धाराशिव शहर वाहतुक शाखा व संबंधीत पोलीस ठाण्यांनी महत्त्वाच्या रस्त्यांवर दि.05 सप्टेंबर रोजी मोटार वाहन कायदा- नियम भंग प्रकरणी एकुण 220 कारवाया करुन 1,62,950 ₹ ‘तडजोड शुल्क’वसुल केले आहे.
“ अवैध मद्य विरोधी कारवाई.”
उमरगा पोलीस ठाणे: आरोपी नामे-अशोक हनमय्या तेलंग, वय 35 वर्षे, रा. चिंचनसुर, ता. आंळद जि. गुलबर्गा ह.मु. कसगी ता. उमरगा जि. धाराशिव हे दि.05.09.2024 रोजी 13.25 वा. सु. अमरसिंग राजपुर यांचे शेतातील पत्र्याचे शेडसमोर अंदाजे 3,400 ₹ किंमतीची 40 लि. सिंधी ताडी अम्ली द्रव अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेले जप्त करण्यात आले. यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद व्यक्तींविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम- 65(ई),अन्वये उमरगा पो ठाणे येथे गुन्हा नोंदविला आहे.
मालमत्तेविरुध्द गुन्हे.”
ढोकी पोलीस ठाणे: फिर्यादी नामे-संगीता भारत लाड, वय 44 वर्षे, रा.मुरुड ता. जि. लातुर यांची अंदाजे 20,000₹ किंमतीची सिडी डिलक्स मोटरसायकल क्र एमएच 24 झेड 7133 ही दि. 29.08.2024 रोजी 11.30 ते दि. 30.08.2024 रोजी 08.00 वा. सु. कोंड येथील कृषी कार्यालयासमोरुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-संगीता लाड यांनी दि.05.09.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन ढोकी पो ठाणे येथे भा.न्या.सं. 3 03(2) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
उमरगा पोलीस ठाणे: फिर्यादी नामे-महेश दिलीप झांबरे, वय 46 वर्षे, रा.औटी प्लॉट उमरगा ता. उमरगा जि. धाराशिव यांची अंदाजे 40,000₹ किंमतीचे कॉक्रीट मशीनचे मोटर, ल्युब्रीकेटींग, युनिट कंट्रोल पॅनल हे दि.05.09.2024 रोजी 13.00 वा. सु. औटी प्लॉट उमरगा येथुन आरोपी नामे- बलभिम दुर्गाप्पा देवकर, राम ब्याळी बिगे दोघे रा. शासकीय झोपडपट्टी उमरगा व इतर एक यांनी चोरुन नेले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-महेश झांबरे यांनी दि.05.09.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन उमरगा पो ठाणे येथे भा.न्या.सं. 303(2) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
“ फसवणुक.”
वाशी पोलीस ठाणे : फिर्यादी नामे-सतिश मधुकर चव्हाण, वय 52 वर्षे, रा पखरुड ता.भुम जि. धाराशिव ह.मु. चौसाळा ता. जि. बीड यांचे आई वडील व इतर लोकांना आष्युमान भारत व आत्मा कार्ड काढण्यासाठी के वाय सी करावे लागते असे म्हणून अनोळखी इसमानी सोबत आणलेल्या मशीनद्वारे लोकांचे आंगठे घेवून त्यांचे खात्यामधून 40,000₹ ट्रान्सफर करुन घेवून फसवणुक केली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- सतिश चव्हाण यांनी दि.05.09.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन वाशी पो ठाणे येथे भा.न्या.सं. कलम 318, 323 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
कोणत्याही हेतु शिवाय मृत्युस कारणीभुत होणाऱ्यांवर गुन्हा दाखल.”
तामलवाडी पोलीस ठाणे : आरोपी नामे-विशाल लक्ष्मण कटारे, अलका लखन भोसले, कविता विशाल कटारे, सर्व रा. सुरतगाव ता. तुळजापूर जि. धाराशिव यांनी मयत नामे- सांगर उत्रेश्वर भोसले रा. सुरतगाव ता. तुळजापूर जि. धाराशिव यांना नमुद आरोपींनी शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी पोटात मारल्यामुळे मृत्यु घडवून आणण्याच्या कोणत्याही हेतु शिवाय शारीरीक इजा पोहचून सागर भोसले हे मयत झाले आहे. अशा मजकुराच्या मयताचे वडील फिर्यादी नामे-उत्रेश्वर विश्वनाथ भोसले, वय 75 वर्षे, रा. सुरतगाव ता. तुळजापूर जि. धाराशिव यांनी दि.05.09.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन तामलवाडी पो ठाणे येथे भा.न्या.सं. कलम 105, 352, 3(5) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
“ मारहाण.”
