February 9, 2026

पत्रकारांना आमचा पत्रकार योजना लागू करा – सुभाष द.घोडके

  • कळंब – महाराष्ट्र राज्यातील पत्रकार,संपादक,उपसंपादक यांना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने प्रमाणे आमचा पत्रकार योजना देऊन विमा संरक्षण देण्यात यावे अशी मागणी ऑल इंडिया संपादक संघाचे धाराशिव जिल्हाध्यक्ष सुभाष द.घोडके यांनी राज्यपालाकडे निवेदनाद्वारे केली आहे.
    धाराशिव जिल्हाधिकारी यांच्या मार्फत दिनांक २० सप्टेंबर २०२४ रोजी राज्यपालांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,महाराष्ट्र राज्यातील दैनिक, साप्ताहिक,पाक्षीक,मासिक आदी सर्व प्रकारच्या प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी,वार्ताहार, छायाचित्रकार,वृत्तपत्र विक्रेते, उपसंपादक आणि संपादक यांना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेप्रमाणे प्रतिमाह दहा हजार रुपये मानधन विनाअट देऊन त्यांना विमा संरक्षण द्यावे.
    पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असला तरी त्यांना ठराविक वेतन मिळत नाही.तरीही विविध प्रकारची आंदोलने,निदर्शने,पत्रकार परिषदेतील वार्तांकन करण्यासाठी भटकंती करावी लागते.
    समाजातील,शासन, प्रशासनातील बरे वाईट प्रसंग चव्हाट्यावर आणत असतानी त्यांच्या आर्थिक कोंडी बरोबरच जीविताचे बरे वाईट झाल्यास कुटुंब उघड्यावर पडते म्हणून त्यांना प्रतिमाह दहा हजार रुपये मानधन व विमा संरक्षण आमचा पत्रकार म्हणून देण्यात यावे.
error: Content is protected !!