कळंब – मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळावे या मागणीसाठी अंतरवाली सराटी १७ सप्टेंबर पासून उपोषण करीत असलेले मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ व पाठिंबा देण्यासाठी सकल मराठा समाजाच्या वतीने दि.२१ सप्टेंबर २०२४ रोजी धाराशिव जिल्हा बंदची हाक देण्यात आली होती.याला कळंब शहरात १००% प्रतिसाद मिळाला असून शहरात आज कडकडीत बंद पाळण्यात आला . दिनांक २० सप्टेंबर रोजी कळंब येथील सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी कळंब तहसील समोर आरक्षणाच्या मागणीसाठी व मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी अर्ध नग्न आंदोलन केले.या संदर्भात सकल मराठा समाजाच्या वतीने प्रशासनाला निवेदन देण्यात आले. मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्यावे,या मागणीसाठी अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील सहाव्यांदा उपोषणाला बसले आहेत. शनिवारी २१ सप्टेंबर त्यांच्या उपोषणाचा पाचवा दिवस आहे.सततच्या उपोषणामुळे त्यांची प्रकृती बिघडत चालली आहे तसेच त्यांच्या मागणीची दखल घेतली जात नसल्याने मराठा समाजात सरकारविरोधात असंतोष निर्माण झाला आहे.सरकारने मनोज जरांगे पाटील यांची मागणी तातडीने मान्य करावी तसेच त्यांचे उपोषण सुटण्यासाठी सरकारकडून तातडीने सकारात्मक प्रयत्न व्हावेत,या मागणीसाठी सकल मराठा समाजाच्या वतीने सर्वत्र बंदची हाक देण्यात आली आहे. बीड जिल्हा तसेच धाराशिव जिल्हा बंद करण्याचे आवाहन सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आले आहे. सकारात्मक मार्ग निघून मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सुटावे यासाठी मराठा समाजाच्या वतीने सरकारला आवाहन करण्यात येत आहे. आजच्या बंदसाठी सर्व व्यापारी, आस्थापना,शाळा, महाविद्यालयांनी सहकार्य करावे असे आवाहन सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आले होते. याला शंभर टक्के प्रतिसाद मिळाला व कळंब तालुक्यातील ग्रामीण भागातही बंद पाळण्यात आला.
More Stories
ग्रामीण शिक्षणाचा प्रेरणास्त्रोत शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींना अभिवादन
“धाडस,विचार आणि सेवा यांचा संगम – पँथर अशोक कसबे” (वाढदिवस विशेष लेख)
अधिकारी व्हायचे असेल तर जि.प शाळेतच प्रवेश घ्या – उपशिक्षणाधिकारी दत्तात्रय लांडगे