शिराढोण पोलीस ठाणे : आरोपी नामे- श्रीकांत बालाजी पवार, प्रदीप नवनाथ पवार, निरंजन काशीनाथ पवार, सर्व रा. जवळा खुर्द ता. कळंब जि. धाराशिव यांनी दि. 05.09.2024 रोजी 10.15 वा. सु. समाधान अण्णा यांचे घराजवळ जवळा खु., येथे फिर्यादी नामे- रमेश राजाभाउ कांबळे, वय 23 वर्षे, रा. जवळा खुर्द ता. कळंब जि. धाराशिव यांना व त्यांचे वडील बहीण भाउ यांना नमुद आरोपीने मागील भांडणाचे कारणावरुन जातीवाचक शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी,दगडाने मारहाण करुन जखमी केले. व ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-रमेश कांबळे यांनी दि.05.09.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन शिराढोण पो ठाणे येथे भा.न्या.सं. कलम 118(1), 115(2), 351(1), 352,3(5) सह 3(1)(आर)(एस) अ.जा.ज.अ.प्र.कायदा अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
उमरगा पोलीस ठाणे : आरोपी नामे- केशव चंद्रकांत बोयणे, महादेव चंद्रकांत बोयणे, चंद्रकांत अंबाजी बोयणे रा. हंद्राळ वाणी ता. उमरगा जि. धाराशिव यांनी दि. 03.09.2024 रोजी 18.30 वा. सु. हंद्राळ वाणी येथे फिर्यादी नामे-सावित्रा सागर बोयणे, वय 22 वर्षे, रा. हंद्राळ वाणी ता. उमरगा जि. धाराशिव यांचे पतीस नमुद आरोपींनी शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, मारहाण करुन हात धरुन जोराने पिरगाळल्याने मनगटाजवळ फॅक्चर होवून गंभीर जखमी झाले. व ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-सावित्रा बोयणे यांनी दि.05.09.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन शिराढोण पो ठाणे येथे भा.न्या.सं. कलम 117(2), 115(2), 351(1), 351(3), 352, 3(5) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
“रस्ता अपघात.”
भुम पोलीस ठाणे: आरोपी नामे-कुदंन चंद्रकांत अलभार, रा. देवदैठण ता. श्रिगोंदा जि अहमदनगर व सोबत मयत नामे-काका साहेबराव हरणे, वय 45 वर्षे, रा. कापुसतळणी, ता. अजनगाव सुरजी जि अमरावती, हे दोघे दि.18.07.2024 रोजी 20.15 वा. सु.आंबी चौक पाथरुड शिवार येथुन कार क्र एमएच 14 एफएस 4999 ही मधून जात होते. दरम्यान नमुद आरोपीने त्याचे ताब्यातील कार ही हायगयी व निष्काळजीपणे चालवून सोमर चालत असलेल्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीस पाइीमागून धडक दिली. या अपघातात काका हरणे हे गंभीर जखमी होवून मयत झाले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- चेतन विजयराव बायस्कर, वय 35 वर्षे,रा.नरसिंगपूर पोस्ट नांदेड बुद्रुक ता. दर्यापुर जि. अमरावती यांनी दि.05.09.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भुम पो ठाणे येथे भा.न्या.सं. कलम 281, 106(1) सह मोवाका कलम 184 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
बेंबळी पोलीस ठाणे : बेंबळी पोलीस ठाण्याचे पथक दि.05.09.2024 रोजी बेंबळी पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलिंग करत असताना पथकास धाराशिव तालुक्यातील धुत्ता पाटी येथील रस्त्यावरुन अवैध कत्तलीतील गोवंशीय मांसाची वाहतुक होणार असल्याची गोपनीय खबर मिळाली होती. यावर बेंबळी पो.ठा. च्या पथकाने आज दि. 05.09.2024 रोजी पेट्रोलिंग दरम्यान सकाळी 08.00 वा. सु. धुत्ता पाटी येथुन जाणारा आयशर टेम्पो क्र. एम.एच. 11 एएल 3159 हा पोलीसांनी संशयावरून थांबवून त्याच्या हौद्यात डोकावून पाहिले असता आत गोवंशीय मांस व बर्फाचे तुकडे दिसून आले. यावर पोलीसांनी नमूद टेम्पोचा चालक- रफीक पैगंबर पठाण, वय 28 वर्षे रा.कुंभारी, ता. द.