कळंब – जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चव्हाणवाडीचे आदर्श शिक्षक सुखदेव भालेकर यांची चव्हाणवाडी शाळेत विविध उपक्रम राबविण्यासाठी महत्वाची भूमिका असते.शाळेचा गुणवंत्तेचा आलेख विविध उपक्रमात हिमालयासारखा उंचावत नेला आहे. तसेच विविध उपक्रमात शाळेतील विधार्थी जिल्हा,विभाग,राज्य व राष्ट्रीय स्तरावर विविध स्पर्धेत सहभागी होऊन यश संपादन केले आहे. याकामी हे यश खेचून आणण्यासाठी अग्रगण्य त्यांची भूमिका महत्वाची आहे.शाळेत भारत स्काऊट गाईड,मंगरूळ टॅलेंट सर्च,आय कॅन स्पीक इंग्लिश,करूया मैत्री गणिताशी, महाराष्ट्र शासनाच्या चित्रकला स्पर्धा, मी ज्ञानी होणार, मंथन राज्यस्तरीय सामान्य ज्ञान स्पर्धा, विज्ञान प्रदर्शन, केंद्र तालुका जिल्हा क्रीडा स्पर्धा, राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा,युनोसको क्लब, महावाचन चळवळ,संशोधन, हस्तपुस्तिका निर्मिती,ज्ञानरचनावादी वर्ग, ई लर्निंगच्या माद्यमातून शिक्षण, संगणक लॅब,शालेय सहल, वृक्षारोपण,लोकसहभाग असे इतर अनेक उपक्रम मंगरूळ बीटचे विस्तार अधिकारी माने एम ई यांच्या मार्गदर्शनाखाली व शाळेतील सर्व सहकारी शिक्षक यांच्या मदतीने राबविले आहेत. त्यामुळे शाळेतील मुले राज्य व राष्ट्रीय पातळीवर यश संपादन करीत आहेत. त्यांच्या या कार्याची दखल महाराष्ट्र शासनाने घेवून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चव्हाणवाडीचे शिक्षक सुखदेव भालेकर यांना महाराष्ट्र शासनाच्या वतीने दिला जाणारा क्रांतिज्योती सावित्रीमाई राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे,विधानसभा अध्यक्ष ना.राहुल नार्वेकर ,शिक्षणमंत्री ना.दिपक केसरकर,शालेय शिक्षण प्रधान सचिव आय.एन.कुंदन ,शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांच्या हस्ते टाटा नाट्यगृह मुंबई येथे देऊन सन्मानित केले. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चव्हाणवाडीचे,धाराशिव जिल्ह्याचे नाव उल्लेखनीय कार्यामुळे महाराष्ट्रभर नावलौवकिक केलेबद्दल सुखदेव भालेकर यांचे चव्हाणवाडी गावच्या ग्रामपंचायतिचे सरपंच, उपसरपंच,सदस्य,समस्थ ग्रामस्थ,शाळा व्य.समिती अध्यक्ष व सदस्य यांनी मायेची शाल, श्रीफळ, पुष्पहार,हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची शिवराज्याभिषेक सोहळा प्रतिमा, पेढा भरहून नागरी सत्कार करून पुढील शैक्षणिक कार्यास शुभेच्छा दिल्या. तसेच यावेळी शिक्षक दिनानिमित्त शाळेतील अशोक जेटीथोर, सुषमा देशमुख, बलभीम भोयटे, गीताश्री पाटील, द्रौपदी लांडगे ,सुदर्शना चव्हाण,गायत्री चव्हाण सर्वच आदर्श व उपक्रमशील शिक्षकांचा सन्मान करून त्यांनाही शुभेच्छा दिल्या… यावर्षीचा महाराष्ट्र शासनाचा राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार भालेकर सुखदेव यांना मिळालेबद्दल सर्व ग्रामस्थ यांनी सत्कार केला व सर्वाना नव्या उमेदीने कार्य करण्यास शुभेच्छा दिल्या. तसेच विधार्थी, शिक्षक, मान्यवर यांनी पुढील शैक्षणिक कार्यासाठी मनोगतातून शुभेच्छा दिल्या. नागरी सत्कार या कार्यक्रमासाठी चव्हाणवाडी चे सरपंच पांडुरंग पाटील, उपसरपंच प्रकाश चव्हाण,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष राम सुरडे, सदस्य रामकृष्ण चव्हाण, आदर्श शिक्षक पांडुरंग चव्हाण, निवृत्ती शिंदे,खंडू शिंदे,नाना शिंदे,शाळेतील मुख्याध्यापक अशोक जेटीथोर,शिक्षक सुषमा देशमुख,बलभीम भोयटे, सुखदेव भालेकर,द्रौपदी लांडगे, भीमाबाई शिंदे,सुदर्शना चव्हाण, गायत्री चव्हाण आदी उपस्थित होते.
More Stories
रक्षाबंधन
प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या प्रीती महादवारसह यशस्वी छात्राध्यापकांचा गौरव सोहळा उत्साहात
संचालिका प्रा.सौ.अंजलीताई मोहेकर यांची विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिरास सदिच्छा भेट