पावसाळ्यात पाऊस पडला की भूके कंगाल माणसाला त्याच्या भूकेची आग व पोटात पडलेला खड्डा भरून काढण्यासाठी धरणीमाय त्याच्या ओटीत हिरव्यागार ताज्यातवाण्या भाज्यांनं ओटी भरगच्च भरुन त्याला जीवदान देत असते. आपण या दिवसात अनेक मासिके ,वृतपत्र व पुस्तकात भरभरुन माहीती वाचीत असतो. शाकाआहार किती महत्वाचा हे पटवून सांगितले जाते. पालेभाज्यात अनेक जीवनसत्वे, लोह,प्रोटटीन्स्सारखे महत्वाचे घटक असतात.त्यामूळे शरीर सदृढ होवून निरोगी राहण्यास मदत होते. म्हणून पालेभाज्याना अतिशय महत्व दिले जाते. काही भाज्या पचायला जड व हलक्या असू शकतात. भाज्यांची चव आंबट, तुरट व अतिशय गोड आणि सुगंधीयुक्त व चवदार असू शकते. आपणास पचन होणार्या भाज्या आपण आवडीने सेवन करीत असतो. जेवताना कच्या भाज्या मोठ्या प्रमाणात लोक चव देवून खाताना दिसतात. आजकाल भाज्यांचा वापर आहारात करावा की नाही याबाबत माणसाच्या मनात जबरदस्त धास्ती भीती निर्माण झाली आहे. कारण पैश्याच्या हव्यासापोटी त्या ताज्या दिसाव्यात, त्यांची वाढ व्हावी व आकर्षक दसाव्या म्हणून त्यावर रसायन मारले जाते किंवा पिकल्यासारखी पिवळीधम्मक दिसावी म्हणून फळांना इंजेक्शन दिल्या जाते. अशा भाज्या शरीराचे आरोग्य बिघडवू शकतात व मनुष्य असाध्य रोगांची शिकार होवू शकतो. तरीसुद्धा आपण अशा वीषयुक्त भाज्या घेतच असतो. काय खावं व खाऊनये याबद्दल संभ्रम निर्माण होतोर्ण
दुधात भेसळ, चहात भेसळ केली जात असते, याकडे सर्वांनीच सर्रास दुर्लक्ष केले आहे ह्या प्राणघातक गोष्टी कटाक्षाने बंद व्हायला हव्यात.यामूळे जगाचे आरोग्य धोक्यात येवून बालकांचे व तरूणाचे त्यांच्या आरोग्याचा महाकाय प्रश्न उद्भवल्यास आरोग्य धोक्यात येऊ शकते. आज बाळापासून ते वृद्धांपर्यंत 75ते 80 टक्के लोक बी पण, मधुमेह, कँसर, क्षयरोग यांनी जर्जर झालेले दिसत आहेत, उघड्या डोळ्यांनी ही धडपड व तडफड पाहाण्याची वेळ येवू नये असे वाटते, आयुष्याची बरबादी आपल्याच दुष्कृत्याने आपणच करीत आहोत ही जाणीव ठेवणे गरजेचे आहे. तशातच भावी जीव कुपोषणाने बळी पडत आहेत आम्ही लहान असताना अन्नात भेसळ करणे पाप समजले जायचे. आज ते प्रतिष्ठेचे व संपत्ती मिळविण्याचे साधन होवून बसले आहे ही मानवी जीवनात लाजिरवाणी गोष्ट आहे. आम्हाला चांगले निर्भेळ व सकस अन्न खायला मिळत असायचे . टंचाई असेल ,कमी खायलाही मिळत असेल, उपास तापास घडत असतील पण जेवढे व जसे मिळेल ते अतिउत्कृटच होते. भले ते शीळे अथवा वीटलेले असेल .शीळ्या, वाळलेल्या भाकरीचे टुकडे शरीराला उर्जा व बळ देत असत. लोक रात्रंदिन कष्ट करायचे, घाम गाळायचे अन् उघड्या शेणाने सारवलेल्या अंगणात समाधनाने डाराडूर गाढ झोपी जायचे .ही त्या काळची खासीयत होती. आज सर्व उपलब्ध असताना सुखा समाधानाची झोप मिळत नाही. त्यासाठी औषध व गोळ्या खाव्या लागतात यासारखी शरमेची वाईट गोष्ट जगात असू शकत नाही.फाईव्ह स्टार, जीवन जगणाऱ्याची अवस्था फारच विदारक आहे. ही गोष्ट लपून राहिलेली नाही. पावसाळा हा त्याकाळी श्रमिकांचा, कष्टकरी लोकांचा व हातावर पोट असणारांचा जीवघेणा , कर्दनकाळ दुष्मन ठरायचा. कारण त्याकाळी पाऊस महिना महिना बेफाम कोसळत रहायचा. लोकांचा रोजगार बंद,धंदा बंद .माणसं घासा घासा मोताद व्हायची. लहान बालकांची चोंच अन्नाची केविलवाणी वाट पाहत बसासायची .