सोलापूर जि. सोलापूर यास त्या मांस वाहतुक परवाण्याबाबत विचारले असता परवाना नसल्याचे त्यांनी सांगीतले. यावर पथकाने अंदाजे 10,00,000 ₹ किंमतीच्या नमूद टेम्पोसह त्यातील अंदाजे 4,80,000 ₹ किंमतीचे सुमारे 4 मेट्रीक टन गोवंशीय मांस जप्त करुन प्रयोगशाळा परिक्षणाकरीता पशुधन विकास अधिकारी, बेंबळी डॉ. श्री. कालीदास सुतार यांच्यामार्फत मांसाचे नमूने काढले आहेत. तसेच जप्त मांस हा नाशवंत पदार्थ असल्याने तात्काळ नष्ट करण्यासाठी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी, धाराशिव यांच्याकडे विनंती पत्र पाठवले असून त्यांची संमती मिळताच तो मांस साठा नष्ट केला जाणार आहे. या प्रकरणी बेंबळी पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार- गोपाळ सोमवंशी यांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन महाराष्ट्र प्राणि संरक्षण कायदा कलम- 5 (क),9(अ) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
सदरची कामगीरी मा. पोलीस अधीक्षक श्री. संजय जाधव व मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. गौहर हसन यांच्या मार्गदर्शनाखाली बेंबळी पो.ठा. चे प्रभारी- श्री. पाटील, पोह- कोळेकर, पोना- जगताप, पोअं- गोपळ सोमवंशी, पवार यांच्या पथकाने केली आहे.
वाशी पोलीस ठाणे : वाशी पोलीस ठाण्याचे पथक दि.05.09.2024 रोजी 13.00 वा. सु. वाशी पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलिंग करत असताना पथकास वाशी तालुक्यातील एनएच 52 रोडवर इंदापूर फाट्याजवळ रस्त्यावरुन अवैध कत्तलीतील गोवंशीय मांसाची वाहतुक होणार असल्याची गोपनीय खबर मिळाली होती. यावर वाशी पो.ठा. च्या पथकाने आज दि. 05.09.2024 रोजी पेट्रोलिंग दरम्यान सकाळी 13.00 वा. सु. एनएच 52 रोडवर इंदापूर फाट्याजवळ येथुन जाणारा पिकअप क्र. एम.एच. 16 वाय 3213 हा पोलीसांनी संशयावरून थांबवून त्याच्या हौद्यात डोकावून पाहिले असता आत गोवंशीय मांस व बर्फाचे तुकडे दिसून आले. यावर पोलीसांनी नमूद पिकअपचा चालक- सलमान हरुण मनियार, वय 34 वर्षे, सय्यद राजम्महम्मद आरीफ, वय 38 वर्षे, दोघे रा. संगमनेर ता. संगमनेर जि. अहमदनगर यांना त्या मांस वाहतुक परवाण्याबाबत विचारले असता परवाना नसल्याचे त्यांनी सांगीतले. यावर पथकाने अंदाजे 3,00,000 ₹ किंमतीच्या नमूद पिकअपसह त्यातील अंदाजे 1,25,000 ₹ किंमतीचे सुमारे 1,250 किलो गोवंशीय मांस जप्त करुन प्रयोगशाळा परिक्षणाकरीता पशुधन विकास अधिकारी, वाशी यांच्यामार्फत मांसाचे नमूने काढले आहेत. तसेच जप्त मांस हा नाशवंत पदार्थ असल्याने तात्काळ नष्ट करण्यासाठी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी, वाशी यांच्याकडे विनंती पत्र पाठवले असून त्यांची संमती मिळताच तो मांस साठा नष्ट केला जाणार आहे. या प्रकरणी वाशी पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक- राजु लाटे यांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन महाराष्ट्र प्राणि संरक्षण कायदा कलम- 5 (क),9(ब) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
सदरची कामगीरी मा. पोलीस अधीक्षक श्री. संजय जाधव व मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. गौहर हसन यांच्या मार्गदर्शनाखाली वाशी पो.ठा. चे प्रभारी- श्री. गायकवाड, पोउपनि घुले, पोना-लाटे यांच्या पथकाने केली आहे.
More Stories
धाराशिव शहरातील कचरा डेपो इतरत्र हलविण्याची शिवसेना (उ.बा.ठा) पक्षाची मागणी
पहिला आयुर्वेदिक हिमोफिलिया संशोधन प्रकल्प ‘रक्तामृत’चा धाराशिवमध्ये दिमाखदार शुभारंभ
फॉरेस्टच्या गवतावर तणनाशक फवारणी करून वृक्षलागवडीची नासधूस:वनपालावर कारवाईची मागणी