कळंब – सामाजिक न्यायाची खरी शिकवण ही भारताच्या संविधानातुन प्राप्त होत असल्यामुळे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग अंतर्गत व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाच्या अधिपत्याखालील सर्व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था व शासकीय तांत्रिक विद्यालयामध्ये प्रशिक्षण घेत असलेल्या प्रशिक्षनार्थीना सामाजिक न्यायाची खरी शिकवण मिळावी यासाठी ना.मंगल प्रभात लोढा, मंत्री, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग यांच्या संकल्पनेतून राज्यातील ४३४ शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था व शासकीय तांत्रिक विद्यालयामध्ये संविधान मंदिराची स्थापना करण्यात आलेली आहे. संविधान मंदिराचे उद्घाटन उपराष्ट्रपती जयदीप धनखड यांच्या शुभ हस्ते दिनांक १५ सप्टेंम्बर २०२४ रोजी सकाळी ११ वाजता ऑनलाइन पद्धतीने होणार आहे. या अनुषंगाने शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था कळंब जिल्हा धाराशिव येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक १२, १३, १४ सप्टेंबर रोजी अनुक्रमे निबंध, रांगोळी, चित्रकला, भाषण, संविधान प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे. जेणेकरून नागरिकांमध्ये विशेषतः उपेक्षित समुदायांमध्ये घटनात्मक अधिकार आणि कर्तव्याबद्दल जागरूकता वाढवणे, घटनात्मक समस्या, दुरुस्त्या, समकालीन समाजातील घटनेची भूमिका यासारख्या विषयांतील जागरूकता, विद्यार्थ्यांना त्यांचे घटनात्मक अधिकार समजून घेण्यास किंवा त्यांचा वापर करण्यासाठी इच्छुक विद्यार्थ्यांना कायदेशीर सहाय्य आणि समर्थन प्रदान करणे, राज्यघटनेचे सखोल आकलन व्हावे यासाठी निबंध स्पर्धा व संबंधित कार्यक्रम आयोजित केले आहेत यासह संविधानाच्या विविध पैलूंवर पुस्तके, लेख इत्यादी गोष्टी उपलब्ध करुन विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पाडण्याचा सदरील कार्यक्रमाचा उद्देश आहे. सदरील कार्यक्रम आणि संविधान मंदिराच्या उद्घाटनासाठी परिसरातील सर्व ज्येष्ठ मंडळी, प्रतिष्ठित नागरिक, पालक, सर्व शाळेतील विद्यार्थी, प्रशिक्षणार्थी यांना उपस्थित राहण्याचे आवाहन संस्थेचे प्राचार्य केशव पवार यांनी केले आहे.
More Stories
धाराशिव शहरातील कचरा डेपो इतरत्र हलविण्याची शिवसेना (उ.बा.ठा) पक्षाची मागणी
पहिला आयुर्वेदिक हिमोफिलिया संशोधन प्रकल्प ‘रक्तामृत’चा धाराशिवमध्ये दिमाखदार शुभारंभ
फॉरेस्टच्या गवतावर तणनाशक फवारणी करून वृक्षलागवडीची नासधूस:वनपालावर कारवाईची मागणी