लोक अतिशय हालाकीचे जाणं जगत असत. मग गरीब कंगाल लोक कसे जगत असायचे याची जाणीव आजच्या पिढीला माहीत असणे गरजेचे आहे असे वाटते. आकाड सरावन (आषाढ/श्रावण) महिन्यांत लोकं अत्यंत ह्रदयस्पर्शी व हालाकीचे जीवन जगत असायचे. माझी आई आकाड सरावनात माणसं उपासपोटी राहावू नयेत, दोन घास पोटात ढकलून जीती राहावीत म्हणून खूपच काळजी घ्यायची. उन्हाळी दिवसांत उडीद, मूग, मका, कळणा कोंडा व कटाणाच्या भाकरीचे टुकडे मीठाच्या पाण्यात भिजवून खमंग व कडक वाळवून भल्या मोठ्या माठात (मातीच्या डेर्यात ) साठवून त्याची उतरंड लावून ठेवायची. अशा सात उतरंडी असत. सर्वात खाली मोठा डेरा असायचा त्यावर मोरवा, डिचकी ,मोगा लहान लहान लोटकी ठेवून ती उतरंड लावून ठेवायची. त्यासाठी एक मातीचा ओटा करुन माठ बसेल एवढा ेखड्डा किंवा आळि करून त्या खोलगट जागी उतरंड मोठ्या कौशल्याने मांडली जायची .ते सोपं नसायचं. हेच आमचे अन्न साठे व गोदामं असायची. पावसाळ्यात धंदा बंद असायचे, घराबाहेर पडणे शक्य नसायचे. अशावेळी ते साठविलेले एका डालात (झाप) जो लवचिक वनस्पती व काड्यापासून बनविलेली असायची ,त्या डालात टुकडे घ्यायचे ,तोच आमचा डायनिंग टेबल,त्याभोवती सर्वांनी बसायचे ,भुईमुगाच्या शेंगा व भुरकी चटणी याबरोबरच शीळे टुकडे जाळी जळमटं जोरात फुंकून भूकेचा खड्डा, भूक शांत केली जायची . रोहिणी, मृग याचा पाऊस कोसळला की आठ दिवसांत भाज्या वर डोकं काढायच्या, पहिल्यांदा तरवटाची भाजी गरीबीला वरदान ठरायची. भाजीपाल्यामध्ये कुठले घटक असतात ते शरीरासाठी किती उपयोगी आहेत याची बहुसंख्य लोकांना त्याची माहिती अजिबात नसते. फक्त पोटाची खळगी आणि भूकेची आग शांत होवून जगण्याला उर्जा व बळ मिळते ही त्यांची महत्त्वाची गरज असते एवढच. इथून पुढे भाज्यांची रेलचेल सुरू व्हायची.धरणीमायनं सोय करून गरीबांची ओटी गच्च भरून टाकायची भाज्यात काही फळभाज्या, शेंगायुक्त व खास बी असलेल्या भाज्या
भरपूर प्रमाणात उपलब्ध होत असायच्या .माहितीस्तव काही नावांची नोंद खालील प्रमाणे करता येईल *पाले भाज्या — ———————- तरवटा, सराटा, भोपळीची भाजी ,काठमाठ, कुंजीर, चाकवत, चूचूची भाजी, लहान घोळ, मोठा घोळ, चिघळ, चुका, शेपू, अंबाडीची भाजी तिच्या डिर्या कच्ची फळं पाथरी, पालक, फूलकोबी,पानकोबी,कुरडू,करडी,मेथी,हरभरा इ.
*वेलवर्गीय भाज्या — ———————— घेवडा, पावटा, चवळी, कारले, पडवळ, दोडका, तोडलं, काकडी, शेंदी (लांब पट्टेवाली काकडी) .भोपळ्यांचे विविध प्रकार, वाटाणा, मटकी, काळी कोयरी (काळी शेंग) , *जमिनीतील भाज्या ( कंद) कांदा, कांद्याची पात, रताळी भाजी व कंद,गाजर,बटाटा,मूळ-शेंगडी व भाजी) इ. *झुडुप वर्गीय — ———————- मिरची , वांगी ,टोमॅटो, जवस बोंड, मूग गवार, पटाडी,, भेंडी, कुरटूलं इ. *वृक्ष वर्गीय —— ———————– शेवगा -भाजी फूलं शेंगा, हादगा -फूलं, सौंदड शेंगा, उंबर दोड्या, चिंचेचा फूलोरा, चिंचा, कडीपत्ता इ. भाजीमध्ये अत्यंत महत्त्वाची, जीला सुगरण म्हटले जाते ती भाजीचा सुगंध वाढविणारी, सुगंधी राणी —–“कोथिंबीर “ आहारात आणखी काही पदार्थ ऐटीत ठाण मांडून बसलेले असतात, आंब्याचा खार, लोणचं, चटणी( विविध प्रकारची). जेवणात तर लिंबू आवश्यक मानले जाते. याशिवाय सांडगे (चणापीठ), भुसारी सांडगा, उसरस -सांडगे पापड्या, रताळी -भाजी पापड्या,उसमळी- सांडगे पापड्या, असे विविध प्रकारचे पदार्थ जेवणाची लज्जत वाढवीत असतात याशिवाय डोंगरी भाजीपाला व फळे वेगळेच. इथे पालेभाज्या वरून काही विनोदी किस्से व म्हणी *घोळ -घलीतो घोळ *चिघळ-दावतो वघळ *काठमाठ –दावितो वाट *कुंजीर –कुंजीर लयी शहाणा पण धोतार फेडू देईना अशा प्रकारे भाजी आहारातील किती महत्वाचा घटक आहे याचे महत्व आपणास कळून येईल.
More Stories
फॉरेस्टच्या गवतावर तणनाशक फवारणी करून वृक्षलागवडीची नासधूस:वनपालावर कारवाईची मागणी
रक्षाबंधन
प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या प्रीती महादवारसह यशस्वी छात्राध्यापकांचा गौरव सोहळा उत्साहात