक,मानसिक आणि सामाजिक परिस्थितीशी जुळवून घेताना पराकोटीची कसरत करावी लागते. असेच अपघातात दोन्ही पाय जावून सुध्दा डिकसळ येथील शेख सादेक यांनी “निवडून कसे यावे” हे ग्रामपंचायत ते विधानसभा मतदारसंघा पर्यत चे नियम या पुस्तकातून लिहिले आहेत हे कार्य त्यांचे धडधाकट असणार्या साठी निश्चितच प्रेरणादायी असल्याचे मत अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे मराठवाडा अध्यक्ष परमेश्वर पालकर यांनी या पुस्तकाचे प्रकाशन सोहळ्यात व्यक्त केले. ते कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून उपस्थित होते तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रहार संघटनेचे तालुकाध्यक्ष गणेश शिंदे, माझा महाराष्ट्र पब्लिकेशन्स चे प्रविण तांबडे, बाळासाहेब कांबळे, अस्लम तांबोळी आदी उपस्थित होते. पुढे बोलताना पालकर म्हणाले की राज्यशास्त्राचे शिक्षण घेतलेले व राज्य शासनाच्या सेवेत असताना रेल्वे अपघातात दोन्ही पाय जावून आपल्या संसाराचा गाडा हाकून पुस्तक लिहीण्याची इच्छा पुर्ण करणारे शेख सादेक यांची जिद्द वाखाणण्याजोगी आहे. यावेळी बाळासाहेब कांबळे, प्रविण तांबडे यांनीही शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक लेखक शेख सादेक यांनी केले तर सुत्रसंचालन व आभार बापूराव भंडारे यांनी मानले.
More Stories
“मोठ्या महादेवाचा मार्ग धोक्यात!” — पुरात वाहून गेला रस्ता-पूल; चैत्र एकादशीपूर्वी दुरुस्तीची शिवभक्तांची आर्त मागणी
“रस्ते की मृत्यूचे सापळे?” — अतिक्रमणखोर मोकाट,प्रशासन झोपेत;कळंबमध्ये महिलेचा चिरडून मृत्यू
तात्यासाहेब सोनवणे यांना ‘नेताजी सुभाषचंद्र बोस राष्ट्रीय जीवनगौरव पुरस्कार’”